तिळाची वडी

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

साहित्य: एक वाटी तीळ, अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे, दीड वाटी किसलेला गूळ, वेलची पूड अर्धा चमचा, तूप दोन चमचे, जायफळ, किसलेले खोबरे

कृती: प्रथम कढई गरम करून त्यामध्ये तीळ खरपूस भाजून घेणे. शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेणे. थंड झाल्यानंतर तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये  बारीक करून घेणे. जास्त बारीक न करता भरड करणे. कढईमध्ये एक चमचा तूप घालणे व गुळ घालून तो पूर्णपणे वितळवून घेणे. पूर्णपणे वितळल्यावर त्यामध्ये तिळाची भरड व शेंगदाण्याचे कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. या मिश्रणामध्ये थोडीशी विलायची पूड व जायफळ पूड घालणे. ताटाला तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण काढून घेणे व गरम असतानाच थापणे. थापून झाल्यावर वरून किसलेले खोबरे व तीळ घालणे. हलक्या हाताने खोबरे व तीळ वडी वरती थापून घेणे कोमट झाल्यावरती सुरीला तुपाचा हात लावून वड्या कापून घेणे. मस्त तिळाच्या वड्या तयार

तर मग नक्की करून बघा या संक्रातीला तिळाच्या वड्या. मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला.