तीच साहस तिच्यासाठी....

I like to reading.....


     तीच साहस तिच्यासाठी.....


            ती ऑफिसमध्ये कॉम्पुटरसमोर  बसून  काम  करत होती. 
झाल एकदाचं, म्हणत तिने एक उसासा टाकला. आता मॅमला पटकन इ-मेल करते आणि निघते . पुढचे दोन दिवस सुट्टी होती.त्यामुळे ती आज जास्त वेळ काम करत होती . 
बापरे,आठ वाजले. ऑफिसमध्ये अजून चार पाच जण  काम करत होते.
तिने पाण्याची बाटली पर्स मधे ठेवली .आणि मोबाइल स्विच ऑन केला. 
तीच घर तस जवळच होत. अगदीच वीस मिनिटाच्या अंतरावर, आज रस्ता थोडा मोकळा वाटत होता.आज होळी होती.  तिने हेडफोन्स कानाला लावले, मोबाईल पर्स मध्ये ठेवला. ती नेहमीच अशी करत असे. रस्त्याने चालत गाणी ऐकत असे.
अचानक तिच्या पाठीवर एक थाप पडली. तिची ओढणी ओली झाली होती.ती धपकन खाली पडली. 
तिला काही कळेचना.
"लागलं का ग".पाठीमागून   एका आजीचा आवाज आला.  
"पाण्याचा फुगा होता.  तो बघ रेड शर्ट ".
 "काय, ती जोरात उठली , ड्रेस झटकला". तो पर्यंत तो पुढे सरळ निघून गेला होता. 
तिने बाजूला उभ्या रिक्षाला सांगितले, "सरळ  चला".
थोड्या अंतरावरच तिने रिक्षावल्या काकांना आवाज दिला
"काका जर 2 मिनटं थांबा  इथे" ती रिक्षातून खाली उतरली .
त्या रेड शर्ट ला जोरात धक्का दिला. त्याने दिला त्यापेक्षा जास्तच, आणि  मोठ्याने ओरडली " का"?
उत्तर ऐकण्यापूर्वीच रिक्षात जाऊन बसली.  
घरी आल्यावर बराच वेळ विचार करत होती.  तिला तिचंच कौतुक वाटत होतं.

तीच साहस तिच्यासाठी .

 समाप्त.
(ही एक सत्यकथा आहे.)
Thank u ईरा.