जातपंचायत आणि ती

This is a society of India and we are the Princeton of Constitution

          साधारण मे च्या रखरखीत उनाने जोर धरला होता खोडवाटांच्या पांजर चैत्राने फुलवल्या येवढच ते काय सुख....जिल्ह्याच्या पुर्वोत्तर भागामध्ये एक साधारण दहा आकरा वर्षापुर्वी जात पंचाययत होणार याची माहिती मला लागली .जातनिहाय वर्गगणना या शोधनिबंधासाठी करणार होतो.प्रेसमध्ये हा विषय निघाला .
 मित्र बोलला..."बाशा तु जाणार?" 
मी "हा" बोललो...
.त्याने सिगरेट पुढे केली..
मी हासलो आणि "भिकाऱ्या सिगार आसेल तर दे..." ????????????तो बोलला," हा हरामी कम्युनिझम आणि विडीकामगारांच्या प्रश्नावर तासंतास बोलेल पण रौब बघा सिगार ओडतो साल्या कार्ल पाहिजे होता तुला बुटाने तुडवला आसता"
दोघंपण हासलो ???????????????? 
तो बोलला," यार चाललाय पण सेफ्टीचं काय तिथं लोक तलवारी भाले कोयतेपण घेऊन येतात" ..
.खाली बघुन मी ,"पिस्टन आहे ना" 
" ये गध्या गलोलपण आसतात सर्रास " .
 "यार पण मी युद्ध करायला चाललो नाही" .
तो " तरीपण तु सेफ्टीसाठी पोलिस घेऊन जा" ठरलं
.रितसर अर्ज केला आणि प्रोसेस एस.पी ना भेटून फिक्स केलं.
      जायच्या दिवशी  मी लवकरच तयार होऊन हाँटेलमध्ये बसलो होतो.मी एक सिगार आणि स्प्राईट मागवलं.सिगार पेटवली एक झुरका आणि एक घोट मोबाईलवर ईमेल चेक करत करत पित होतो.तेवढ्यात शिंदे पोलीस आणि धवन आले. 
धवन हासला ,"साहेब हा याच्याबरोबर जायचय" 
मी," नमस्कार बसा चहा काँफी काय घेणार"  
धवन बोलला ,"आरे हरामी खुदा ला तरी भित जा आम्हाला चहा आणि तु ?"  मी हासलो.
      आम्ही दोघंजन तिथे पोहचलो तेव्हा....टळटळीत उन्हाने जोर धरला होता..हालगी कसलंशे वाद्य तुतारी गुबू बुग्गु आवाज देवीची आरती झाली..भलेमोठं पटांगण ..गोलाकार आकाराने लोक बसलेले.साधारण सहा सात हजार लोक होते.न्यायनिवाडा लागला...किरर्कस  मधुनच कोणीपण ओरडायचे.मधुनच कोणीतरी आख्या राउंडला पळत वेडा मारायचं.पंच बसतात तिथं आम्ही बसलो.मी पत्रकार कार्ड दाखवलं.त्यांच्या मनाने आमच्या येण्याने हस्तक्षेप झाल्याचे.तोंडावरुन दिसत होते. झटापट निकाल दिले जात होते . पाच दहा हजार दंड व्हायचे.
      साधारण एक च्या दरम्यान एक केस फैलावर आली. एक तुळतुळीत काळ्यासावळ्या पोरीची. लग्न झालेलं होतं तिचं.भाषा साधारण समजायची.नाही समजली तर पंचाला विचारायचो.तो पण सांगायचा. ती केस आशी होती ..पाटिमागे दोन महिन्यापुर्वी पाहुण्याच्या गावाला गेल्यावर नवरा नसताना त्या पोरीनं न्हाव ( डोक्यावरुन आंघोळ ) केल्याची. मला समजलेच नाही तिचा थोरला दिर नवरा सासरा यांचा आरोप.
ती रडुन हात जोडून सांगायची," माय बा त्या गावलै आदिक दी चं भुस्काट वाहायलं तवा केसात मोप भुसा बसला म्हणून केली" 
सासरा बोलला," साफ झुठ बोलकिन छोरी...नथ गिरवाईन फेकुली" 
मी पंचाकडे बघितलं..तो सांगेनाच .
बाजुचा माणुस बोलला," हि पोरगी न्हाव केलं ती राती तिथं दुसऱ्यासंगं झोपली आशी म्हणतीय सासुरे" .
बापरे खुपच गंभिर प्रकरण होतं.न्हाय होय करुन प्रकरण उकळत्या तेलातला पैसा काढण्यावर आलं.मला खुपच अस्वस्थ व्हायला लागलं. 
मला राहवेना.," हे बघा ती खरे बोलत आसेल .आसं कोणी वागणार नाही तुम्हीं तिला समजुन घ्या."
 वातावरण खुप तापले..
एकजन उठला.," ये वस्ताद तु मधी नाय बोलाचं हि आमचा जातीला मामला हाय तु निघ इतनं नायतर तुला जिव मारेन आम्हि." 
मी बोलतोय तोपर्यंत प्रांगणाच्या मधोमध कढईत तेल उकळायला घातले होते.
पोरीचा बाप बोलला," ती पोटुशी हाय" 
बापरे मला आता तर राहवेनाच.
मी उठलो आणि सगळ्यांना हात जोडुन बोललो.," हे बघा ती गरोदर आहे . नंतर आसली आग्निपरिक्षा तिने का द्यायची. ती पवित्रच आहे त्यामुळे तिची ओटी तुमच्या देवाने भरलीय. ज्याला डाउट आहे त्यालाच पैसे काढायला लावा." 
सगळीकडुनच विरोध आणि शिव्या यायला लागल्या.बेकार वातावर ओढवलं.मी कोणत्याच परस्थितीत हाललो नव्हतो. मी हालने म्हणजे त्या पोरीला उकळत्या तेलातील पैसे काढायला लावने...बापरे खुपच वाईट प्रसंग होता.भसाभस तलवारी कोयते काढले गेले.भाले नाचायला लागले.परस्थितीचं भान बघुन पोलिस शिंदे साहेबांनी बंदुकितुन एक राऊंड हावेत फायर केला.वातावरन थांबेनाच.दुसरापण रांऊट फायर केला.त्या आगोदर त्यांनी इतली परस्थिती हेडक्वाँर्टरला कळवली होती.पोलिस गाडी सायरन वाजवत आली.तसीच एक व्हँनपन आली.मी फक्त शांत होण्याचं आव्हान करत होतो.पोलिस बघितल्यावर सगळे शांत झाले.काही पांगले. पंचांनी तसल्या गदारोळात निर्णय देऊन टाकला.तिला जातीबाहेर पाच वर्षासाठी काढले.बापरे आता ती कुठे जाईल?आंधार डोळ्यापुढे.मी दादा देशमुख ला फोन केला. त्याला ही परस्थिती सांगितली. ही पोरगी त्याच्या महिला आश्रमात ठेवण्यासाठी .तो पण हा बोलला.
         मी त्या पोरीला बोललो," हे बघ आता हे तुला मारुन टाकतेन त्यापेक्षा तु आमच्याबरोबर चल. तुझी राहण्याची जेवणाची सोय करतो.
नवरा बोलला," जा जा तु जायला खुप चपळ आहे." 
मी ," ये तुझा विश्वास नाही तर कशाला सांगत बसतोय . तुला तुझी बायको समजली नाही माणस़ समजायची.डोक्यावरुन आंघोळ केली म्हणून गरोदर बायको सोडायला तयार झाला? शब्बास तु ना खुप मोठा नामर्द आहेस" 
(क्रमशः) 
#akbarshaikh