झाले मोकळे आकाश-५

.....










घर जवळ आलेलं दिसलं तसं वाहत्या डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि समोरून न जाता तसचं मागील दरवाजातून घरात गेले. 


आई स्वयंपाकघर आणि हॉलच्या दरवाजात मध्येच ऊभी होती.त्यांच्याशी हसून बोलताना तिची नजर स्वयंपाकघराकडे वळली आणी मी आलेली दिसले तशी ती त्यांना आलेच म्हणून पटपट चालत माझ्याजवळ आली. 




" काय गं नकुशे, एवढा वेळ लागतू वय साखर आणाया.का तीथचं हुंदडत बसली व्हतीसं.एक काम धड नसतयं.आणं म्या तूला येताना तूझ्या बाला बोलवून आणायला सांगितलं व्हतं.सांगितलसं का त्वा ?का आलीस उड्या मारत वाण्याच्या दुकानातनं घराकडं " मी आईच्या हातात साखरेचा पुडा आणि उरलेले पैसे टेकवते न टेकवते तोचं आईने माझ्यावर ओरडायला सुरवात केली. 




" सांगितल पण..." आईची तीक्ष्ण नजर माझ्यावर अशी काही रोखली होती की बस्स पुढचे शब्द घशातचं अडकले. 




" पण काय? इथ बी हायचं का तूझा खोडता.एक काम धड नाय.काय म्हणतं ती? " ती त्रासिक नजरेने समोर गॅसवर चहाच आधणं चढवतं मला हळू आवाजात दटावत होती.नाहीतर एरवी तीचा मला ओरडत असल्याचा आवाज मागच्या गल्लीत राहणाऱ्या आमच्या पाठीमागील घरातील शकूकाकूंना पण ऐकू जायचा. पण आज घरात पाहुणे आलेले ना मगं त्यांच्यासमोर कसं मोठ्या आवाजात ओरडणार म्हणून हे असं हळू आवाजात दूषणं देणं. 



मी फक्त मख्खासारखी तीथे ऊभी होते.आधीचं पुर आल्याप्रमाणे वाहिलेल्या अश्रूंना कसबस थोपवलं होतं तोवर अजून एक शब्दप्रहार !


पाण्याने काठोकाठ भरलेले लालसर डोळे...चेहर्‍यावर भितीची छटा...बोलायचं होतं पण आईचा रुद्रावतार पाहून ओठ गच्च मिटलेले...




" अगं आता बोलतीस का?काय म्हणलं ती? " दोन्ही हात कमरेवर ठेऊन ती खाऊ की गिळू अशा नजरेने माझ्याकडे पाहत होती.



" म...मला यायचं तवा यील ,अ...असं म्हंणलं " मी तसचं काहीतरी बडबडत सांगीतलं. 



" देवा...तू सांगितलं नाय का नीट त्यास्नी?" तीचा आवाज कमालीचा त्रासिक झालेला. 



" सांगितलं पण तसं म्हणलं " मी हळूघ पुटपुटले. 


तीने दातओठ खात मान नकारार्थी हलवत समोर चहाच्या पातेल्यावर नजर फेरली. 


चहाला उकळी आली तसा दोन कपात चहा ओतून माझ्या हातात टेकवत बाहेर देऊन ये असं सांगितल.तोपर्यंत मी मागच्या मन्याला बाबांना बोलवायला पाठवते अस सांगून ती पाठीमागच्या दरवाजातून घामेजलेले कपाळ पदराने टिपून घेत बाहेर पडली. 


माझे हात कमालीचे थरथरत होते.हातातील चहाचे कप केव्हाही निखळून खाली पडतील आणि फरशीवर चहाचं सडाशिंपण होईल अशी अवस्था...मन आतून खूप घाबरघुबरं झालेलं.



आजपर्यंत आईने अपशकुनी म्हणून कधीचं बाहेरचं कोणी आलं किंवा पाहुणे आले तरं त्यांच्यासमोर जाऊ दिलं नव्हतं.कोणी घरी आलं की मला बाहेर यायला परवानगीचं नसायची.उगीचं पुन्हा माझ्यामुळे पाहुंण्यासमोर वितुष्ट नको म्हणून आधीचं खबरदारी.स्वयंपाघरातील काम आणि त्या कामांना जुंपलेली मी.एवढचं काय ते काम असायचं मला कोणी आलं की.कधीचं कोणासमोर गेले नाही आणि आज चक्क माझ्या हातात चहाचे कप सोपवून आई रिकामी झालेली. 



तशीचं कशिबशी हिम्मत गोळा करत ,लटलटत्या हातात चहाचे कप आवळून धरण्याचा प्रयत्न करत स्वयंपाघराचा दरवाजा पार केला.


ते बाबांचे मीत्र आणि त्यांची बायको समोरचं बसलेले.आईने पाणी आधीचं दिलं होतं.मी हळूहळू चालत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्यासमोर चहाचे कप पकडले. 


माझी मान खालीचं झुकलेली.मान वर करून कोणाकडे बघायची हिम्मत नव्हती. 



" अगं चहा वगैरे कशाला बाळा.ताईंना म्हणालो होतो आत्ताच तर थोड्यावेळापूर्वी जेवण केलं " त्या बाई हसून मला चहाचे कप हातात धरून ऊभं राहिलेलं पाहुन म्हणाल्या. 


मी काहीचं बोलले नाही फक्त हात थोडा पुढे सरकवला जेणेकरून ते लवकर कप घेतील आणि मी तीथून आमशतमध्ये जायला मोकळी. 


त्या दोघांनी कप हातामध्ये घेतला तसं मी पाठमोरी वळत एवढावेळ रोखून धरलेला श्वास सोडला आणि पटपट आत निघाले. 




" अगं, नाव काय बाळं तूझं? " दोन चार पावलं टाकते न टाकते तोचं पाठिमागून त्या बाईंचा सोज्वळ आवाज आला. 



मी आहे त्या जागीचं ऊभी होते. अंगाला कापरं भरलेलं.आता काय बोलू ? 


भैरवी की नकूशी?  


भैरवी सांगू? पण आईला काही विचारलं आणि तीने नकूशी सांगितलं तरं? 


मगं नकूशी? पण ते नाव मला कधीचं आवडत नाही.सतत मला न केलेल्या चूकांची आठवणं करून देतं.पुन्हा त्या कटू आठवणी...तो त्रास...मनाला लागेलं असं बोलणं...रोखलेल्या नजरा...नकोस वाटतं मला! 



" खूपचं लाजरी आहेस की.बोलतचं नाहीस काही.की आम्हाला पहिल्यांदाचं पाहीलसं म्हणून संकोच वाटतोय? " त्यांच बाई म्हणाल्या. 



" मेधा, तीला नसेल सांगायचं तर नको जबरदस्ती करु.बहुतेक तीला आपल्याला पाहून दडपण आलं असेलं. " ते काका म्हणाले. मला हायसं वाटलं. 



"अगं आम्ही घरचेचं आहोतं बाळा.आम्हाला काय लाजायचं.तूला नसेल सांगायचं तरं राहूदे.पण चहा छान झालायं हं " त्या बाईंनी तारीफ करत स्मितहास्य केलं. 



माझी द्विधा अवस्था झालेली. 


त्या जोडप्याच्या वागण्या, बोलण्यात खुप आपुलकी जाणवतं होती.आजपर्यंत शाळेतील बाई आणि माझी एक मैत्रिण सोडली तर आजवर कोणीचं माझ्याशी एवढं आपुलकीने बोललं नव्हतं, ना ही काही विचारलं होतं. 



मला सांगायचं होतं. पण माझा एकलकोंडा स्वभाव आडवा येत होता.भरभरून बोलायचं होतं पण शब्दचं हरवले होते.मुक्त होऊन बागडायचं होतं पण सततच्या दबावामुळे आणि बंदिस्ततेमुळे मनाप्रमाणे जगणं कायं असतं याची मुळी कल्पनाचं नव्हती.सतत आपलं घरच्यांच्या दबावाखाली. ते म्हणतील ते ऐकायचं,ते सांगतील ते करायचं...तोंडातून ब्र शब्द काढायचा नाही. 



या अपशकुनीपणाच्या आणि लागोपाठ मुलगी म्हणून जन्माला आल्याच्या धब्ब्यामुळे आवाज कायमचा घशातचं दाबला गेला होता.स्वतःचं असं अस्तित्वचं नव्हतं.कठपुतलीप्रमाणे वावरायचं. 



माझं मन विचारमालीकेत अडकलेलं असतानाचं आई आली.मला तीथेचं ऊभं पाहून तीने एक रागभरा कटाक्ष माझ्यावर टाकला आणि हसून त्या जोडप्याला सामोरी गेली. 



" अहो ताई कशाला चहा पाणी करत बसलातं.जेवूनचं तर आलेलो आम्ही." त्या बाई आईकडे पाहून हसतं म्हणाल्या. 



" आवं असूद्या. लयं दिसानं आला तूम्ही.खरतरं जेवणचं कराया पाहिजे व्हतं पण तूम्हाला लवकर जायचं हायं.तूम्ही बसा म्या पोहे करते पटापट तवर हे येत्याली " आई असं म्हणाली आणि मला डोळ्यांनीचं खुणावत स्वयंपाकखोलीत चल असा इशारा केला. 



" अहो वहिनी, आता काही नको.पुन्हा केव्हातरी येऊ स्पेशल जेवणासाठीचं.रामा आला की त्याला भेटून निघतो आम्ही " ते काका काकूंकडे पाहून हसत म्हणाले. काकूनीही हसत होकारार्थी मान डोलावत संपत्ती दर्शवली. 



" आव, कितीकसा वेळ लागतूय तवा.बसा मी  आलीचं" आई 



" अहो ताई तुम्ही बसा इथं.राहूद्या पोहे वगैरे.या छोटीला आम्ही नाव विचारतं होतो पण भलतीचं लाजाळू बाई.बोलेनाचं काही " 



आई माझ्याकडे पाहून कशीतरी हसली. 



" ती जरा तशीचं हायं.बोलत नाय कुणासंग जास्त " आई म्हणाली. 



" हो वाटलचं तिच्याकडे पाहून. पण छान सालस आहे बरं.आणि दिसतेही सुरेख !" त्या माझ्याकडे पाहून माझं कौतूक करत म्हणाल्या. 


"व्हयं "आई फक्त हसली. 


" काय करते?शाळेत की कॉलेजमध्ये जाते? " त्यांनी प्रश्न विचारणं चालूचं ठेवलं.


मी आणि आईनं एकाचवेळी एकमेकींकडे पाहीलं.मी घाबरलेले. आई ही गडबडली. 



" अं...ती नाय जात कॉलेजात.घरीचं असती " 



" काय गं शिकायला आवडतं नाही का तूला?" त्यांनी माझ्याकडे हसून पाहत विचारणा केली. 



मी आईकडे पाहीलं.आता काय बोलू असे आविर्भाव चेहर्‍यावर. 


आवडतं नाही?  तीच तर अशी एक गोष्ट आहे ज्यातं माझं मन रमतं.मला खूप आवडतं शिकायला.पण काय सांगणार होते? 


सगळे संवाद मनातचं!


" तीचं बाबा म्हणलं बासं आता शिक्षाण,आता थोडफार घरकामात लक्ष घातल म्हणजी मगं पुढं सोपं जाईल तीला " आईने काहितरी कारण चिटकवलं. 


मन आतून खुप ओरडतं होतं. मला शिकायच आहे .खूप खूप मोठ व्हायचं आहे मला. स्वतःच्या पायावर ऊभं राहायचं आहे.हे सगळे पाश तोडून मुक्त व्हायचंयं मला पण ते सर्व मशातचं ओठावरं कधी आलचं नाही. 


दरवाजा वाजला.बाबा आले होते. दरवाजातं अडखळून पडता पडता सावरत कसे बसे आत आले. 


धडपडत आतमध्ये आले.तसेच झुलतं ,डुलतं आमच्यासमोर उभे राहीले. नशेत धुत्त डोळे किलकिले समोर पाहीलं तर दोन धुसर आकृत्या त्यांना दिसत होत्या पण ओळखू मात्र येत नव्हतं. 



" अरे रामा. मी शिवा...शिवाजी माणिक.तूझा दोस्त रे. काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची.प्यायला कधीपासून लागलासं तू? " बाबांना अशा अवतारात पाहत त्या काकांना जबर धक्का बसला.काकूही बाबांकडे बघतं होत्या. 




" शि... शिवा..." बाबांनी उघडझापत्या डोळ्यांनी समोर बसलेल्या काकांना बाबांनी आवाज दिला. 



" हो शिवाचं! पण हे रे काय? हे असं कसं? " ते अजूनही अविश्वासू नजरेने बाबांकडे पाहतं होते. 



शेवटी बाबांना एका खूर्चीत बसवतं आईनेच डोळ्याला पदर लावला. 



" आवं नोकरी गेल्यापसनं हे असचं असतयं रोजं.किती समजावलं तरी ऐकतं न्हायती....


खूप काही सांगत होती पण फक्त माझ्याबद्दल सोडून. 



" शेवटी त्या काकूंनी आईशेजारी बसतं आईच्या खांद्यावर हात ठेऊन आईला धीर दिला आणि सगळं ठिक होईल असं सांगितलं. 



" अगं...ये.. .रडाया काय झालं ? जा च..हा पाण्याचं ब...घं जा " आईला असं रडताना बघून बाबांनी भरलेल्या शब्दातचं आईला दटावलं .आईने पटकन पदराने डोळे पुसले. 



" अरे, आत्ताचं चहा- पाणी झालं आमचं.या छोटीनेचं चहा दिला होता बघं आणूनं " काका म्हणाले. 



तसं बाबांची नजर माझ्यावर वळली.मी भ्यायले.तशीचं मागे मागे पावलं टाकतं आतल्या दिशेने सरकू लागलेले. 



"हो ना " काकूंनी दुजोरा दिला. 



" अरे रामा, तूझी अवस्था अशी.निदान त्या पोरीला तरी पुढे शिकुदे. वहिनी म्हणत होत्या तू तीला शिकायला नाही म्हणालासं. "


आई आता चांगलीचं घाबरली.मला ही काही सुचतं नव्हतं. बाबांनी रागात काही करु नये एवढचं! 



" रामा अरे, फार चुणचुणीत दिसते रे पोरगी.माझ्यामते तू ती तूला पुढे शिकायला पाठवं.नाव काढेल बघं तुझं " ते काकाचं पुढे बाबांकडे पाहून म्हणाले. 


पण त्यानंतर बाबा जे काही म्हणाले ते ऐकून मी सुन्न झाले. भोवळ यायची बाकी होती फक्त! 



" तिचं ल...लगीनं ठरलयं...पुलीस पाट..लासंग.मगं आता कशाला पायजी शिकाया?...तीचा नवर...रा आण ती बघलं पुढं "



माझं लग्न आणि ते ही... 


पोलीस पाटलासोबतं...चाळीशी ओलांडलेल्या त्या प्रोढासोबत माझ लग्न ?केव्हा आणि कधी ठरलं? 



मला काहीचं कल्पना नव्हती. आईकडे बघितलं आईची पण थोडीफार माझ्यासारखीचं प्रतिक्रीया. 



" पुढच...च्या महिन्यात धरलाय मुहुर्त...आताचं आम...मंतर..त्रण देतूया..यायचं बघं सगळ्यानी.बरं का व...ह्यनी. " बाबा तसेच खुर्चीवर झुलत बडबडत होते. 


माझी मात्र मती गुंग झाली होती. 


राहून राहून तेचं शब्द डोक्यातं भिरभिरतं होते. 


माझं लग्न...पोलीस पाटीलासोबतं...पुढच्या महिन्यात...लग्न...माझं... 


क्रमश : 



पुढील भागात... 


नवर्‍या मुलाची आली हळद ही ओली 

हळद ही ओली लावा नवरीच्या गाली 

हळदीन नवरीचं अंग माखवा 

पिवळी करून तीला सासरी पाठवा...




Hello ink drinkers, 


भाग कसा वाटला नक्की सांगा.एक सांगायचं होतं काही शब्द जरा गावाकडचे आहेत तर ते स्पेलींग मिस्टेक नाहीये तसे लिहीलेत ते शब्द.गावबोली वाटावी म्हणून.



बाकी, काय होईल आता पुढे विचार करा, सांगा कमेंट्स करून. 


कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथेचा मजकूर कोणी चोरी करण्याचा अथवा कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा तसे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


©️मनमंजिरी?



🎭 Series Post

View all