जेव्हा पाहुणे येती... घरा.

पाहुणे किती प्रकारचे असतात. आणि त्याच्यामुळे होणारा त्रास. हे विनोदी किस्से येथे थोडक्यात सांगण्याचा पर्यत केला आहे.
सकाळचे 7वाजले होते. सर्वजण अजूनही अंथरुणात  पडून होते. तेवढ्यात मनोजच्या मोबाईलची रिंग वाजली. मनोज तसाच घाई गडबडीत उठून अगोदर आपला चष्मा शोधू लागला. आता चष्मा तर सापडला होता पण मोबाईल काही सापडे ना.
शारदा नुकतीच अंथरुणात उठून बसली होती. तिचे लक्ष अचानक मनोजच्या वाजणाऱ्या मोबाईलकडे गेले. तसा तिने मोबाईल उचलून मनोजच्या हातात दिला.
 मनोज :- "थँक्यू शारदा ".
 मनोजने कॉल रिसिव्ह केला.
मनोज :- "नमस्कार सरूआत्या, कश्या आहात....??"
आत्या :- नमस्कार मनोज बेटा, मी बरी आहे, पण माझं जरा काम होत तिकडे मुंबईला म्हणून यायचा बेत होता.
मनोज :- "हो,हो....!!'
या कि सरूआत्या कधीही, तुमचचं घरसमजून या हं..!!" 
आज येता आहेत कां...? बर या,मी येतो घ्यायला.( हसत हसत म्हणाला.कॉल ठेऊन झाला ना झाला तोच.)
 शारदा  :- "आहो एवढ्या सकाळी सकाळी कुणाचा फोन आला तुम्हांला...?
मनोज :-"अगं सरूआत्या यायचं म्हणते आहे इकडे, तिला काही काम आहे म्हणून आणि असही ती दोन-तीन दिवस राहून जाणारचं आहे म्हणते .
 शारदा:- " अरे बापरे..!! सरुआत्या...!! आणि केव्हा येणार म्हटलं तुम्ही...? " ( आत्या म्हटल्यावर शारदाच्या कपाळावर शंभर आड्या कवायत खेळू लागल्या .)
(आत्ता पर्यत अंदाज लागला असेल तुम्हांला की शारदा  मनोज,आणि पियुष व शितल  ह्यांचं एक कुटुंब.)
 कारण सरू आत्या होत्याच तश्या. डोक्याला ताप वाढणार आत्ता म्हणून शारदा लगबगीने उठली. पट पट  आवरून स्वयंपाक करायला लागली.रोज निवांतात काम करणारी शारदा आज पिसाटलेला कुत्रा मागे  लागल्या सारखी काम करू लागली.??
 मनोज :-"आत्ताच काही ती 10 वाजेपर्यंत येतें म्हटली. मी त्यांना घेऊन येतो. तेवढ्यात तू त्या दोघींना उठव, बरं आणि पटकन फ्रेश व्हायला सांग ...!!"
शारदा :-"अगं शितल, आणि पियूष उठारे...!!" आज काय तुमचे खरे नाही...!!"
शितल :- " काय गं, आई आज रविवार आणि तू, झोपू ही देत नाही...!!"
"काय आहे का आज..??
"साफ सफाई असेल तर तूचं करून घे बाई, कंटाळा आला आहे मला आज, नको ना उठऊस प्लिज..!!"?
शारदा :- " अरे नालायकांनो उठा, साफ सफाई नाही सांगत मी तुम्हांला करायला, तुमची आजी येणारआहेत इतक्यात.
तुम्ही तर सरू आजीला ओळखणूच आहात, त्यांच्या समोर असे तुम्ही 2घी झोपून राहिला तर त्या माझ्यावर रागावतील.
 पियूष :- " काय...?(आश्चर्याने डोळे विसफारात बोलला.)
सरू आजी अरे बापरे...!!"(मोठ्यांने हसून, तो महाकाय प्राणी.. आज इकडे कसा सकाळी सकाळी. )
म्हणजे आई...तू आजपासून दिवसभर  स्वयंपाक घरातली  हॉटेल चालवणार...?
शारदा चिडली की ती लवकर मंजुलिका  होते, हे घरात सर्वांचं माहीती होते. त्यामुळे तिला न चिडूदेणेच बरे होते.?

घरी कुणी पाहुणे येणार म्हटलं की त्या दोघीं भावंडांनच्या अक्षरश: अंगात यायचं आणि त्यात जर पाहुण्यांनसोबत त्यांच्या वयाची मुलं असली की विचारायलाच नको मग. घरात नुसता धुमाकुळ बघुन शारदाचा चेहरा मात्र बघण्यासारखा व्हायचा. 

शारदा स्वभावाने अगदी गरीब आणि मनोज प्रचंड प्रेमळ असला. तरी शारदाचा अवतार चिडून मंजुलिका व्हायला वेळ नाही लागायचा. ??त्यामुळे मनोज बिचारा  धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का असा होऊन जायचा.??जितका वेळ शारदा समोर जाता येत नाही तितका तो स्वतःला सेफ समजतं होता. 

शितल ने आणि पियुषने पाहुण्यांची ढोबळमानाने दोन ग्रुप्समधे विभागणी केली होती,?

पहिला भाग म्हणजे: - भेटायला येऊन  खाऊन जाणारे पाहुणे.

दुसरा भाग म्हणजे :- घरी रहायला येणारे  आणि जास्त दिवस राहून त्रास देणारे पाहुणे.पण दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांची इक्वली बघता वाईट अनुभव घेतलेले. त्यामुळे दोघी सारखेचं. आओ जाओ घर तुम्हारा. त्या पैकी सरू आत्या होती दुसऱ्या भागात मोळणारी. ??दरवाजावरली बेल वाजली तशी सर्वांनच्या डोक्यातली ट्यूब पेटली. आत्या बाई आली... ?

शितल ने दार उघडले,तशी सरूआजी समोर जगदंबा सारखी उभी. बाजूलाच भली मोठी बॅग, अंदाज लावला बघूनच कि जास्त दिवसासाठी आलेली दिसते,?? सोबत आजीचा 9 वर्ष्याचा नातू. त्याला बघून अजूनच डोकं फिरलं शितलंच.कारण आजी खेळे गावातली. आणि वरून आजीला दिवसभर टीव्ही बघण्याचा शोक.मुलांची परीक्षा जवळ येणार होती म्हणून शारदाने टीव्ही बंद करून ठेवला होता.आजी घरात पाय कि दारात पाय. विचारू लागली.

सरूआजी :- "शारदा , स्वयंपाक झाला ना तुझा...?"

शारदा :- " हो आत्याबाई...!!"

जेवण खावणं आटपट नाही,तेवढ्यात झोपण्याची तयारी, झोपून होत नाही तेवढ्यात चहाची तयारी, ते होत नाही,तेवढ्यात टीव्ही वर सत्संग लावण्यासाठी बटणाला हात पुरतं नाही, म्हणून हातातल्या काठीने जो मार मार केल बटणावर आजीने तर बटनच फोडून बाहेर काढलं. ??

अजून कुणाला समजू नये म्हणून गप सोप्यावर झोपून राहिली.??? रात्री लाईट गेलेली बघून सरू आजीचा लहान नातूने,शोकेश जवळ ठेवलेली पिशवी  घेऊन आला. त्यातून बॅटरी काढून जो त्याने गाडी गाडी खेळायला सुरवात केली. मग सलग 2तास काय घ्यांग$$ घ्यांग $$ आवाज काढत ओरत राहिला. सगळ्या घरात गाडी फिरू लागली. तसा पियुष आणि शितलचा जीव खाली वर झाला. शारदाला वाटलं मुलगा काच फोडतोय कि काय अंधारात. पण मुलाला बोलणार कस सरु आजीचा नातू तो... ??

थोडा वेळाने तो मुलगा शांत बसून राहिला. शितल आणि पियूषला वाटलं मुलगा झोपला असणार, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला,पण तो मुलगा गप अंधारात बसून राहिलं होता.परत शारदाला वाटलं की मुलाला अंधारात  काही लागलं असेल  म्हणून गप्पा झाला असेल, मुलाचे गप्प रहाण्याचे कारण काही भलतेच होते, मुलाने बॅटरीच्या धक्क्याने शोकेशची काच फोडली होती. मग त्याने बॅटरी सोप्या मागे फेकून दिली होती.तशी  शितल त्या मुलाजवळ गेली, मग काय आधीच तो घाबरलेला होता . त्यातच तो ओरडू लागला " मी नाही काच फोडली , मी खरंच नाही फोडली " तो खूप घाबरून हात पाय झाडत ओरडायल लागला .??त्याच्या अशा ओरडण्याने शितल ही जाम घाबरली.?जाऊ दे, जाऊ दे म्हणतं,सरू आजी लगेच धावपळ करत आली.

लहान आहे तो अजून, आणि काच  तर फोडली त्याने बर अजून त्याला काही लागलं नाही बाई....!! शिव शिव. जीव वाचला त्याचा....!!"?? गंमत अशी
झाली चोर तर चोर वर चोरावर मोर...
नंतर दुसऱ्या दिवशी सोफ्यावरचे सगळे कुशन्स खाली आलेले होते. कुठे कुठे जास्त धसमुसळेपणा केल्यामुळे उशीची कुशन्स उसवले होते. झाडांची पाने, कच्ची पक्की सीताफळे तोडुन बागेत पडलेली होती,डायनिंग टेबलच्या खुर्च्या बैठकीच्या खोलीत सापडत होत्या, तसेच डायनींग टेबल जणू हॉटेलच झाले होते.हे बघून शारदाचा पारा 99 वर गेला.
तेवढ्यात सरू आजी ,
" जाऊ दे गं...!!!" लहान मुले ती असेचं करायची (हसत हसत निघून गेली. )??
आत्ता शारदा मंजुलिका होणार त्या अगोदर मनोज  समोर आला. तोच सर्व पारा त्याच्यावर उतरवण्यात आला. बिचारा हसत हसत म्हणाला.
मनोज :- "ती जरा चिडते पण काही नाही, तिचा राग अगदी लवकर जातो सरू आत्या. हे काय नेहमीच  तू रहा निवांत... हम्म काळजि नको करू हा तू...!!"?(मनोजला आतून मात्र भिती वाटत होती, आत्या जाताच हातात लाटणे घेऊन, तुला पहाते रे सिरीयल लागायला वेळ नाही लागणार आपली.हे चांगलेच ठाऊक झाले होते. )???
कसे बसे  सात आठ दिवस काढून त्यांना रवाना केले. तोच  मनोजच्या मित्राची बदली इकडेचं मुंबईमध्ये झाली .त्यामुळे सुरवातीचे 10-12 दिवस तो मित्र आणि त्याची बायको आपल्या सोबत राहतील अस मनोजने घरात  सांगितलं. शारदाने स्वतःचा थकवा दूर होईल म्हणून अगदी आनंदाने होकार दिला. नाही तरी तिला तिथे कोणी मैत्रिण नव्हती. त्यामुळे मी एकदम खुश. मनोज मात्र गालातल्या गालात हसत होता.आता शारदाला कळल कि त्याला एवढं हसु कसलं येत होतं ते. त्यांच घर 4 खोल्यांच होतं. बैठकिची खोली, स्वयंपाकघर,बेडरूम आणि देवघर. त्या पाहुण्यांची व्यवथा देवघरात केली होती.ते ठरल्या दिवशी आले यांच्याकडे सुरवातीला एकदम मोकळे फ्रेंडली वाटले.
 शारदाला वाटलं सुरूवात तर छान झाली. पण नंतर त्यांची वागण्याची एक एक रीत बघायला मिळाली. त्या मित्राची बायको प्रेग्नंट होती. त्यामुळे आधिच शारदावर जरा दडपण आले. तिला नेमके काय काय खाऊ वाटे,ते शारदाला वेगळे बनवावे लागे. ती अक्कबाई आरामात उठायची सकाळी 9.30 पर्यत. मग तिचे अंथरुणत  पांघरून आवरून ठेवायचे शारदानेच.पलंगावरच बसल्या बसल्या ती चहा घोटायची?.मग निवांतात चहा पिऊन झाला कि बशी तिथेच ठेऊन द्यायचं हे तीच ठरलेलं काम. डुलतडालत जाऊन अंगोळ आटोपायची.आंघोळ झाली की मेक अप करून तयार व्हायला परतअर्धा तास घालावायची.शारदाला कळायलाच मार्ग नाही की घरीचं तर बसायचं आहे तर एवढा मेक अप कशाला.आणि वरून शितलची लिस्टिप लावून बाईसाहेब तयार व्हायची . ??.
शारदा आपली सकाळी सहालाचं उठुन घराला झाडू मारून भराभर आंघोळ आटोपायची,की जो बुचडा बांधायची तो बाहेर जायचं नसेल तर तसाच. मग कपडे भिजवा, नाश्ता बनवा. नवर्‍याला द्या, त्याच्या मित्राला द्या.
ते दोघे मित्र नाश्ता करून निघुन बसायचे.मग ती तयार झाली की हातात गरम नाश्ता परत कप 2 कप चहा. असा मनसोक्त नाश्ता झाला की मग हे दोघी नवरा बायको निघुन जायची तिच्या एका मैत्रिणीकडे. शारदा परत घर आवर बसायची , जेवणाची तयारी करत करत वेळ जायचा.
जेवायच्या वेळेला नवरा बायको यायचे जेवायचे आणि परत दुपारची झोप काढायला आपल्या खोलीत निघुन जायचे. झोप झाली की परत चहा आणि तयार होऊन बाहेर गेले की थेट रात्री साडे नऊलाचं जेवायला घरी यायचे. परत रात्रीचे जेवण झाले की त्यांच्यासोबत फिरायला जावे लागे. नाही म्हणायची सोय नाही कारण पाहुणे होते ते.?
एक दिवस तर तो मनोजचा मित्र चक्क घरातच नखं कापुन फरशीवर टाकत होता. पियुष धावत पडत आला आणि शारदाला कानात सांगू लागला. शारदा एकूणच मंजुलिका झाली. रागात जाऊन बोलली.
" अहो खाली पेपर वगैरे घ्यायचा ना...भाऊजी.!!"?आताच तर घर झाडले आहे, फरशी साफ केली आहे. तर त्यावर हसुन ते महाशय म्हणाले.
" काही नाही होत वाहिनी राहू दया. मला अशिच सवय आहे आमच्याकडे आम्ही असेच करतो...!!"
शारदाने कपाळावर हात मारून घेतला.अजून काय बोलणार पाहुणे होते ते... थोडक्यात आटोपले नाही तर त्या महाशयचे काय आले असते देव जाणे... ??
 अजून एक किस्सा, त्याची बायको रेस्टरूमला ज्या स्लिपर घालुन जायची त्याच स्लिपर घरभर वापरायची. त्यावर शितल आणि शारदाला किळस यायची. शिवाय त्यांची सोय देवखोलीत केली होती.

तिथे ही अक्काबाई ,त्याच स्लिपर घालुन यायची. अक्षरश: तिच्या झिंज्या उपटाव्याश्या वाटायचं पण शारदाला थोडक्यात कुणी आवरणारे भेटले की मंजुलिका अंगातून बाहेर निघायची. ???