ज्याचा त्याचा धर्म..

अनुवाद कविता

मूळ कविता - पं. नरेंद्र शर्मा (भाषा- हिंदी) 

अनुवाद - ✨❣️ श्रावणी ❣️✨

 अनुवादित कवितेचे शीर्षक - ज्याचा त्याचा धर्म! 



हिंदूंची हिंदूत्वशाही पाहिली, 

पाहिली तुर्कांची तुर्कीही.. 

वर्षानुवर्षे राहिले एकत्र ते, 

पण दोन्ही पाणी आणि तेलासारखे;

आम्हा दोघांनाही परस्परांचे

 फक्त दुर्गुणच दिसले! 

घराघरात शहराशहरात 

आम्ही लावली आग निर्दयपणे! 

नावंच आमचे तेवढे वेगळे 

 पण कृत्याने मात्र आम्ही सारीच एकसम भावंडे! 

नावाचाच चालतो धर्म इथे, 

एरवी असते सुरू सांगणे, ज्याचे त्याचे रडगाणे! 

 देवमाणसांची करून निर्घृण हत्या

स्वतःचेच गुणगान तेवढे आम्ही गायले! 


©®

✍️

✨❣️ श्रावणी ❣️✨