जवळचं नातं.. अलक

जवळचं नातं.. अलक

" तुझा माझा संबंध संपलाय.. आपल्यात आता कोणतंही नातं नाही.. " ती

" नातं नाहीये तर मग डोळ्यात हे पाणी का आहे?? "  तो

" जवळच्या व्यक्तीने दुखावलं की डोळ्यात पाणी येतंच.. तुला नाही कळणार.. "  ती

" चला, कमीत कमी तू मला जवळचं तरी समजलीस, यांतच सगळं आलं.. " तो

ती भरल्या डोळ्यांनी फक्त त्याच्याकडे बघत राहिली.