मनातील एक कोपरा "डायरी"

मनातील एक गोड आठवण म्हणजे डायरी

आज ती खूप दिवसा नंतर तिची डायरी लिहायला घेतली होती हल्ली तिचा कडे  स्वतः साठी खूप कमी वेळ मिळायच्या घर झाल की ऑफिस , ऑफिस झाल की घर या गोधळात ती डायरी लिहायच विसरून जायची आणि डायरी लिहायच आठवलं तरी घरी दमून आल्याने इच्छा होत नव्हती. त्यात तीच अचानक लग्न झाल तेही तिचा कॉलेज मधला मित्रा सोबत कॉलेजमध्ये असताना दोघेच एक मिन सुध्या जमत नव्हत अख कॉलेजला  मीरा आणि प्रतीकच भांडण माहीत होत पण नकळत का होईना दोघेही एकमेकाच्या प्रेमात होते कॉलेज झाल पण त्यांनी काही सांगितलं नाही .नंतर दोघेही आपलं आपल्या मार्गाला लागले पण प्रतीकला तर काही करून मीरा सोबतच लग्न करायच होत आणि त्याने तसं काही घडवून  पण आणलं आणि मीरा सोबत लग्न केलं. रोज काहीन काही वाद भांडण कधी कधी गोड भांडण त्याच होतच होत असेच दिवस पण जात होत. प्रतिकने तर मीरा त्याचा मनातल सांगितल होत  मीरा ला पण आता प्रतीक आवडायला लागला होता पण मन मानत नव्हतं कारण तिला अस नेहमी वाटायच की जे आपले असतात तेच आपल्या तोडतात आणि तिचा आयुष्यात तसे काही अनुभव पण होते. आणि आज नेमक ऑफिस मधून  सुट्टी होती आणि आज प्रतीक पण घरी नव्हता ऑफिस मधून बाहेर गावच काम आलं होत त्यामुळे तो पण 2/3 येणार नव्हत त्यामुळे तिचा कडे निवांत असा वेळ होता आणि जाताना त्यानी तिला खूप गोड गोड प्रश्न केले होते त्याच प्रश्नची उत्तर ती डायरी मध्ये लिहायला सुरुवात करते.....

त्याने तिला विचारल होत की आता  मी दोन ते तीन दिवस दिवस नसणार तर तुला माझी आठवण येणार का? याच प्रश्नांचा विचार करत ती स्वतःशीच हसते आणि  डायरी लिहायला लागते.

आठवण हा तर खूप छोटा शब्द आहे भावणेसाठी जो मी आता तुझ्यासाठी ठेवण सूरू केलं आहे. आणि ..... आणि आता मलाच स्वतःची भीती वाटायला लागली आहे. खरच एखाद्यावर प्रेम करणं माणसाला खूप कमकुवत करते  खूप असाह्य , मजबूर , निराशा, आणि मला या तिन्ही गोष्टींचा तिरस्कार आहे. पण ....पण त्याचा नंतर सुद्या तु माझ्या आयुष्यात खूण बनत आहेस...


आणि तु मला विचारतो की मला तुझ्याबदल काय आवडते?मला तुझ्या बदल अशी कोणती गोष्टी आहे जी आवडत नाही. तुझं माझ्या अवती भवती फिरणं, तुझे खोल बोलके डोळे जे मला एका वेगळ्याच विश्वात नेतात, तुझं माझ्या वर जीव जिवओतून प्रेम करायच्या अंदाज. प्रत्येक वेळी माझ्या सोबत सर्वांत पाहिले तु उभा असतो आणि तेव्हा माझ्या मनात तुझ्या बदल एक वेळी भावना तयार होते जी मी शब्दात नाही मांडू शकत आणि अस अशा कितीतरी गोष्टी आहेत जा मी तुझ्यावर प्रेम करायला तु मला भाग पाडत आहे.

पण मी हे कधीच नाही सांगणार माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तुझ्या प्रत्येक वचनावर हसणार, प्रत्येक गोष्टीवर तुझी खिल्ली उडवणार आहे. तु मला नेहमी सोबत घेऊन चालणार आहे पण ...पण मी तुझ्या समोर रेतीची भिंत म्हणून नाही राहू शकत .कारण मला आता तुटण्याची भीती वाटते.

डायरी लिहून झाल्यावर ती शांत बसून विचार करते की खरच प्रतीक किती प्रेम करतो आपल्यावर याच प्रेमासाठी आपण नेहमी तडपत आलो आहे . कधी विचार नव्हता केला की आपल्या वर पण कोणी इतक भरभरून प्रेम करणार ती तिचा मनाशी एक विचार करते आपण प्रतीकला आयुष्यभर साथ देऊ पण त्याचा अडकून नाही राहू. तिचे विचार चालूच होते त्याच तिचा फोन तर रिंग होते आणि स्क्रीन वरच नाव वाचून गलाच हसते आणि डायरी बाजूला ठेवून फोन receive करते कारण फोन प्रतीकचा होता.