तुझी मला गरज नाही

ज्याला आपल्या प्रेमाची कदर नाही त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्यात काही अर्थ नाही.

       तनु आईवडिलांची एकुलती एक....अगदी फुलासारखी सांभाळली होती.कॉलेजला गेल्यावर ती होस्टेलला राहायला गेली.पहिल्यांदाच ती आईवडिलांपासून दूर राहत होती.तिने फूड प्रोसेसिंगला प्रवेश मिळवला होता.कॉलेजचं पहिलं वर्ष झालं की तिची ओळख राजेशसोबत झाली.राजेश तिला सिनियर होता.खूप दिवस गेले;त्यांची ओळख वाढत गेली.त्यातूनच ते दोघेही प्रेमात पडले.आणि सहा महिन्यांतच त्यांनी लग्नाचा विचारसुद्धा केला.घरी कळून न देता तनुनेही लग्नाला होकार दिला आणि त्यांनी कोर्ट मॅरेज केलेदेखील....
आईवडिलांचा थोडासुद्धा विचार न करता तनुने एवढं मोठं पाऊल उचललं आणि राजेशच्या भरवशावर तनु नांदायला आली.पण नांदायला आल्यावर हळूहळू राजेशचा स्वभाव तिला समजायला लागला.रजेश नेहमी तिला माणसांत कमीपणा दाखवायचा,की बाईने असंच वागीयचं वगैरे वगैरे.....ती एवढी शिकलेली तरी तिला जॉब करायचा नाही हे ठणकावून सांगितलं होतं.पण ती नेहमी त्याचचं ऐकून घेऊन वादाला कारण नको म्हणून शांत राहायची.पण एक दिवस त्याने मात्र कहरच केला.....
असंच सगळे बोलत असताना राजेशने माणसांच्यात तनुला बोलायला सुरूवात केली.बोलता बोलता लग्नाचा विषय निघाला,राजेश तनुला बोलला तु माझ्यासोबत आलीस.तनुनेही उत्तर दिलं की तुमचाही तेवढाच सहभाग होता;मी एकटी आले नाही....याचं रूपांतर भांडणात झालं.राजेशने तनुला घर सोडून आईवडिलांकडे जा,तुझी मला गरज नाही असं सांगितलं.तनुने स्पष्ट नकार दिला,मी तुमचा विचार करून इकडे आले.माझी स्वप्न,आईवडिल यांचा त्याग करताना मी मागेपुढेही पाहिलं नाही पण.....आणि राजेशन तनुला खाडकन कानाखाली दिली.तेवढ्यावर न थांबता चार पाच फटके अजून मारले.....शेवटी त्याचा पुरूषी अहंकार बाहेर पडलाच.राजेश बोलायचा इथपर्यंत ठीक होतं पण मार तिच्यासाठी अनपेक्षित होता.कारण प्रेमात आंधळी होऊन घरदार सोडून ती राजेशसोबत आली होती.तिला फक्त आणि फक्त प्रेम आणि चांगल बोलणं अपेक्षित होतं.
पण तरीही थोडा वेळ रडून विचार करत करत शेवटी तनु स्वयंपाकाला लागली.कारण तिला कळून चुकलं होतं,जे मी कृत्य केलंय त्याची हिच शिक्षा....तिला जाणीव झाली होती,की मी जे काही केलंय त्यामुळे धड आईवडिलांकडेसुद्धा जाऊ शकत नाही...त्या विचारांतच वाट बघत बसली राजेश येईल नि तिची समजुत काढेल;पण........कसलं काय........ती फक्त वाटच पाहत राहिली.
मैत्रीणींनो असं जगण्यापेक्षा कणखर बनून स्वत:च आयुष्या सावरा आणि सहन करणं थांबवा......ज्याला आपल्या प्रेमाची कदर नाही त्याच्यावर जीव ओवाळून टाकण्यात काहीच अर्थ नसतो.