तारुण्याच्या उंबरठ्यावर-६

तीच्या आयुष्यात आलेले एक अनपेक्षित वळण आणि तिच्या आयुष्याला भेटलेली कलाटणी...!











"अय्या मीरा, काय भारी डान्स केलास यार! भन्नाटचं एकदम!!! " मजूंश्री माझ्याजवळ येत,स्वतःच्या फोनमधील माझाचं व्हीडीओ मला दाखवतं बोलली. 


थोड्यावेळापूर्वीचं मी एका नवीनचं आलेल्या मराठी गाण्यावर व्हीडीओ बनवून टिकटॉकवर अपलोड केलेला. 


मोजून पन्नास एक मैत्रीणी कनेक्ट होत्या माझ्या प्रायव्हेट अकाऊंटला.त्यातीलचं एक शेजारच्या रुममध्ये राहणारी मैत्रीण ,मी नूकताचं पोस्ट केलेला व्हीडीओ पाहून धावत माझ्यापाशी आली. 


मी फोन हातात घेऊनचं बसलेले.मंजूश्री आली तशी माझ्या बाजूला धपक्कन बसकन मांडत, माझाचं व्हीडीओ मला दाखवून ,माझं तोंडभरून कौतुक करत होती. 

अगदी स्तुतीसुमने उधळत होती म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. 



" मंजू, खरचं काय? "मी तीची स्तुती ऐकून उत्साहित होत वीचारलं. 



"हो गं बाई! आत्तापर्यंत बारा व्हीडीओज् पोस्ट केले तुम्ही मॅडम ,आणि तरीही प्रत्येकवेळी हाच प्रश्न विचारून कंटाळा नाही का गं येत तूला?ओहहह् !!!भला कोई अपनी तारीफ सुनके थक जाता है क्या। मी पण काय विचारते. "रुहानी माझ्या दुसर्‍या बाजूला जागा पटकावत म्हणाली. 


खरचं होतं म्हणा तिचं. 

प्रत्येकवेळी व्हीडीओ बनवून पोस्ट केला की, नेहमी तोच प्रश्न अग्रभागी असायचा. आणि त्याचं उत्तरही आगदी ठरलेलं. सगळ्याजणी माझ्यावर स्तुतीसूमने उधळत मला प्रोत्साहन द्यायच्या.

त्यांच्या कौतुकास्पद शब्दांनी मला अजून हुरूप यायचा आणि मग मी उत्साहाने पुढचा व्हीडीओ बनवायला घ्यायची. 


एव्हाना मी वेगवेगळ्या सोशल मीडियांवर ही अ‍ॅक्टिव्ह असायचे.फेसबूक म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका, ट्विटर म्हणू नका.अगदी सगळीकडे म्हणजे सगळीकडे माझा वावर हळूहळू विस्तारू लागलेला.पण सगळे अकाऊंट प्रायव्हेट होते आणि तिथेही फक्त मूलींच कनेक्टेड असायच्या.मूलांशी अजून तसा काही बोलण्याचा संबंध नव्हता आला. हा अगदी नाहीचं असं नाही.परीक्षेच्या वेळी किंवा प्रॅक्टिकल्स च्या वेळी थोडेफार बोलणे व्हायचे.ते ही फॉर्मलचं! 



तर असा हा माझा रोजचा दिनक्रम चालू होता.दिवसभर कॉलेज, लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स काही रेग्युलर अॅक्टिव्हीटीज् ,आणि तो वेळ सोबतचं झोपेचा वेळ वजा केला की उरलेल्या वेळापैकी ९९ टक्के वेळ हा फोनच्या हवाली.त्यातं ही जास्तीत जास्त व्हिडीओ बनवने आणि पोस्ट करणे. 


एकदिवस असेच मी एकदम ट्रॅडीशनल लूक कॅरी करून, चांगली भरजरी गडद हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज, गळ्यात साडीला सूट होतील असे ट्रॅडिशनल दागिने, कानात खांद्याच्यावर लोंबतील अशी कर्णफूले, हातात कलरफुल अश्या हातभरून बांगड्या,केसांचा वर घेऊन अंबाडा घातलेला, चेहर्‍यावर अगदी साजेसा मेकअप..खूपचं छान अशी तयार होऊन मी रूमच्यासमोर ऊभी होते.समोर मानसी फोन हातात धरून अँगल चेक करत, मला परफेक्ट पोझिशन मध्ये उभे राहण्यासाठी सूचना देत होती. मी ही  ती सांगेल त्याप्रमाणे पोझिशन घेत ऊभी राहीले.आज मी खूपचं उत्साही होते .मला खूप दिवसांपासून नऊवारी साडीवर व्हीडीओ बनवायचा होता.पण हॉस्टेलमध्ये साडी कुठून येणार? मगं शेवटी खूप प्रयत्नांनंतर आमच्याचं एका अपडाऊन करणार्‍या मैत्रीणीने साडी आणि त्यावर सूट होणारे दागिणे मला व्हीडीओ बनवण्यासाठी दिले. आणि आज त्यावरचं व्हिडीओ बनवणार होती मी .रूप तर नक्षत्रासारखे सजलेले.मला एवढे सुंदर तयार झालेले पाहून वैभवीने तर माझ्या कानामागे लगेच काळजाचा तीट लावला. तश्या आमच्या बाकीच्या रुममेट्स पोट धरुन हसायला लागल्या. "शोभतेस हं हॉस्टेलची अज्जीबाई !" ती ही लटकेच रागावून आमच्या  हसण्यात सामील झाली. 



" मीरा,मूव्ह राईट साईड ...हं...येस येस थोडीशी मान वर कर... हं ओके! एकदम परफेक्ट! आता कर सुरू. "मानसीने हाताचा अंगठा उंचावत ओके असा इशारा केला.


" कॅन आय स्टार्ट ? "मी पोझीशन घेत वीचारलं आणि मानसीने सॉन्ग सूरू करत ,मान डोलावून हो असे सांगितले.  



 नभातून आली अप्सरा, 

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून,

आली आली गं आली... 



"डन!!! "लिमिटेड मिनिटांचा व्हिडीओ पुर्ण झाल्यानंतर, मानसीने हात दाखवत मला झाले असा इशारा केला.तशी मी धावतचं तिच्याजवळ आले आणि व्हीडीओ पाहू लागले.व्हिडोओ एकदम परफेक्ट झाला होता. दीपीका आणि प्रियांकाच्या तोडीसतोड !!!



" मनू, मी हे काढून ठेवते. तोपर्यंत तू व्हीडीओ पोस्ट कर हं "मला जास्तवेळ तोच आऊटफीट कॅरी करून वावरायला खूप अवघडं झाल होतं.म्हणून मी पटकन हे कपडे बदलून येते असं मानसीला सांगितल आणि रुममध्ये जाऊ लागले. 



"उप्स्ससस् !!!" मानसीचा असा आवाज ऐकून रूमच्या दीशेने निघालेली मी जागीच थबकले. 


"काय गं काय झालं? "मी पाठीमागे वळत मानसीला वीचारलं. तरं ती तोंड एवढसं करून माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. एकदा फोनकडे तर एकदा माझ्याकडे असेच चालू होते तीचे दोन मिनीट.शेवटी मीचं तीच्याजवळ जात, तीला पून्हा एकदा तेच वीचारलं. 



"अगं मनू, अशी काय पाहतेस माझ्याकडे .काय झालं सांग ना? "मी बोलता बोलताच तीच्या हातातून फोन काढून घेतला.


"सॉरी यार मीरा.ते चुकून... "


"अगं पण झालं काय? "मला कळेचं ना ,ती अशी का सॉरी म्हणतेय.मी मानसीकडे पाहत पाहतचं फोनमध्ये बघायला लागले. 


"अगं... त.. ते..."



"ए मीरा तुझे बाबा आलेत खाली."खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एक मैत्रीण धावत वर आली. ते ऐकलं तसं मी गडबडले. फोन तसाच मानसीजवळ देत "मी आलेच" असं म्हणतं मी पटकन रुममध्ये पळाले.


मानसी तर हताशपणे, आत निघून जाणाऱ्या माझ्याकडे पाहत होती. 



   कपडे,मेकअप वगैरे लगेच उतरून मी आपल्या नेहमीच्या अवतारात येत बाबांना भेटायला खाली गेले.बाबा सुरुवातीला सोडायला आले तेव्हाचं वर माझ्या रुमपर्यंत आले होते. नाहीतर एरवी ते खालूनचं मला भेटून निघुन जातं. आजही थोडफार बोलून, ख्यालीखुशाली वीचारून, बाबांनी आईने दिलेला खाऊ माझ्याजवळ सोपवला.कॉलेज मटेरीयल आणि माझ्या खर्चासाठी पैसे माझ्या हातात टेकवून बाबा परतीच्या प्रवासाला निघाले. मी ही बाबा गेले तसे वर निघून आली.बाबांशी बोलता बोलता सव्वा -एक तास कसा पटकन गेला समजलेचं नाही. मी वर आले तसं  पटकन कॉटवर उडी मारत, मानसीने माझ्या बेडवर ठेवलेला फोन हातात घेतला आणि स्क्रोल करू लागले. 


वेगळं काय असणारं टीकटॉकचं!!!पण जस जशी मी पाहत होते.माझ्या चेहर्‍यावरचे भाव क्षणात बदलले.


इकडे समीराने फोन हातात घेतल्यापासून, स्वतःच्या कॉटवर बसून चेहरा उशीआड लपवत, फक्त डोळे वर राहतील अशा पोझिशन मध्ये बसून मानसी तीचं निरीक्षण करत होती. आणि जसं जसे समीराच्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स बदलतं होते तशी तीची घाबरगुंडी उडाली. आता काही आपले खरे नाही.तीने मनातचं देवाचा धावा सुरू केला. 



"मनूsss" मी फोनमधून डोक वर काढतं मानसीला आवाज दिला.माझ्या आवाजासरशी तीच्या हातातील उशी पटकन निसटून खाली पडली, आणि ती भांबावून त्या उशीकडे तर एकदा माझ्याकडे अशी पाहत होती. डोळ्यात भीती आणी केविलवाणे भाव. 



" सॉरी मीरा "मानसीने केवीलवाण्या आवाजातच हलकेच कान पकडत माझ्याकडे बघीतलं. मी तर पुरती हँग झाले होते. का नाही होणार मॅडमने मघाशी बनवलेला व्हीडीओ प्रायव्हेट ठेवायच्या ऐवजी सर्वांना दिसेल असा अपलोड केला होता.मला तर काहीचं सुचतं नव्हतं.आतून कापरं भरल्यासारखं जाणवतं होतं. मी फक्त सुन्न होऊन मनू (मानसीकडे) पाहत होते. 



"अरे,मीरा सॉरी ना गं! माझ्याकडून चूकून झालं. मी मघाशी तूला तेच सांगत होते पण तुझे बाबा आले आणि तू फोन माझ्या हातात सोपवून खाली गेलीस बाबांना भेटायला. "माझा काहीचं रिस्पॉन्स नाही म्हणून मनूचं पूढे बोलतं होती. बोलत होती काय चांगलीचं घाबरलेली.चेहरा तर पार उतरलेला.आणि मी तर काय सदमा लागल्यासारखी फक्त तोंड वासून डोळ्यांची पापणीही न लवता तीच्याकडे नुसती एकटक पाहत होते. 



"अगं, काय चाललयं तूमच्या दोघींच ?आम्ही ही आहोत म्हंटल इथे.जरा आम्हाला कळेल असं तरी बोला "एवढावेळ शांत राहून या दोघींच निरीक्षण करत बसलेल्या रुहानीने शेवटी बोलायला तोंड उघडलं.बूक्सच्या ढिगाऱ्यात बसलेल्या वैभवीनेही रुहानीकडे पाहत ,बरोबर बोललीस तू अशी मान डोलावली. 



तरीही आम्ही दोघी फक्त एकमेकींकडे पाहत होतो.रूहानी आणि वैभवी तर एलीयन पाहत असल्यासारखे आमच्याकडे पाहत होत्या. एकतर विषय काय आहे ते माहीत नाही,आम्ही काय बोलत आहेत ते समजेना आणी वरून आमच्या दोघींचे अजीबोगरीब फेसीयल एक्सप्रेशन्स...


रुहानी चा तर आता संयमचं संपला. पटकन हातातील प्रॅक्टिकल नोटबुक आणि पेन खाली ठेवत ती तरा तरा डबलबेडच्या पायर्‍या उतरून माझ्याजवळ येत कमरेवर दोन्ही हात ठेऊन, एकदम टफ लूक देत मला बघू लागली. 



"मीरा ,मनू मी भिंतीशी नाही तूमच्याशी बोलतेय.तूमच्या या चेहर्‍यावरच्या मुद्रांना काहीवेळ विश्रांती बहाल करून कृपया आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कष्ट घ्याल का आपण? "बोलता बोलता रूहानीने मानसीकडे मान वळवत तिच्यावर ही रागात डोळे वटारले. 



" अगं तीने मघाशी बनवलेला व्हिडीओ प्रायव्हेट मध्ये नाही अॅड केला आता तो सगळ्यांना दिसणार "मी एकदम रडवेल्या आवाजातचं मनूवरची नजर हटवत रुहानीकडे बघीतलं. 



"ओ त्तेरी!!! "रुहानी आश्चर्याने धक्का बसून बोलली. 



"अरे यार, मी मूद्दाम नाही केलं. ते गडबडीत चूकून होऊन गेलं. सॉरी ना मीरा "मानसी पण रडण्याच्या गतीवर आलेली. 



"अगं पण... "मी खूपचं अस्वस्थ झाले होते.हो नाही करत शेवटी अकाउंट तर काढले होते, पण ते सर्वांना व्हीजीबल ठेवण्याएवढी हीम्मत तर माझ्यामध्ये अजीबात नव्हती.आता हा व्हिडीओ किती जण पाहतील?कोण काय बोलेलं?कोणी वाईट साईट बोललं तर? मला नावे तर ठेवणार नाहीतं ना? आणि जर गावातील कोणी किंवा आई बाबांनी..नाही नाही.मला तर घामचं फुटलेला. काहीचं सूचतं नव्हतं.मनू ,रुहानी आणि वैभवी चे आवाज कानावर पडत होते ते पण अस्पष्ट..आता फक्त डोक्यात एकचं गोष्ट चालू होती.कोण यावरं काय रियॅक्ट करेल ?




"मीराsssकेव्हाचा आवाज देतोय आम्ही तूला. लक्ष कूठे आहे तूझं? "वैभवीने माझ्याशेजारी येऊन बसत मला खांद्यावर थोपटत भानावर आणलं.मी फक्त मान वळवून तिच्यावर सोबतचं मनू आणि रूहानीवर नजर टाकली. 



"रूक, फोन दिखा तेरा.एवढी काय हबका बसल्यासारखी तोंड करून बसलीयेस. "रूहानीने बोलत बोलतचं माझ्या हातातून फोन ओढून घेतला.एव्हाना मनू ही खाली येऊन रूहानीजवळ ऊभी राहीलेली.



"अरे, तू तो छा गयी यार।सिर्फ दो घंटो मे तेरे पांचसो बयालीस (५४२)लाईक्स और एकसौ चौदा(११४) कमेंट्स आये है। मीरा वाॅव यार. काय एक एक कमेंट्स आहेत बघं आणि तू आहे की तोंड पाडून बसली आहेस. "रुहानी माझ्या फोनमध्ये पाहत अत्यानंदीत होत बोलली.तीचं बोलण ऐकून मनू आणि वैभवीपण फोनमध्ये डोकावू लागल्या.त्या एक एक कमेंट वाचून दाखवत होत्या ,आणि मी फक्त शांतपणे तिघींच्या चेहर्‍याकडे बघत ते ऐकत होते. 



"मीरा, उलट मनूकडून हे जे झाले ते बरोबरचं झाले. तुझ्याजवळ टॅलेंट आहे आणि तू ते लपवून ठेवायला बघतं होतीसं. पण बघं, फक्त दोन तासात तू कुठल्या कुठे पोहोचलीस.हे बघं, किती भारी भारी कमेंट्स आल्यात. आणि तो सडू फेस नीट कर पहिली. एवढी चांगली न्यूज सांगितली तूला, आणि तू आहे की मेणाच्या पूतळ्यासारखी त्या बेला चिकटून बसली आहेस. "रुहानीने मनू आणि वैभवीला बाजूला सारत, माझ्याजवळ येत फोन माझ्यासमोर पकडला.ती मला एक एक करून सगळ्या कमेंट्स आणि लाईक्स दाखवत होती.उलट मी उत्साहित व्हायचं सोडून तीचं हवेत असल्यासारखी बडबडत होती. 


क्रमश :


©️ मनमंजिरी ?




🎭 Series Post

View all