चाफा बोलेना भाग 3 Chafa Bolena Part 3

कांजीवरमसिल्क साडीमघ्ये कविता सुंदर दिसत होती. किमया व सुषमा वहिनीनी तिच्या लांब सडक केसांची वेणी घालून भरपूर गजरे लावून साधेच पण सुंदर सजवले होते. हळद लावल्याने एक निराळेच तेज तिचे व्यक्तिमत्व खुलवत होते. निशिकांतने क्रीम कलरची शेरवानी किमयच्या भरपूर आग्रहा खातर चढवली होती.
चाफा बोलेना भाग 3

सगळ्यांच्या सहमतीने कविता आणि निशिकांत यांचे लग्न ठरले .
सुषमा वहिनिची अगदी धांदल उडाली.
आईच्या आजरपणात झालेले कर्ज फिटल्यावर कविताने हातात दिलेल्या पगारातूंन शक्यतो खर्च न करता वहिनी शिलकीत टाकत असे. त्यातून थोडे थोडे सोने तिने जमवले होते.
गद्रेकाकुंसोबत जाऊन कविताच्या पसंतीने एक छान पेंडेंट आणि साजेसे कानातले त्यात झाले. त्या पेंडेंटला दोन्ही बाजूने बारीक काळ्यामण्यांचे जाड सर गुंफुन मागे गोंडा लावून गळाबंद असा तन्मणी पटवून घेतला.
निशिकांतच्या आई बाबांनी गद्रेकाकुंकडेच कविताच्या पसंतीने साडी खरेदीचे काम सोपविले होते. त्याप्रमाणे एक निळ्या रंगाची डिझायनर साडी आणि एक आंबा कलर आणि मोठे लाल काठ असलेली कांजीवरम सिल्क घेतली .
दुःखी असल्याने फक्त कुटुंबातील लोकांच्या साक्षीने नोंदणी पद्धतीने लग्न करावे असे ठरले . परिस्थिती नुसार गद्रेसाहेब व काकुंनी सर्व गोष्टि ठरवण्यात पुढाकार घेतला .
कविताच्या हातावर मेंदी काढताना सुषमा वहिनीच्या डोळ्यांत पाणी आले . तिने विचारले " कविता, तुला नक्की पसंत आहे ना गं हे लग्न ?तू कोणत्या दबावाखाली होकार दिला नाही ना ?"
" वहिनी, आधी मला समजल्यवर नकार द्यावा असे वाटले होते. पण त्या छोट्या बाळाना पहिले आणि सगळे पण, परन्तु वाहून गेले गं! आपल्या एका निर्णया मुळे कोणाचे उध्वस्त आयुष्य सावरत असेल तर किती समाधनाची गोष्ट आहे!"

घरातल्या घरातच शेजाऱ्यांना बोलावून कविताला हळद लावली. श्रीखंड पूरी, बटाटयाची भाजी व मसालेभात असा सूटसुटीत मेन्यू ठेवला होता. मिसेस फुर्टाडो व बुटीक मधले कविताचे सहकमर्चारी देखील शुभेच्छा द्यायला आले होते .
सगळ्यांनी मिळून काही ड्रेसेस व मिसेस फुर्टाडोनी इमिटेशन ज्वेलरी आणि एक पार्टिवेअर साडी गिफ्ट केले .
दुसऱ्या दिवशी दादा, वहिनी, निशिकांतचे आई वडील, मंजुश्रीचे आई वडील, गद्रेसाहेब, काकु आणि किमया ह्या कुटुंबियांच्या साक्षीने निशिकांत व कविताने रजिस्टर वर सह्या करून एकमेकांना हार घातले. निशिकांतच्या आईने दोघांना अर्धा अर्धा लाडू भरवला . दोघांनी मोठ्यांचे नमस्कार करून आशीर्वाद घेतले.
कांजीवरमसिल्क साडीमघ्ये कविता सुंदर दिसत होती. किमया व सुषमा वहिनीनी तिच्या लांब सडक केसांची वेणी घालून भरपूर गजरे लावून साधेच पण सुंदर सजवले होते. हळद लावल्याने एक निराळेच तेज तिचे व्यक्तिमत्व खुलवत होते.
निशिकांतने क्रीम कलरची शेरवानी किमयच्या भरपूर आग्रहा खातर चढवली होती. रुबाबदार दिसत होता मात्र डोळे रात्रभर जागल्या सारखे वाटत होते.
गद्रेसाहेबांनी जवळच्या \"सरोवर\" या पॉश होटलमधे जेवयला नेले. दीपू, निमिष आणि मीतू तिघं टिवल्य बावल्य आणि मस्ती करून मजा घेत होते.
अश्या रीतीने दहा-पंधरा दिवसांतच दादाच्या घरातून कविता नवरी बनून निशिकांतच्या घरात आली.
घरी आल्यावर दोघांचे औक्षण केले. देवासमोर लाडुचा नैवेद्य अर्पण करून दोघांना उदी लावली. मंजुश्रीच्या आईने मीठ मोहऱ्या उतरवून दृष्ट काढली. दोघांनी मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले.
बाबांना नमस्कार करताना त्यांनी निशिकांतला मिठित घेतले.इतका वेळ आवरुन धरलेल्या भावना त्याच्या डोळ्यां वाटे पाझरु लागल्या.
त्याच्या पाठीवर हात फिरवत बाबा म्हणाले "जा, फ्रेश हो आणि थोडा वेळ आराम कर आता. "
निशिकांतच्या आई सुनंदाबाईनी कविताला मुलांच्या रूम मधे कपड़े बदलून फ्रेश व्हायला नेले. त्यांच्या मदतीनेच तिने केशरचना सोडवून घेतली आणि नेहमीच्या दोन वेण्या घातल्या.
कवितानेच पुढाकार घेऊन दोन्हीआजींच्या मदतीने स्वयंपाक केला. मुलेही बिचकत बिचकत कुतूहलाने आसपास वावरत होती. जेवणं उरकुन मागचं आवरेपर्यंत कविताच्या मागे मागे घोटाळत एकमेकांच्या कानात खुसुर फुसुर चालू होती. शेवटी निमिषने पुढाकार घेऊन विचारले " आंटी , तुझे केस कित्ती लांब आहेत! आम्ही हात लावू का?"
आजी म्हणाली " अरे निमिष तिला आंटी नाही म्हणायचं! तिचं नाव कविता आहे. तुमची नवी मम्मी!"
मम्मीचं नाव काढल्या बरोबर मुलांचे कावरे बावरे होत चाललेले चेहरे पाहुन कविता पुढे झाली "माझ्या जवळ कोण झोपणार,त्याला मी एक छानशी गोष्ट सांगणार आणि झोपताना माझे केस डोळ्यांवर ठेवायला मिळतील!"
मी, मी करत दोन्ही पोरं तिला बिलगली

" निमिष आणि मितूची आई हो. त्यांना जेऊ घाल, आंघोळ घाएक होता निमिष आणि एक होती मितू. दोघांची मम्मी मंजुश्री. खुप लाड करायची. एकदा काय झालं मम्मी खु ...प आजारी पडली. हॉस्पिटल मधेसुद्धा बरी होईना. मग देवबाप्पा म्हणाला मी हिला माझ्याकडे नेतो मग बरे वाटेल तिला. पण….म...ग निमिष अणि मितूला कोण संभाळणार बरं? मग देवबाप्पाने कविताला सांगितले तूल, अभ्यास घे आणि रात्री झोपतांना छान छान गोष्ट सांग."
" तुला देवबाप्पाने पाठवलेय ? तू आमची आई आहेस ?"
" तुला मी कविताई म्हणू ? "
"ए हे रे वेडोबा! ती काय ताई आहे का?"
तिघेही हसण्यात बुडाले
" तुम्हाला जे आवडेल ते म्हणा. मग! आज पासून आपण फ्रेंड्स O K?"
"O K" दोन्ही आवाज एका सुरात आले.
कविताच्या दोन्ही बाजूला दोन पोरं तिला बिलगुन झोपली. कितीतरी दिवसांनी भीतीदायक स्वप्न न पडता निश्चिंत झोप त्यांना मिळाली होती.



क्रमशः