जरा थांब नाऽ!-4
@राधिका कुलकर्णी.
@राधिका कुलकर्णी.
दारावरची डोअरबेल वाजवून दूहीता दार उघडण्याची वाट पहात तिथेच उभी राहिली. गेले दोन दिवस ऋतूराज कॉलेजमध्ये कुठेच दिसला नव्हता. कुणाला विचारावं तर ‘मी का अचानक त्याची चौकशी करतेय?’ अशी शंका घेणार लोक. म्हणून तिने गुपचूप त्याचा पत्ता शोधून आज डायरेक्ट त्याच्या घरीच गेली.
थोड्यावेळात एका मध्यमवयीन सुंदर स्त्रीने दार उघडले. तिच्या प्रसन्न स्मितहास्याने दूहीताच्या मनावरचं थोडं ओझं उतरलं. तिला वाटलं होतं ‘आपलं त्याच्या दारात कसं स्वागत होईल?’
पण सुरवात तर छान झाली होती.
बहुतेक त्याची आईच असावी. तिने स्मित करत विचारले,
पण सुरवात तर छान झाली होती.
बहुतेक त्याची आईच असावी. तिने स्मित करत विचारले,
“कोण हवंय?”
“काकू, ऋतूराज गंधे इथेच राहतो नाऽ?”
“हो. काय काम आहे?”
“कऽ, काही नाही. मी दूहीता बॅनर्जी. त्याचे जर्नल माझ्याकडे आलेय चुकून. कॉलेजमध्ये कळले की तो आला नाही म्हणून आज घरी आले द्यायला. आहे का तो घरी?”
“होऽ, आहे की. ये ना, आत ये.”
ती घरात गेली. त्याच्या आईने समोरच्या बंद दाराकडे निर्देश करत सांगितले,
“ते बघ तिकडे स्टडीमध्ये आहे तो. जाऽ तू.”
“काकू, तुम्हीच बोलवता का प्लीज?”
हिला दारात बघून तोंडावर दार बंद केले तर! ही भीती वाटून ते काम तिने त्याच्या आईवरच सोपवले. बरं म्हणत काकूंनीच दारावर थाप मारून त्याला आवाज दिला. आतून दार उघडण्याचा आवाज येताच दूहीता लगबगीने काकूंच्या मागेच उभी राहिली. दार अर्धवट उघडून तो आईला म्हणाला,
“कायेऽ गंऽ, कशाला डिस्टर्ब करतेय? मी सांगितले होते नाऽ मगाशीच की अभ्यास झाल्यावर जेवेन म्हणून?”
तो त्याच्या आईवरच बरसला. तशा त्या सौम्य स्वरात म्हणाल्या,
“अरे, मी जेवण्यासाठी नाही आलेय बोलवायला. ही बघ तुझी कॉलेजमधली मैत्रीण आलीय कोणीतरी. त्यासाठी दार वाजवले.”
‘मैत्रीण? कोण मैत्रीण!’
तो मनातल्या मनात विचार करत होता इतक्यात दुहीता समोर येऊन म्हणाली,
“अरेऽ, तुझे जर्नल परत करायला आले. परवा चुकून ते माझ्याकडे आले होते. गेले दोन दिवस मी तुला कॉलेजमध्ये परत करण्यासाठी शोधत होते पण तू आलाच नाहीस नाऽ. तुला वाटेल की जर्नल कुठे हरवलं? तू पॅनिक होशील, म्हणून द्यायला आले घाईने.”
तिने एका दमात सगळे सांगून टाकले. त्या अर्ध्या उघडलेल्या दारातूनच तिने ते बूक त्याच्या हाती सरकवलं आणि ‘चल जाते मी’ म्हणत तिथून सटकली. तिच्या आईने जास्तीची काही चौकशी केली तर तिला बोलता आलं नसतं. ते सगळं टाळण्यासाठी ती तिथून चटकन बाहेर पडली. त्याचं असं कुठलंही जर्नल तो विसरला नव्हता किंवा हरवले तर त्याहून नव्हते मग
‘ही इकडे असं खोटं कारण सांगून का आली असेल!’
उत्सुकतेपोटी विचार करतच त्याने वही उघडली तर त्यात काहीतरी लिहीलेले होते. त्याने त्या ओळींवरुन झरझर नजर फिरवली.
हाय ऋतूराज!
होप यू आर गूड.
ह्या कॅम्पच्या निमित्ताने जो आपला अल्पपरीचय झाला आणि जो काही थोडावेळ आपण सोबत घालवला ते क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे खूप अनमोल आणि अविस्मरणीय आहेत. त्याची तुलना जगातील कुठल्याच गोष्टींशी होऊ शकत नाही. हो, हे मी आत्ता बोलतेय कारण तेव्हा हे बोलायची संधी मिळाली नाही आणि हिंमत तर त्याहून नव्हती. तुला माझ्याबद्दल काय वाटते हे मला नाही माहीत. पण त्या भेटीनंतर मला मात्र तू आवडायला लागलाएस, तुझ्या सगळ्या खडूस स्वभावासहीत!
शेवटच्या दिवशी तुझं आणि प्रत्यूषचं भांडण झालं आणि त्याचं कारण कळतनकळत मीच होते हे मला नंतर समजलं. प्रत्यूष तुला रागात खोटं बोलला की आमचं लफडं आहे. पण तसं खरंच काहीच नाहीये अरे! तो फक्त तुला चिडवण्यासाठी तसं बोलला. तो माझा शाळेपासूनचा अगदी बालवडीपासुनचा मित्र आहे आणि आमचे घरून पण खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे तो मला अगदी भावासारखा आहे माझ्या. पण तुला ही गोष्ट माहीत नसेल म्हणून तुझा गैरसमज झाला. तू मेसेजद्वारे वॉर्न करूनही मी त्याच्याबरोबर फिरायला गेले ह्याचा तुला राग आला असेल आणि म्हणून कदाचित तू तो राग प्रत्यूषवर काढला असशील तर त्याचे कारण काय आहे हे तुला समजावे म्हणून हा पत्रप्रपंच.
त्या थोड्याच अवधीत जे अनामिक नातं आपल्यात जुळलयं त्यावर वरील सगळ्या घटनांचा परिणाम व्हावा असं मला मुळीच वाटत नाही आणि ‘वेळ निघून गेल्यावर ना फिलिंग्ज मॅटर करतात ना एफर्ट्स’ असं मी हल्लीच कुठेतरी वाचलं आणि ते मला पटलंही म्हणून आज हिंमत करून तुझ्या घरापर्यंत पोहोचले.
आशा करते की हे वाचून तुझा गैरसमज नक्की दूर होईल. उद्या जर तू कॉलेजमध्ये आलास तर मी समजेन की तुझा माझ्यावरचा राग आणि गैरसमज दोन्ही दूर झाले आहेत.
चल, काळजी घे.
वाट पाहते उद्या कॉलेजमध्ये.

दूहीता.
तिच्या पत्राला त्याने जवळपास दहावेळा परत परत वाचून काढले. स्पेशली त्या ओळी. ‘तू मला आवडायला लागलाएस तुझ्या खडूस स्वभावासहीत!’
‘वेळ निघून गेल्यावर ना भावना काम करतात ना त्यासाठी केलेली मेहनत’
‘वेळ निघून गेल्यावर ना भावना काम करतात ना त्यासाठी केलेली मेहनत’
“खरंच किती खरं आहे हे!”
आनंदाने पोटात गुदगुल्या होत होत्या त्याच्या. त्याच्याही नकळत ती कुठेतरी मनात घर करून बसली होती त्याच्या.
इकडे आनंदाला भरतं येतं असतानाच अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला. आपली ती प्रतिज्ञा जी स्वतःच स्वतःशी केलेली आणि फक्त त्यालाच माहीत होती ती आठवून मन थोडं उदास झालं.
इकडे आनंदाला भरतं येतं असतानाच अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला. आपली ती प्रतिज्ञा जी स्वतःच स्वतःशी केलेली आणि फक्त त्यालाच माहीत होती ती आठवून मन थोडं उदास झालं.
पण दुसऱ्याच क्षणी तिच्या पत्रावर नजर पडली आणि चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल पसरली.
मधले दोन दिवस ज्या कश्मकशमध्ये त्याने काढले त्या सगळ्यावर क्षणार्धात त्याला उत्तर गवसलं होतं जणू. त्या खुषीतच तो रूमच्या बाहेर आला. एरवी जेवताना
कधीही टीव्ही न बघणारा ऋतू आज चक्क कार्टून चॅनल लावून जेवायला बसला. त्याच्या हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकून आई पण बाहेर आली. तो मस्त टॉम अँड जेरी शो बघत हसत हसत ताट हातात घेऊन जेवत होता. आईला तर आश्चर्याचा धक्काच बसला ते पाहून. अभ्यासाबाबतीत इतका काटेकोर असलेला ऋतूराज कधीही अभ्यास मधेच सोडून जेवायला बसला असे आजपर्यंत कधी घडले नाही, त्यात बसलाच जेवायला तर हातात एखादे अभ्यासाचेच पुस्तक धरलेले असायचे.

‘जेवताना फक्त जेवणच करावं तर ते अंगी लागतं बाळाऽ’
असं आईने कानीकपाळी ओरडून सांगितले तरीही त्याच्यावर त्याचा कधीच परिणाम व्हायचा नाही. त्यामुळे आजकाल त्याच्या आईनेही त्याला त्या विषयावर काही बोलणे सोडून दिले होते पण आज झालेला हा चमत्कार बघून तीच इतकी आनंदी झाली की ती त्याच्याजवळ येऊन प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली,
“किती बरं वाटतंय तुला असं हसताना बघून. असंच नेहमी हसून खेळून रहा राजाऽ! आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी दिलेय.”
पण त्याचे आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. ताटातली पोळी संपली तसा तो आईला म्हणाला,
“आई पोळी वाढ नाऽ, मला खूप भूक लागलीय. आणि रस्साभाजी तर जाम भारी झालीय.”
हे तर जगातलं सातवं आश्चर्य होतं आईसाठी. नाहीतर
कसली भाजी, काय चव ह्याकडे कधी लक्षच नसायचे त्याचे.
फक्त ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।’ ह्या उक्तीप्रमाणे अन्न पोटात ढकलणे एवढेच करायचा तो.
कसली भाजी, काय चव ह्याकडे कधी लक्षच नसायचे त्याचे.
फक्त ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।’ ह्या उक्तीप्रमाणे अन्न पोटात ढकलणे एवढेच करायचा तो.
पण आज तो चमत्कार झाला होता खरा!
………………………………………………………
क्रमशः -4
@राधिका कुलकर्णी.
क्रमशः -4
@राधिका कुलकर्णी.
आज एक जादू घडलीय ऋतूराजच्या आयुष्यात!
ही त्या पत्राचीच जादू तर नाही ना!
दूहीताने तर आपले मन मोकळे केले पण ऋतूराजलाही हे करणे जमेल का? काय होणार पुढे?
ही त्या पत्राचीच जादू तर नाही ना!
दूहीताने तर आपले मन मोकळे केले पण ऋतूराजलाही हे करणे जमेल का? काय होणार पुढे?
पाहूया पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा