१.आयुष्य जगताना..

Thoughts which strikes my mind i always wanted to note them down and share with another heart, either i will get another magical thought by sharing it or someone will definately feel the magic of thoughts by reading my words.

एखाद्या आवडत्या पुस्तकातलं एखादं आवडतं पान दुमडून ठेवल्यागत आपण काही आठवणी दुमडून ठेवतो मनात कायम, पण तसं खरंच करू नये कारण आयुष्यात ते दुमडलेलं पान कधीही उघडा तुमच्या आवडीचं च असेल पण आठवणीचं तसं होईलच असं नाही. नंतर कधी ती वेदना ही देऊ शकते, म्हणून वाट मोकळी करा आठवणींची. कधी अश्रूंनी तर कधी व्यक्त होऊन, उगाच त्यात गुंतू नका कारण, आयुष्य म्हणजे पुस्तकच असलं तरी इथं आपली  गोष्ट आपल्याला लिहायची आहे आणि आपण लिहायला घेतलेलं पुस्तकं आपल्याला वाचताना सुखावणारं असावं इतकं जरूर ते मनोरंजक असंच लिखाण त्यात होऊ दया. दुमडून ठेवायचंच असेल एखादं पान तर त्यावरची आठवण कायम जिवाने भान हरपून जावे तिला आठवताना असलीच त्या पानावर कोरून ठेवा. 
जगण्याची मजा लुटा.

©भाग्यश्री हर्षवर्धन.