जरा थांब नाऽ -5
अंतिम भाग
@राधिका कुलकर्णी.
अंतिम भाग
@राधिका कुलकर्णी.
तोच पाऊस आणि तेच जीवघेणे प्रश्न तिची पाठ सोडत नव्हते.
‘काऽ केले त्याने असे? आणि मग त्या शेवटच्या भेटीचा काय अर्थ होता?’
कॉलेजमध्ये वर्ष संपताना पुन्हा त्याच सिंहगडावर भेटलो होतो. शेवटचं.
‘आता काही दिवस आपण अजिबात संपर्क नाही करायचा हं. मी आईसोबत गावी चाललोय.’
असं सांगून जो गेला तो परत कधी परतलाच नाही. त्या भेटीत मारलेली ती मिठी परत न भेटण्यासाठी होती का मग?’
आज इतक्या वर्षांनंतरही दूहीता त्याच आठवणींमध्ये बुडाली. डोळ्यांच्या कडातून ओघळणारे ते खारे मेघ कॉफीच्या मगात सामावून पुन्हा तिलाच रीचवावे लागत होते जसा तो विरह रीचवला आजवर.
असं सांगून जो गेला तो परत कधी परतलाच नाही. त्या भेटीत मारलेली ती मिठी परत न भेटण्यासाठी होती का मग?’
आज इतक्या वर्षांनंतरही दूहीता त्याच आठवणींमध्ये बुडाली. डोळ्यांच्या कडातून ओघळणारे ते खारे मेघ कॉफीच्या मगात सामावून पुन्हा तिलाच रीचवावे लागत होते जसा तो विरह रीचवला आजवर.
अचानक दारावर टकटक.
‘ह्यावेळी कोण आलं?’
आपले डोळे पुसतच तिने दार उघडले आणि आश्चर्य आणि प्रश्नांच्या असंख्य आठ्यांचं जाळं तयार झालं तिच्या चेहऱ्यावर.
‘हा? आत्ता इथं?’
मनातले प्रश्न मनात दाबतच तिने विचारले.
“कोण हवंय?”
“मला ओळखलं नाहीस?”
“मी ओळखलं पण कदाचित तुच चुकीचे दार ठोठावले असशील म्हणून विचारलं?”
“तुला काय वाटतं?”
“अजुनही बदलला नाहीस! तेच प्रश्नाला प्रतिप्रश्न.”
“आत येऊ का?”
“अरे होऽ,ये ना, विसरलेच, ये.”
जरावेळ शांतता. तो तिथेच सोफ्यात बसलेला. ती आत गेली. त्याच्यासाठी कॉफी घेऊन त्याला देत समोरच्या सोफ्यात बसली.
“हम्मऽ, छान झालीय कॉफी.”
“माझा पत्ता..?”
“तू काल का आली नाहीस गेट टुगेदरला?”
“ऑफिसमधे खूप काम होतं अरे. रजा मिळणं शक्यच नव्हतं.”
“मी येणार कळलं म्हणून आली नाहीस नाऽ?”
“तुला काय वाटतं?”
“व्वा! अजुनही मलाच फॉलो करतेय की.”
“काही खोडी मरेपर्यंत सुटत नाहीत. तशीच हीसुद्धा.”
“एकटीच राहतेस?”
“ज्याने पत्ता दिला त्याने बाकी माहिती दिली नाही का तुला?”
“असं तिरकस का बोलतेय दूहीऽ?”
“मग काय बोलू ऋतू, तुच सांग? गेली वीसवर्षे रोज तुझ्या एका मेसेज, फोन, माहीतीची वाट बघतेय मी. कोणीतरी मला सांगेल की माझं असं काय चुकलं म्हणून तू काही न सांगता कायमचा निघून गेलास. मला वेड लागायची पाळी आली होती. आपलं नातं इतक्यात कुणाला सांगायचं नाही असं ठरवलं असल्यामुळे कुणाला तुझ्याबद्दल विचारायची सोय नाही. चार महिन्यांनी कॉलेज उघडल्यावर कळले की तू कॉलेज, गाव, घर सोडून कायमचा कुठेतरी निघून गेलाएस. सांग मी काय करायला हवं होतं? त्या शेवटच्या भेटीत तुला समर्पित केल्यावर पुन्हा कुणाचा विचार करायला मन तयार होत नव्हतं. सगळ लक्ष शेवटी अभ्यासावर केंद्रीत करून युपीएससी क्लिअर केले आणि आयबी जॉईन केलं. ह्या प्रश्नांपासून, घरापासून लांब बदल्या घेत खूप फिरले आणि आत्ता परत पुण्यात पोस्टींग मिळाली. इतकी वणवण भटकले पण तुझ्या आठवणींनी माझा पिच्छा सोडलाच नाही कधी आणि आता मन समजूत घालायला तयार झाल्यावर का आलाएस परत जुन्या जखमा हऱ्या करायला, काऽ? जा तू ऋतू. जाऽ.”
ऋतूराजला अचानक आलेला पाहून दूहीताचा बांध फुटला होता. तिच्या डोळ्यातून धरण वहात होतं. ऋतूराज हलकेच तिच्याजवळ गेला. तिला आपल्या मिठीत घेतलं. ती मिठीतुन सुटू पहात होती पण त्याने पुन्हा तिला तसंच घट्ट धरून ठेवलं जसा पहिल्या भेटीत तिचा हात. आता तीही रडून शांत झाली तसं भानावर येत त्याला म्हणाली,
“सरक बाजूला हो. तुला शोभत नाही असं परक्या स्त्रीशी लगट करणं. बायकोला सांगून आलाएस का इकडं येताना?”
“होऽ मग. तिच्या परवानगीखेरीज मी कधीच काही करत नाही. पण तुला कसं कळलं की माझं लग्न..? ओह नो! विसरलोच. आयबीवाली ना तू, तुला तर घरबसल्या खबरां मिळत असणार. अजून काय काय कळलंय माझ्याबाबतीत?”
“मला वेळ नाही असल्या इन्फर्मेशन काढत बसायला. इतकी वर्षे झाली म्हणजे लग्न तर केलंच असशील ना. शेमडं पोर पण सांगेल.”
“तू केलंस का?”
“माझं सोड. तुझं सांग?”
“तुला काय वाटतं?”
“ऋतू, जूने खेळ खेळायला ना ती वेळ राहिली ना ते वय! निदान आता तरी खरं बोल. का केलास तो प्रेमाचा खेळ, जर तू त्याला शेवटापर्यंत नेऊच शकणार नव्हतास?”
आता ऋतूराज पण गंभीर झाला. त्याचे डोळे भरून आले होते. तिला आपल्याजवळ छातीशी कवटाळून तो म्हणाला,
“ तेव्हाही तुच अडकवलं होतंस ह्या प्रेमाच्या मृगजळात. मी खूप प्रयत्न केला ह्यातून बाहेर पडायचा पण तुझ्या सहवासाचा मोह जडला होता. नाही म्हणूच शकलो नाही. मला माहित होतं ह्या गलबताला किनारा नाही. ते असेच अधांतरी हेलकावे खात लाटांवर तरंगत राहणार पण हिंम्मतच नाही झाली सत्य सांगायची. आठवते ती शेवटची भेट? खरंतर तुला सगळं सत्य सांगून विषय संपवायचा हे ठरवून आलो होतो पण तोच वादळी पाऊस, तीच ओलेती तू. मोह आवरताच आला नाही मला. कसा विरघळत गेलो तुझ्यात खरंच नाही समजलं. जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. जे घडू नये ते घडून गेले होते. तुझ्या चेहऱ्यावर फुललेले गूलाब बघून, ते कटूसत्य सांगायची हिम्मतच झाली नाही मला. मग न सांगताच निघून गेलो. वाटलं होतं काही दिवसांनी सावरशील, विसरशील आणि नवा संसार थाटशील पण तुही…
काल गेटटुगेदरमध्ये प्रत्यूषकडून कळले, तसं थेट इथे आलो. तुझी माफी..”
काल गेटटुगेदरमध्ये प्रत्यूषकडून कळले, तसं थेट इथे आलो. तुझी माफी..”
वाक्य पूर्ण व्हायच्याआधीच एक सनकन आवाज आला. त्याचा गाल लाल झाला होता. दूहीताने एक ठेऊन दिली होती. तो शरमेने मान खाली घालून तिच्या पुढ्यात उभा होता.
“कसली माफी, हं? तू का गेलास मला टाकून त्याचं कारण आहे तुझ्याकडे? नसेल तर, दरवाजा उघडा आहे. आत्ताच्या आत्ता निघ इथून. मला पुन्हा त्याच मृगजळात अडकायचं नाहीये.”
“पण मी अंतर्बाह्य अडकलोय, तेव्हाही आणि आताही. पण माझी लग्न न करण्याची प्रतिज्ञा! स्वतःलाच दिलेलं वचन मोडण्यापेक्षाही माझ्यासोबत तुझं आयुष्य नासवायचं नव्हतं म्हणून काळजावर दगड ठेवून दूर गेलो गं तुझ्यापासून.”
दूहीता आश्चर्यचकित.
“कसली प्रतिज्ञा, कसलं वचन?”
होऽ, आहे एक कथा. आमच्या घरात एक विचित्र आजार पिढी दरपिढी चालत आला आहे. वयाच्या पन्नशीला त्या घरच्या पुरूषाची स्मृती जाते किंवा तो वेडा होतो. मागील पिढीत माझे आजोबा आणि काका तसेच होते. त्या अभिशापामुळेच माझ्या वडिलांनी पण आत्महत्या केली. हे सगळे पाहून मी ठरवले की आपण लग्नच करायचं नाही. त्यामुळेच तू इतकी आवडत असुनही मी कधीच तुला लग्नासाठी हो बोललो नाही. तुझ्या प्रश्नांना सोयीने बगल द्यायचो. पण तुझ्या प्रेमाच्या विळख्यातून जितकं बाहेर पडू म्हणत होतो तितका फसत चाललो होतो म्हणून शेवटी काही न सांगता यूएसला निघून गेलो आणि तिकडेच स्थायिक झालो. आईला गावी नागावला सोडलं.
काही दिवसांपूर्वी आईची तब्येत अत्यवस्थ झाली म्हणून भारतात आलो. पण ती त्यातून वाचली नाही. निघताना तिचं सामान आवरताना एक डायरी सापडली. त्यात तिने जे लिहिले होते ते वाचून मी थक्क झालो.
डायरीत लिहिले होते, आमच्या घराण्याच्या ह्या विचित्र आजारामुळे त्यांनी मला दत्तक घेतले होते पण मला शेवटपर्यंत हे कळूच दिले नाही. ज्या कारणास्तव लग्न करायचं नाही ठरवलं होतं, त्या सावटातून आता मुक्त झालोय मी दूही.
डायरीत लिहिले होते, आमच्या घराण्याच्या ह्या विचित्र आजारामुळे त्यांनी मला दत्तक घेतले होते पण मला शेवटपर्यंत हे कळूच दिले नाही. ज्या कारणास्तव लग्न करायचं नाही ठरवलं होतं, त्या सावटातून आता मुक्त झालोय मी दूही.
प्लीज, लग्न करशील माझ्याशी?”
दूहीताला आनंदाश्रू आवरत नव्हते. तिने आवेगाने आपले ओठ ऋतूच्या कपाळावर टेकवून आपली मूक संमती देताच ऋतूनेही तिला आपल्या कवेत घेतले. बाहेर आणि आत धूंद प्रेमाची बरसात होती.
पापण्यांच्या जाळीतून पुन्हा तेच मधाळ स्वर पाझरत होते.
माझीया मना,
जरा बोल ना।
एकटी न मी,
सोबतीस तू।
ओळखू कसे मी,
तुझ्या भावना।
माझीया मना,
जरा थांब नाऽ।
…………………………………………………………….
समाप्त.
जरा बोल ना।
एकटी न मी,
सोबतीस तू।
ओळखू कसे मी,
तुझ्या भावना।
माझीया मना,
जरा थांब नाऽ।
…………………………………………………………….
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा