तिने साथ दिली म्हणून !!!!!!

She gave him strength and support when he needed the most

राहुल नैराश्यात गुंतत जात होता पण समिराला अजूनही त्याचे हे रूप माहीत झाले नव्हते

त्याने त्याच्या ह्या टोकाच्या नैराश्याचा शेवट केला आणि स्वतःला जीवनातून हरण्यापासून ह्या depressionशी लढा दिला. त्याने समिराला सात जन्मीची साथ देण्याचे वचन अर्ध्यात मोडून न देता पुन्हा तीच्यासाठी आणि तिच्या साथीने उभा राहिला.

समीराचे आणि राहुलचे love marriage होते. त्यांच्या ह्या लग्नाला घरच्यांचा नकारच होता, अल्लड प्रेम होते त्यांचे, कारण ते दोघे फक्त खरे प्रेमी होते, पैसे ,नौकरी, settlement ,भविष्य हे काही मानत नव्हते ते .

एक जण का कमावणारा असेना मग बस कारण, आमच्या दोघांच्या फार काही अपेक्षा नाहीत हे म्हणत. ???? पण हा शुद्ध मूर्खपणा होता हे त्यांच्या आई वडिलांना माहीत होते.

पण शेवटी  ह्या मुलांसमोर त्यांचेकही एक चालणार नव्हते म्हणूनच त्यांचे लग्न लावून दिले होते. तो नौकरीला पण पगार तुटपुंजा होता. तिने ही सांगितले होते, मला फक्त तुझे प्रेम हवे रे अजून काही म्हणजे काही सुख नको .

काही दिवसांनी त्याने ही नौकरी सोडली, मग घर चालवण्यासाठी आर्थिक गरजा account मधील पैशातून भागवत असे.

खरच खूप प्रेम करत दोघे एकमेकांवर, तो ही आणि ती ही खूप प्रेम करत ,ती श्रीमंत घरची आणि तो ही पण त्यांनी आई वडिलांच्या पैश्यावर मजा न मारण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून तर ते लग्नानंतर वेगळे रहात होते, एक छोट्या घरात भाड्याने. हौस मौजेचे दिवस जात होते, आता खरी जीवनाची लढाई सुरू झाली होती. आता दोघांच्या ही गरजा वाढल्या होत्या, त्यासाठी कमवण्याची खूप गरज वाटू लागली होती.

तिला नौकरी होती पण त्याला अजून ही नौकरी लागली नव्हती, तरी तिला मात्र त्याच्या नौकरी नसल्याने काही ही फरक पडत नव्हता, तिचे त्याच्यासाठी प्रेम अजून ही तसेच होते जसे लग्नाआधी होते. पण राहुल मात्र आनंदी नव्हता.

राहुल आता हळूहळू नौकरी नसल्याने अगदी सतत tension मध्ये असत, घरी बसून बसून तो उदास राहत असत,ती आली की आनंदी असल्या सारखा दाखवत, आता तो तिच्या पासून दूर जात होता मनाने आणि संगतीने ही.  ती जवळ आली की थोडा वेळ गप्पा मारत आणि लगेच आपल्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेत होता.

काही दिवस तिला वाटे की ,त्याला space हवी असेल, पण मग हळूहळू लक्षात येत की ,हा आता बोलणे ही कमी करत आहे,आणि तिला टाळत आहे. आधी सारख मनातले बोलणे ,सांगणे, तिचे काही ऐकून घेणे यापासून खूप लांब गेला आहे. किती दिवस तर तो घराच्या बाहेर ही पडला नव्हता.

राहुलची ही अवस्था  पाहून   तिने   ऑफिस  मधून   2 महिन्याची रजा काढली होती, ती त्याच्या काळजीत आता
जास्तच वेडी झाली होती. तिला आता समजले होते की राहुल depression मध्ये जात आहे.????  आजकाल ऐकू येणाऱ्या बऱ्याच depression च्या cases आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या ह्या ह्याच अश्या वागण्यातून होत आहेत.

तिने राहुलला आता तिचा पूर्ण वेळ द्यायचे ठरवले होते, सतत ती त्याच्या आजूबाजूला असत, त्याला खुश ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत, त्याला डॉक्टर कडे ही treatment साठी घेऊन जात, तीच्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे संपत आले होते. आता तो बरा झाला होता पण
त्याला एक गोष्ट खत होती ती म्हणजे एकतर मी नौकरी करत नाही आणि माझ्या treatment साठी तिचे ही पैसे संपवून बसलो.

तो बरा झालेला पाहून समीरा ही आता ऑफिस ला जात होती, तिची दिवसभर धडपड पाहून त्याला वाईट वाटत होते, त्याने ही नौकरी शोधण्यासाठी सुरुवात केलेली होती,पण आता त्याचा confidence खूप कमी झाला होता, त्याला स्वतःबद्दल नूनगंड वाटत होता.

समीरा घरी येण्याची खूप घाई करत फक्त राहुल साठी त्याला सोबत करण्यासाठी त्याची हिम्मत होण्यासाठी, ती नवं नवीन पदार्थ करून त्याला घालत होती,त्याच्यासोबत न आवडून ही movie बघत होती. त्याला त्याच्या उमेदीची वाट दाखवत होती. सगळे नीट होईल ही आशा रुजवत होती.

तो दिवस आला ज्या दिवसाची तो वाट बघत होता, समिराचे यश आता फलित होत होते, राहुलला ही हिम्मतीने तिने संकटांना सामोरे जाण्याची संधी प्राप्त झाली होती, आज तो नौकरीच्या ठिकाणी जाऊन interview देऊन आला होता, त्याला स्वतःला त्याच्या बद्दल खूप आत्मविश्वास होता. जरी नौकरी नाही मिळाली तरी तो मोडणार नव्हता.

त्याला आता फक्त पुढे जायचे हेच ध्येय होते, मग ती नौकरी असो किंवा धंदा.

ह्या नौकरीच्या कॉल आला नाही,हो पण ह्या आत्मविश्वासामुळे त्याने दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न केला होता, ज्यात त्याला त्याक्षणी निवडले होते.

घरी येताच पहिल्या ठिकाणी दिलेल्या interview चा ही कॉल आला होता, त्याला तिथे ही चांगली संधी उपलब्ध होती. त्याला आता स्वतःवर खूप विश्वास जडला होता.

समिराने राहुलला फक्त आपल्या प्रेमाच्या हिंमतीवर आणि विश्वासावर उभे केले होते आणि त्याचे फळ तिला दिसत होते.????