चुकीला माफी नाही एक अबोल प्रेमकथा पार्ट 8

Untold love story(part 8)


पार्ट 8

सगळे मित्र कॉलेजच्या ग्राउंड वर भेटले... फक्त आज रिचा नव्हती आली....तिने ह्याची कल्पना आधीच ग्रुप वर दिलेली

मयुरेश : काय रे अभि ...काय झालं...कसलं सरप्राईज आहे तुझ्याकडे...??

अभिषेक :अरे थांब जरा ....इतकी का घाई करतोस... थांब....थांब...सब्र का फल मिठा होता हे

इकडे अभिषेक मित्रांना ताणुन ठेवत होता....आणि इकडे अजित आणि करुणाची आखं में चोली चालु होती... दोघे पण एक मेकांना चोरून पहात होते...काय माहीत पण त्या दोघांना काही तरी सांगायचं होत एकमेकांना.... त्यांचे असे चोरून बघणे कोण्ही तरी नक्की पहात होते....कोण असेंन....??

अभिषेक : ऐका मी काय बोलतोय ...आता हा आपला फायनल इअर आहे...तसे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये रहाऊ ...पण मधी आपल्याला चार दिवस मोठा हॉलिडे आहे... आपण त्याचा फायदा उचलू... क्या बोलते पंटर लोग....?
....अभिजित च्या अश्या बोलण्याने सगळे जण एकमेकांकडे काळजीच्या नजरेने पहायला लागले

अभिषेक : क्या हुआ.... सबके थोबडे पे बारा क्यु बजे....???

नंदु : ते कायेना तुझा प्लॅन मस्तय रे भावा... पण कायेना ते सगळ्यांनाच जमेन अस नाही वाटत

मयुरेश :आणि ते पण चार दिवस....????

(सगळे एकाच स्वरात म्हणाले ....हो ना)

अभिषेक : अरे मी चार दिवस कुठे बोलतोय पण निदान दोन दिवस...?नाही तरी उद्या शुक्रवार आहे उद्या निघायचे आणि रविवारी यायचे बस्स.....

ध्रुवी : अरे तुमच्या मुलांचं ठिके पण आम्ही मुली काय सांगुन निघायचं(सगळ्या जणी काळजीच्या स्वरात ....हो ना यार....???)

संगीता : तसा माझ्या घरात काही प्रोब्लेम नाय येणार... रहायला तुमच्या दोघांचा प्रश्न....

अजित : मुद्दामुन (एक काम करा तुम्ही सांगा की आमची पिक निक आहे)मग तर चालेना...???

अजित चा बोलणं सगळ्यांना पटलं पण करुणाला खोटं बोलणं पटतं नव्हतं...

नंदु : काय झालं करुणा... काही चिंता

करुणा : नाही काही नाही ...पण ते खोटं....काळजीच्या स्वरात

ध्रुवी : अगं आपण खोटं बोलतोय पण आणि नाही पण....हे बघ आपण पिकनिकलाच चालोय..पण फक्त तिकड शिक्षक नसणार ...आणि तुझे आई वडील... तुला जर शिक्षक नाहीये समजल्यावर पाठवणारे का तुला...नाही ना...म्हणुन त्या जागी तुला एवढाच सांगायचंय की आमची पिकनिक चालीये....

(करुणाला तिचे म्हणे पटते... आणि ती एक मोठा श्वास घे)

(तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन अजितला सुद्धा आनंद झाला)

मयुरेश : चला मग डन ....

.....(सगळ्यानी आपआपला अंगठा दाखवून संमती दर्शवली)

मयुरेश : पण आपण जायचं कुठे... प्लेस तर डीसाइड करा

अभिषेक :त्याची चिंता नको करुस ...ते मी ऑलरेडी ठरवलं आहे

(सगळे जण एकटक अभिषेक कडे बघतात)
अभिषेक : अरे भाई वो गांना हे ना ..

........

ऐ क्या बोलती तु
ऐ क्या मैं बोलूं
सुन, सुना
आती क्या खंडाला?
क्या करूँ आ के मैं खंडाला
घूमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गाएँगे
ऐश करेंगे और क्या

( सगळे जण एक साथ आनंदानं ओरडतात... ओ वाव ....खंडाळा)

अभिषेक : मग कसा वाटला प्लेस

नंदु : एक दम रापचिक... पण रहायचा कुठे... खर्च....पाण्याचा काही पत्ता????

अभिषेक : अरे माझ्या एका मित्राच्या वडिलांचा रिसोर्ट आहे ...sea view reasort ....तिकडे मी कालच बोलुन ठेवला आहे...आपली सगळी सोय पक्की समज

संगीता : वा ग्रेट यार... कामले तुझी ...बरीच ठिकाणी ओळख आहे तुझी

(अभिषेक ची तारीफ केल्यामुळे तो त्याची कॉलर वर खेचतो)

करुणा :पण रिचा ला कोण सांगणार हे सगळं...?

अभिषेक : ते मी तिला sms करेन... घरी गेल्यावर....तर मग प्लॅन पक्का

(सगळे एका जल्लोषात ओरडतात येस सर)

संगीता... आता आपण कॅन्टीनमध्ये जाऊयाना... मला खुप भुक लागलीये(रडका चेहरा करत)

नंदु : तुला कधी भुक नाय लागत... जरा आरशात बघत जा स्वतःला.... अद्रक झालाय शरीराचा

(नंदुच्या अश्या बोलण्याने सगळे खळखळून हसतात)

नंदु : अच्छा सॉरी ...मस्ती केली ग...चल जाऊ.. चल.... एक काम करा तुम्ही व्हा सगळे पुढे मी दोन मिनिटात येतो ...ये अजित चल ना जरा माझ्या बरोबर...

संगीता :आता काय झाला परत

नंदु : अग काम आहे जरा ...तुम्ही व्हा सगळे पुढे येतोच मी आणि अजित

(सगळ्यांना आप आपली संमती दर्शवून कँटीन मध्ये निघाले)

(नंदु इकडे अजित ला गार्डन मध्ये घेऊन आला)

अजित : काय झालं नंदु इकडे कश्याला आलो आपण ...???

नंदु:कशाला म्हणजे... अरे बाबा आता कॉलेज पण संपत आलाय... मग कधी बोलणार तिच्याशी

(नंदुच्या अशा बोलण्याने अजित जागेवरच थबकला)

नंदु: काय... बागतोयस काय माझ्या कडे... मला काही समजत नाय वाटलं का तुला... अरे जरी गावकडला असलों ना मी तरी प्रेमाचे धडे समजतात मला...मी पण केलाय प्रेम...पण एवढंच की ती ह्या जगात नाय आता...लय आधीच गेलीये मला सोडुन... ती जिकडे गेलीये ना तिकडून येणं शक्य नाये रे...पण तू असा नको वागुस... काये ते एकदाच बघ आणि कर आपलं मन मोकळं

(नंदुच्या आशा बोलण्याने अजित ला भरून येत...तो त्याला बिलगुन मिठी मारतो... काय करू यार तुच सांग मला... आज परेनंतर सगळं काही तुला शेर केलं मी...माझ्या घरातील सगळ्या गोष्टी तुलाच माहीत....मग कधी कधी वाटत तिला जर मी बोलो की प्रेम आहे माझं तुझ्यावर... तर कशावरून ती एकसेपट करेन... ति नाही बोली तर..भीती वाटते रे मला... नंदु मी आज ज्या घरात रहातो ते सुद्धा माझं नाहीये...मी फक्त नि फक्त माझ्या आई साठी रहातो.... मला नाही आवडत रे हे पार्टी... ड्रिंक...क्लब... अरे ज्या घरात माझ्या आईला इज्जत नाही तिकडे हिला पण इज्जत मिळेंन हे कशावरून... माझ्या घरात काय चालय मला सगळ माहीत आहे... माझ्या आईला फक्त नाही माहीत... नाही तर ती तुटुन जाईन रे...त्या घरात ती फक्त माझ्या साठी स
जगते... माझ्या डॅड मध्ये आणि आई मध्ये काही तरी खटकलं आहे हे नक्की... पण काय ते पण मला नाही माहीत... मग माझं प्रेम मी दाखवुन काय करू... )

नंदु :हलकं हसत(अरे अजुन प्रेमाला सुरवात झालीच नाही आणि तू पुढचा एवढा विचार करतोस... तु एकदा बोलून तर बघ करुणाला ती तुला हाच बोल
नार बघ....100% कारण तिच्या डोळ्यात पाहिलंय मी...आणि काय रे पुढचं पुढे बघता येईल सुरवात तर कर

अजित :तू बोलतोय ते इजि नाहीये नंदु....(थोडा टेंशन मध्ये)

नंदु :अरे मित्रा जिंदगी एवढी सोपी असती ना तर माणसाने लय फायदा घेतला असता बर का... एक काम कर आपण चालोय ना खंडाळ्याला ...तिकडं गेल्यावर बोलुन टाक.. मग बघु काय होईल ते होईल

अजित...(काळजीपूर्वक नंदूकडे बघतो)

नंदु: चल आता निघुया ...दोन घास पोटात गेले ना...मग आपोआप सगळ सुचत चल... नाय तर ती संगीता फुगयची माझ्यावर(दोघे पण हसतच निघतात कँटीन मध्ये)


(मग कसा वाटला आजचा भाग नक्की तुमच्या कंमेंट द्वारे कळवा)
....

🎭 Series Post

View all