ती परकी कुठे
भाग 3
प्रियाने त्याला आता सरळ सांगितले ,"माझे सासर ही तसे इतके गरीब नसेल की सुनेच्या वडिलांकडून लेकाचा संसार करून घेतली..नाही ना इतके ही गरीब..?"
"ही गम्मत होती का ?" तो रागात
"तू ठरवले तर होऊ शकते " ती
त्याच्या वागण्याचा तेव्हाच प्रियाला राग आला होता ,जर वस्तू घ्यायची होती तर स्वतःचे पैसे द्यायचे होते ,जर इतर कोणी पैसे देत आहेत तर आपण वस्तू कमी महाग घ्यायची होती पण त्याने छान डाव साधला होता...आईसाठी म्हणून अजून काही तरी घेणार होता पण प्रियाने त्याला तिथे ऐकवले होते..
"अग प्रिया आता ते तुझे घर होणार आहे ,तू काय परकी आहेस का ..मग हरकत काय घेतले तर..आई बाबा देत आहेत तर घेऊ दे आईसाठी.."
"एक गोष्ट लक्षात ठेव ,मी आता तुझी जबाबदारी आहे..ह्या वस्तू तू घेऊन द्याव्यात..आई बाबांनी नाही..मला त्यांनी खूप केले आहे..तरी ती देते तर तुझ्या घरी काय हवे ते तुझ्या पैश्यातून घे...आणि हो मी परकी परकी हे काय लावलंय रे...तसा तर तू ही आमच्या साठी परका नाहीस मग तू बिल देणे लागते.. कारण हे तुझ्या घरचे समान आहे.."
"प्रिया आत्ताच वाद करतेस तू तर..?"
"मला मानात राहणारा नवरा आवडतो ,हे फुकट घेऊन कायम स्वाभिमान घालवणार नकोय.."
तितक्यात बाबा आले होते ,त्यांनी लगेच प्रियाला आवरले आणि सांगितले
"प्रिया लेकीसाठी हे काय असे किती तरी घेऊ शकतो ,आणि त्यांना गावी घ्यायचे आहे तर घेऊ दे..पण वाद नको...त्यांच्या आईचा विचार त्यांनी करायला हवा...हरकत नाही..पण हे समान तुला तुझ्या घरी नवा संसार थाटायला देत आहोत, ते तुझे स्वतःचे घर असेल..तुझी मर्जी तुझे आयुष्य..आणि आई बाबाच्या आठवणी रोज आजूबाजूला असतील...पण वाद नको घालू.."
प्रियाची आई लगेच म्हणाली ,"पण हे सामान लगेच मुंबईला जायला हवे..परत परत कोण गाडी करून नेईल.. भाडे किती होईल..सो मुंबईला जाऊ दे.."
असे म्हंटल्यावर आनंदात जावई म्हणाला ,"बाबा तुम्ही हिला सांगत जा जरा असे,उगाच वाद घालू नकोस म्हणून...सुरुवात छान होऊ दे..माझा तिचा संसार तुझ्या आशिर्वादाने होऊ दे..समान असेच लाभू दे...मी लगेच सांगतो आईला मिक्सर घेतले मी तिला ते..."
"तू नाही बाबांनी सांग..आवडेल का त्यांना हे असे घेतलेले..? नाहीच आवडणार बघ..त्या स्वाभिमानी आहेत.." प्रिया
तो हसला आणि म्हणाला ,"आईच उलट म्हणाली तुमच्या संसाराची खरेदी करताना मला मिक्सर घे..जास्त महाग ही नसले तरी चालेल.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा