तुझ्या माझ्या नात्याचं ड्रीमप्रोजेक्ट..

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर करू न्यु बिगनिंग, आपल्या या क्युट नात्याची करू एक भारी इनिंग..


 तुझ्या - माझ्या नात्याची नसावी कोणतीच एक्सपायरी डेट, 

आपल्या नात्यात शिरू नये कुठलेच गैरसमज,असावी एवढी क्लिऍरिटी थेट.. 


तुझ्या माझ्या नात्यात असावा गोडवा प्युअर, 

आपल्या या नात्याबाबत असावे आपण एवढे श्युअर.. 


बोक्या- बोकीची जोडी आपली, असावी कायम परफेक्ट;

माझ्या मनातलं तुला कळावं अन् तुझ्या मनातलं मला कळावं, असं असावं मनाचं मनाशी कनेक्शन आपलं डायरेक्ट.. 


बेस्ट नसलं तरी असावं आपलं नातं क्युट, 

रुसवा - फुगवा असला तरी मतभेद असावेत कायम म्युट.. 


हातात हात गुंफून, करू पार सारे आपण अप ऍंड डाऊन्स;

घेशील ना मला सांभाळून, न जाता कंटाळून.. 


नववर्षाच्या उंबरठ्यावर करू आपण अशी न्यू बिगनिंग, 

आपल्या या क्युट नात्याची, करू एक भारी इनिंग.. 


पाहून आपलं नातं जगंही स्विकारेल लवकरंच प्रेमाची ही आगळीवेगळी कॉन्सेप्ट.. 

म्हणून हवी मला साथ तुझी, साकार करण्यासाठी नात्याचं हे ड्रीमप्रोजेक्ट.. 


©®

✨❣️ श्रावणी ❣️✨