Login

ती परकी कुठे भाग 1

ती परकी
तुझे लग्नाचे समान आणून घे
परकी कुठे ती
भाग 1

"प्रिया अग सासरी सगळे लग्नाचे ससान पोहचवले आहेस खरे पण ते तुला लागणार आहेच ना..?"

प्रियाची आई तिला सांगत होती ,त्यांनी प्रियाच्या लग्नात खूप महाग सामान दिले होते ,ते खास करून प्रियाच्या मुंबई मधील नव्या घरासाठी दिले होते..आईने कर्ज काढले होते त्यासाठी..लेकीची हौस होईल..आणि पुन्हा कोण देते लेकीला म्हणून आई म्हणाली मी देते समान..त्यात प्रियाचा नवरा नको नको म्हणत होता..पण शेवटी म्हणाला आता तुम्ही देतेच आहात तर हरकत नाही..

प्रियाची सासू ही लगेच म्हणाली ,अरे मग सोबत गावी ही पाठवून द्यायची सोय करता येईल तर बघा..तेव्हाच प्रियाच्या आईला वाटत होते की म्हणावे गावी घेऊन जाण्यासाठी नाही दिले हे सामान, हे तिच्या नवीन संसाराला लागणार म्हणून दिले आहे..वेळीच सगळे क्लीअर करणार होती प्रियाची आई पण लगेच प्रियाचे वडील मध्ये आले आणि म्हणाले

"तू आता भांडण सुरू करणार आहेस का ?? नवीन नाते आहे..तुला कळत नाही का ?? काय ते समान सामान करत आहेस सारखीच ,राहू दे काही दिवस गावी ,येतील घेऊन जावई.."

प्रियाची आई अजून रागावली होती ,ह्या माणसाने तर पूर्ण आयुष्यात हेच केले आहे..माझ्या ही बाबतीत हेच केले होते..मुलीचे आई वडील किती हौसेने मुलीला संसार थाटण्यासाठी समान घेऊन देतात ह्यांना काय माहिती...

"सामान तर आपण आपल्या प्रियासाठी घेतले आहे ,तसे बोलणे ही झाले होते किरण सोबत तर त्यांना ही माहीत असायला हवे की सामान डायरेक्ट मुंबईला घेऊन जायचे आहे ,मग गावी का ?? विचारा त्यांना हवे तर."

इकडे नवरी वाटे लागण्याची घाई होती ,त्यात सासूबाईने ही मुलांना सांगितले सामान टाका आपल्या गावी जाणाऱ्या गाडीत ,ते गावी जाण्यासाठी आहे..

प्रियाची सासूबाईला सांगून ही कळले नाही की हे त्यांच्या साठी नाही तरी त्या ते सामान गावी घेऊन जात होत्या...

"प्रियाची हौस आहे मान्य आहे पण प्रिया कुठे आता आमच्यासाठी परकी आहे ,सांगा बरं.. हे घर ही तिचेच आहे..तर हरकत काय त्यात जर सामान गावी आले काय आणि मुंबईला प्रिया ने वापरले काय..? ती येणारच आहे गावी ,मग तिला तिकडे ही कामी पडेल ना..? तुम्ही आता जास्त लोड घेऊ नका..आम्ही बघून घेऊ हो.."

क्रमशः

🎭 Series Post

View all