Login

ती परकी कुठे भाग 2

ती परकी
परकी कुठे ती

भाग 2

प्रिया एक शिक्षित मुलगी ,लग्न जमले तसे ती तिच्या खर्चाने सगळे हवे नको ते बघत होती..

बरेच सामान ,साड्या ,शालू, घागरा तिने तिच्या स्वतःच्या कमाईतून घेतले होते..

तिने तर आईसाठी साडी ,आजी साठी इर्कल ,वडिलांसाठी खास सफारी घेतले होते .

तिला नवरा ही चांगला मिळाला होता पण गावाकडील सरकारी नौकरी करणारा..पण लग्नानंतर मुंबईत तिच्या माहेरच्या जवळ राहण्यासाठी तयार झालेला..साधारण विचार सरणी असलेला..पण तिला आवडला तो फक्त स्वतःच्या हिमतीवर अधिकारी म्हणून निवडला गेला म्हणून..
------------------


प्रियाची सासू धीट वागत होती ,तिला सामान घरी गावी घेऊन जायचे होतेच ,प्रियाला लांबून दिसत होते की आपल्या आईचा जीव त्या लेकीसाठी घेतलेल्या सामानासाठी तळमळत होता ,पण आई एकटी काहीच बोलू शकत नव्हती ,बाबा ही तिला भांडण करते म्हणत होते..पण आता काय करणार आई ही ???आईला मी ही सांगू शकत नव्हते..तिला आता आईची बाजू घ्यावी वाटत होती पण तिला ह्याच्या घरी नांदायला जायचे म्हंटल्यावर जरा जपून वागावे बोलावे लागणार होते हे कळत होते प्रियाला...

"आईsssss !! आईsss " प्रिया आवाज देत होती

तितक्यात आईला तिचा आवाज ऐकू आला होता ,त्यांनी लगेच तिच्या कडे धाव घेतली आणि तिला घडत असलेला प्रकार सांगितला..

"बघ प्रिया कसे करत आहे सासू तुझी ,तुझे सामान ती गावी घेऊन जात आहे..किती आवडीने घेतले होते सगळे ,आता त्यांची नजर त्याच्या वर आहे..पण मी काहीच करू शकत नाही असे झाले.."

"आई तू राहू दे,मी ह्यांना सांगेन ते सामान घरी घेऊन यायला तू बघच..तुझी इच्छा पूर्ण होईल..तू आवडीने घेतलेले सर्व सामान मीच वापरणार आहे,पण तू काळजी करू नको..तू आधीच सकाळपासून जेवली नाहीस..मला तुला बघून बरे वाटत नाही.."

आईने तिचे म्हणणे ऐकले तरी तिला खूप दुःख झाले होते ,कसे बसे पैसे जमवून ,उधारी घेऊन लेकीला हवे ते सगळे घेतले होते ,जावई त्याने काहीच पैसे खर्च केले नव्हते ,तो तर फक्त अजून काय घेऊ शकतो ते सांगत होता ,हवरटा सारखे त्याला भारी भारी हवे होते..त्यात त्याने गावी देण्यासाठी एक मिक्सर घेतले होते...आईला हवे होते म्हणून पण त्याचे ही पैसे त्याने दिले नव्हते..

"प्रिया अजून काय हवे ते घेत चल,पुन्हा येणे होत नाही.." तो

"मी घेईल तुझ्याकडून नंतर ,इतका ही खर्च परवडणार नाही बाबांना..म्हणून तर मोठा अधिकारी निवडला आहे ,तो कधी कामी येईल..?"

त्याला प्रियाने गोड शब्दात सुनावले..

"मी सासर म्हणूनच जवळचे घेतले की तुझे वडील लेकीसाठी कधी ही खर्च करू शकतील.."