चौकट नियतीच्या नात्यांची...

वक्ती दूर गेली की नाते तेथेच संम्पत नसते.नाते सर्यांनाचा असतात. ते कधी कोणत्या वळणावर जातील हे फक्त नियतीलाच ठाऊक असते. नियतीला जे मान्य असते. त्या नात्यांना स्वीकारण्यात मोठेपणा असतो.

अनु खिळकीत एकटीच खिन्नपणे उभी राहून कसला तरी विचार करत होती.  डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. एकटक ती खिलकीच्या बाहेर काही तरी निहारित  उभी होती, राजने तिच्या जवळ येऊन तिला मिठी  मारली, पण त्यावर काही प्रतिसाद न देताच अनु तशीच उभी राहिली, त्याच्या लगेच लक्षात आले अनु आज जरा उदास वाटते आहे. नक्कीच काही तरी झाले असावे..


राज म्हणाला "काय गं..?"

" कसला  विचार करते आहेस केव्हा पासून मी तुला घरभर शोधतो आहे आणि तू आपली खिळकीत येऊन अशी काय बघत बसलीस. तब्यत तर बरी आहे ना तुझी??"

अनुराधा :- "काही नाही रे...!!"

"असचं आपली उभी होती...!!"

राज :-"मग अशी उदास  का दिसते आहेस, नेहमी हॅप्पी रहणारी माझी अनु आज अशी अचानक उदास म्हटलं म्हणजे नक्कीच काही तरी झाले असावे. सांग ना गं.... अनु काय झाले ते...?

"मला तुला असं  उदास नाही बघवलं जात...!"

अनु :-"मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे. पण समजतं नाही रे कसे सांगू तुला हे सारे...!!"

राज :- "अगं, मग बोल ना अनु त्यात काय एवढं...!!"

बोलता बोलता अनुच्या डोळ्यात पाणी आले आणि ती रडू लागली, तिला अस रडतांना राजने पहिल्यांदाच  पाहिले होते. तस त्याने दोन्ही हातांनी तिचे डोळे पुसले... आणि म्हणाला....
"हम्म बोला आत्ता काय झालं असं अचानक रडायला माझ्या प्रिय सखीला...?"

काही नाही म्हणतं अनुने राजला गच्च मिठी मारली आणि अजून  जोरात रडू लागली. तिला तिचे हुंदके अनावर झाले होते. तसा राजने अनुच्या डोक्यावरून हात  फिरवला आणि परत विचारलं तुला सांगवच लागेल. असे रडून कसे चालेन, सांग बर अनु....!!"

" प्लीज...!! मला नाही सांगणार मग कुणाला सांगणार आहेस का तू ..?? त्यालाही समजतं होत. अनु फार दिवसापासून आपल्या पासून  काही तरी लपवत आहे. राजच्या आग्रहावरून अनुला खरे काय ते सांगणे भाग झाले. हळूहळू  हुंदके थांबवत तीने राजला सांगायचं ठरवलं.

"मला ना घरी जावे असे वाटते आहे रे... राज थोड्या दिवसांसाठी का होईना...!!"

राज :-"अग मग त्यात रडण्यासारखे काय आहे, जाऊन ये माहेरी तेवढेच तुला बरे वाटेल."असं पण आपण अमेरिकेला आल्या पासून, तू गेल्या दोन वर्ष्यात घरी गेलेलीचं नाहीस... असं म्हणतं त्याने अनुला धीर दिला.

"होकार "ऐकून आत्ता अनुलाही बरे वाटले होते, तिच्या मनाला  आता खूप आनंद  झाला होता. तिला माहेरी जाण्याची ओढ लागली होती. उद्याच तिच्या दोन वर्ष्याच्या लहान मुलाला  सोबत घेऊन माहेरी जायचे तीने ठरले. तसा तीने तिच्या आईला घरी येण्याचा निरोप कळवला.

इकडे  घरी अनु येणार म्हणून त्या 2घी ना देखील आनंद झाला होता. अनुच्या स्वागताची जोरदार तयारी चाललेली होती, तिच्या आवडीचे पदार्थ स्वयंपाक घरात बनवले जात होते . अंगणात सुंदर रांगोळी सजवली होती यशोधाने.

खरं तर अनु घरी यशोधासाठीचं जात होती.. छे..! छे...!मोलकरणी करीता कशाला जाणार अनु घरी ..? काही तरी होते त्यांच्या नात्यात ते नियतीने घट्ट बांधून  ठेवलेले मोठे गुपित.

अनुची आई वैशाली देखील होती घरी, मग अनुला यशोदासाठीचं का एवढी ओढनिर्माण झाली होती कुणास ठाऊक...?

घरी गेल्यागेल्या अनुने समोर व्हिलचेअर वर बसलेल्या वैशालीला पाहिले आणि गच्च मिठी मारून अलिंगण दिले. मग तिची नजर यशोधाला  शोधू लागली. पण यशोधा कुठे दिसत न्हवती. वैशालीचे दोघी पाय अकॅसिडेन्टमध्ये विकलांग झाले होते, तशीच आपल्या व्हिलचेअरवर ती कायमची बसून असायची. यशोधा आज पण वैशिलीची काळजी घेत तिच्या सोबत रहायची. यशोधाच कुटुंब न्हवत ती एकटीच होती. आणि वैशाली देखील आज एकटी पडली होती. त्या अकॅसिडेन्टच्या हातश्यानंतर अनुचे बाबा ह्या जगात राहिले न्हवते.
30वर्ष्या पूर्वीची गोष्ट होती ती.
यशोधाचा पती खूप दारू पिऊन घरी यायचा, ते त्याचे नेहमीचेच झाले होते आणि घरी आला कि मग यशोधाला मारहाण व्हायची. पैश्यांचा घरात पत्ता नसायचा मग घर तरी कसे चालवणार म्हणून तिने वैशालीच्या घरी म्हणजेचं अनुच्या आईकडे  कामवालीबाई म्हणून स्वयंपाक करण्याचे काम घेतले. तश्या वैशालीताई खुप समजदार व्यक्तीमहत्व असलेल्या.
वैशालीताईना यशोधावर खूपदा दया यायची कधी कधी यशोधा वैशालीजवळ रडत बसायची. यशोधाला तेव्हा दिवस गेले होते आणि ती आत्ता 6 महिन्यांची गर्भवती आई होती, एक दिवस समजले की यशोधामाईचा पती नामदेव अचानक कुठे तरी दारू पिऊन उन्हात बेशुद्ध पडून होता,  इलाज केल्यावर देखील तो वाचला नाही. आत्ता यशोधामाई एकटी झाली होती. तशीच पोटासाठी काही तरी पैसे लागतात म्हणून कामाला येत होती. वैशालीला खूप वाईट वाटायच यशोधाच्या परिस्थितीवर. वैशालीचे लग्न होऊन दहा वर्ष झाली होते.
त्यांना सात वर्ष्यानंतर एक मुलं झाले होते ते पण देवाच्या नवसाने तुळजापूरच्या भवानी देवीला त्यांनी नवस  केला होता त्याच, नवसाला गेले असतांना बाळ कुणी तरी पडवले होते. त्या नंतर त्यांना मुलं बाळ  झालेच नाही. तिला खूप दवाखाना करून देखील काही इलाज होई ना. शेवटी  वैशालीने आपल्याला मुलं होईल याचा नांद सोडला होता. ती लहान मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. तिची घरची परिस्थिती अगदी श्रीमंतीची वैशालीचे पती  हायकोर्टात वकील होते. पण काय उपयोग त्या श्रीमंतीचा घरात ऐक मुलबाळ नसतांना. वैशाली कधी कधी एकटीच रडत बसायची. ऐके दिवशी यशोधा वैशालीला घरभर शोधत फिरली आणि ती मात्र घराच्या एका खोलीत रडत होती. कोपऱ्यात बसून तिला कधी कधी खूप चिडल्या सारखे वाटायचे.

 हे यशोधाला बघवले जात न्हवते. तिने आपल्या डोक्यातला विचार वैशालीला सांगितला. हे बघा मालकीनबाई माझी परिस्थिती नाही मी हे लेकरू सांभाळू शकेल एवढी. घर अगदी कामाच्या पैश्यातून चालवते. मला देवाने पदरात घातलं मुलं. तसेच बाळाला वडिलांनचा आधार हवा असतो तो ही नाही माझ्याकडे.
 जन्माला आलेले बाळ देखील माझ्या सारखेच काम करेल मला नाही हो बघवणार...!

असं म्हणतं यशोधाने आपला साडीच्या पदराला अश्रू पुसले.
"माझं बाळ मी तुमच्या पदरात टाकते. त्याचा तुम्ही स्वीकार करणार का...?? "माझ्या बाळाची आई होण्याचं भाग्य मी तुम्हाला देऊ करते असं म्हणतं तिने आपले हात  वैशाली जवळ जोडले.

हे ऐकल्यावर वैशालीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्या सारखा झाला होता. तीने आपल्या पतीला देखील संगितले.
ते ही खुप आनंदी झाले.त्यांनी मनापासून यशोधाचे आभार मानले.अनुचा जन्म झाला तसें यशोधाने अनुला वैशालीला देऊन टाकले होते.
पण अजून ही यशोधाचं अनुचा सांभाळ करत होती. अनु यशोधाला तेव्हा तिच्या घरातली कामवाली बाईचं समजायची. पण वैशालीने यशोधाला आपल्या  बहिणीच्या नात्याने स्वीकारले होते.

  अनुला आता कसलीच कमी न्हवती. यशोधा देखील अनुला खूप जीव लावायची आणि वैशाली देखील तितकाच . यशोधा अनुला रोज अंघोळ घालून शाळेत सोडायला जायची.वैशाली तेव्हा शाळेत शिकवायला जायची. अनु घरी आली कि मग वैशाली सोबत खूप मस्ती करायची.
अकॅसिडेन्ट त्या दुर्घटनेनंतर वैशाली आपले भान पूर्णपणे हरवली होती. तिला सावरण्यासाठी यशोधा खूप मदत करायची. वैशालीला पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी यशोधा आपल्याच हाताने तिला खायला घालत असायची. यशोधा अनुची खरी आई होतीचं पण आत्ता ती वैशालीची पण आईसारखीच काळजि घेत असायची. आता त्या 3 घी सोबत रहात होत्या त्या बंगल्यात. यशोधा आत्ता मोलकरीन न्हवती त्या घरची. ती परिस्थिती नुसार मोलकरीण  झालेली होती. फक्त तिच्या पोटच्या गोळ्यासाठी ...!
तिच्या चेहऱ्यावर ना उपकाराची  भाषा होती.
काही दिवसांनी अनुच ही लग्न झाले.  त्या नंतर मग अनु आपल्या पती सोबत कायमची अमेरिकेत निघून गेली . अनु तिच्या 2घीआईना भेटण्यासाठी खुप आतुर होती. आत्ता मात्र तिचे मन अगदी तृप्त झाले होते. त्यांना असे एकत्र बघून.
यशोधा अनुच्या 2वर्ष्याच्या मुलाला आपल्या कडेवर बसून घरभर फिरवत होती. तिचा आनंद फार वेगळा होता. ते बघून अनुच्या डोळ्यानां अश्रू धारा लागल्या होत्या...