जुनी चाळ. (एक आशेचा किरण भाग 1)

जुनी चाळ. (एक आशेचा किरण )ही कथा आहे एका आशेचा किरण पाहणाऱ्या मुलीची जीने रंगावली होती जीवनाबद्दल अनेक स्वप्न.
ती उदासपणे एकटीच बसली होती.... घराची प्रत्येकाची आवडती एक जागा असते तशीच काहीशी  तिची आवडती जागा... म्हणजे त्या अंधाऱ्या खोलीतली खिळकी.  त्या जागेवर ती  बसली होती. तिच्या डोक्यात काही विचार चालले होते.
सूर्य डोक्यावर आला होता. बाहेर ऊन सावली लपंडावं खेळतं बसलेले होते. तेवढ्यात बेडरूमचे दार ठोकण्याचा मंद आवाज तिच्या कानावरून गेला. पण मागे मान करून बघण्याची जराही हिंमत तिने केली नाही.  तेवढ्यात बाहेरून आवाज आला.
"शुभे... ये.... शुभे...!!"काय करते आहेस गं...?
केव्हा पासून मी तुला आवाज देते आहे. जायचे नाही का तुला आणि अजून पर्यत अशीच बसून आहेस तयारी नाही काही नाही. माई आली होती त्या खोलीत. माई म्हणजे शुभाने मानलेली चाळीतली मावशी.
" शुभे... अगं....ये... शुभे..!! अशी अंधारात ऐकटीच बसून काय करतेस, अगं अशा अंधाऱ्या खोलीत  सणावाराला एकटं जास्त वेळ बसू नये....!"
हा एका वर्ष्याने येणारा उपवास आहे तर तेव्हा असं नको गं करुस... जाऊन ये आज हरतालिका पूजा आहे... नको गं देवार असं राग करू पोरी... ऐक माझं...!!"मनवत माई शुभाच्या डोक्या खांद्यावरून मायेने हात फिरवत बोलत होती.
हळूच रडक्या स्वरात शुभाचा आवाज आला.
"माई ....मी कुणासाठी करावा गं हा उपवास...? खरं तर अपेक्षा केली होती जीवनसाथी चांगला मिळावा यासाठी.
पण काय उपयोग...? मी कुणाचं काय वाईट केल गं कधी..??कधी कुणाला दुखवल नाही, नेहमीच दुसऱ्याचा विचार करत राहिली... मग माझ्याच का नशीबी असं यावं...?अजून काय मान्य आहे त्या महादेवाचं माहित...!!" असं म्हणत  तिच्या डोळ्यात अश्रू आले  तिच्या डोळ्यात आलेले दुःखतं अश्रू माईने अलगत आपल्या हाताने पुसले.
"अगं जरा बाहेर तर बघ...पोरी कसल्या नटून आल्या आहेत ते... ती देशमुखांची राणी आहे ना तिने तर कसला अवतार घेतला आहे बाईsss...!!"असं म्हणत माई शुभाचा मूड बदलवण्याचा प्रयत्न करू लागली.
"शुभे बघ ते बघ लवकर.... ह्या खिळाकीतून... बाहेर बोट दाखवत माई शुभाला सांगत होती.
तिने खिळाकीतून बाहेर  डोकावून पाहिलं तर चाळीतल्या तरुण पोरी मस्त नटून थटून हातात पूजेचा ताट घेऊन चाळीतल्या आपटे काकुकडे जात होत्या.
तरीही शुभाला त्यांचा हेवा वाटला नाही. चेहरा पार उतरला होता. क्षणभर वाटत होते की माईच्या कमरेला गच्च मिठी मारावी आणि ढसा ढसा रडून मन मोकळ करावं एकदाच पण सांगणार तरी काय तिला.
कोण आपल्याबद्दल काय विचार करेल. आपली राहिलेली इज्जत पणाला लागेल असे नानावीक विचार डोक्यात थैमान घालून होते.
लहानपणीचे विचार डोक्यात अलगत तरंगून गेले. कशाला मोठे होण्याचे स्वप्न बघितले यावर पच्छाताप व्यक्त करत बसली. काय होऊन बसले हें आपल्या सोबत. तिला आपल्या आईवडिलांची आठवण येऊ लागली.
*******
चाळीतल्या जुन्या दिवसाच्या आठवणीत ती पार रंगून निघाली.
जुन्या चाळीतला तो डुगडुगता जिना नजरेसमोर येऊन उभा राहिला, त्याचा तो तिथला अंधार, भांडणारे आणि तरीही जीवाला जीव देणारे शेजारी. गरीब होते तेथील लोक पण मनाने श्रीमंत होते.


कथा क्रमशः  पुढील भागात.

🎭 Series Post

View all