चाफा बोलेना भाग 2

संध्याकाळचे साडे पाच वाजत आले तशी कविताच्या हृदयाची धडधड वाढली. फ्रेशरूम मधे तिने उगिचच चेहरा चेक केला . हलकेच कॉम्पैक्टचा हात फिरवला. स्वतः ला धीर देऊन ती आपल्या जागेवर परतली.
चाफा बोलेना भाग 2

संध्याकाळचे साडे पाच वाजत आले तशी कविताच्या हृदयाची धडधड वाढली. फ्रेशरूम मधे जाऊन तिने उगिचच चेहरा चेक केला . हलकेच कॉम्पैक्टचा हात फिरवला. स्वतः ला धीर देऊन ती आपल्या जागेवर परतली.
\"ला - फिगर \" बुटीकमधे कविता नोकरी करते. आईच्या आजारपणामुळे बारावी नंतर मिळेल ती नोकरी करत, बाहेरुन (external) परीक्षा देऊन कविताने आपले graduation पूर्ण केले. या बुटीक मधे नोकरी मिळाली . तिचे मनापासून प्रमाणिकपणे काम करणे, शिकण्याची तळमळ पाहुन मिसेस फूर्टाडो- बुटिकच्या मालकिणबाई प्रभावित झाल्या. हळू हळू बऱ्याच महत्वाच्या जबाबदाऱ्या कविता सांभाळू लागली. शहरातील उच्चभ्रुभागात बुटीक असल्या कारणाने कामाचा भाग म्हणून fluently इंग्लिश बोलणे व प्रेझेंटेबल रहाणे हे ही त्यांनीच शिकवले. कवितावर त्यांचा खूप विश्वास व माया होती .
आज कविता अस्वस्थ होती , कारण तिला पहायला- भेटायला एक तरुण येणार होता. गद्रेकाकुंनी परवा सांगितले त्याच्याबददल . \" रुबाबदार, चांगली नोकरी , स्वतःचे घर, गाड़ी सर्व काही आहे आणि …. आणि सोबत दोन मुले सुद्धा !\"
कविताच्या घशात आवंढा आला. आईची खुप आठवण आली .
आई गेल्यावर सुरेशदादाचे लग्न झाले. सुषमावहिनी घरात आली, घर हसू खेळू लागले. वहिनी बडबड़ी, उत्साही, तितकीच प्रेमळ ! पगार हातात दिला तरी तो वाचवून ठेवत असे. म्हणायची माझ्या राजकुमारीच्या लग्नसाठी ठेवते आहे!
सतत काही ना काही करून आपल्या पतिच्या तूटपुंज्या पगारात भर टाकून, टुकीने संसार करणारी.तिला आईची कमी भासु नये या साठी धडपडणारी. तिच्यामुळेच गद्रेकाकुंशी ओळख !
गद्रेकाकूंचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते ….\" नुकतीच त्याची पत्नी वारली….. , सर्व काही जमुन आले तर राणी सारखी राहशील. त्याला आणि मुलांनाही तुझा आधार होईल, तू त्यांचं घर सावरशील.\".....
सहा वाजता निशिकांतचा कॉल आला. मिसेस फूर्टाडोना त्याला पहायचे होते म्हणून बुटीकमधेच यायला सांगितले. एक ऊंच, रुबाबदर तरुण आत आला. तिची चौकशी करून तिच्यकडेच येत होता. "नमस्कार! मी निशिकांत आपण कविता का ?"- निशिकांत
" हो नमस्कार! मी आलेच हं "
मॅडमना सांगून ते दोघे बाहेर पडले .
तिचे अवघडलेपण पाहुन त्याने सूचवले ." समोरच्या रेस्तराँमधे कॉफी घेत बोलता येईल."
मानेनेच हो म्हणून कविता पुन्हा खाली पाहू लागली.गद्रेकाकुंचे शब्द पुन्हा मनात घरंगळले \" सर्व काही जुळून आले तर ….\"
इतका स्मार्ट, ऊंच,दुःखाच्या छटेमुळे चेहरा ओढल्यासारखा दिसतअसला तरी मूळचा उमदेपणा लपत नाही.
कॉफी आर्डर करून ती येई पर्यंत निशिकांत शब्दांची जुळवा जुळव करण्यात गुंतला होता. कविताकडे त्याचं लक्ष नव्हतं.
" गद्रेसाहेब मला माझ्या मोठ्या भावा प्रमाणे आहेत. त्यांच्या आणि वहिनींच्या आग्रहामुळे मी इथे आलो आहे. माझ्याबद्दल तुम्हाला कल्पना दिली असेलच ! मात्र मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत . " -निशिकांत
यावर कविताने मान हलवून पुढे बोलायला सूचवले.
घसा साफ करून तो बोलू लागला. " माझे मंजुश्रीवर- माझ्या पत्नीवर अजूनही खुप प्रेम आहे. तिची जागा दूसरे कोणी घेऊ शकत नाही.मुले लहान आहेत. त्यांची जबाबदारी घेण्याची मनापासून तयारी असेल तर आणि तरच पुढे जाता येईल."
" मनातली एका व्यक्तिची जागा, दूसरे कोणी कधीच घेऊ शकत नाही".
कविताने प्रथमच तोंड उघडले. तिचा नाजुक घंटेसारखा गोड आवाज त्याच्या मनाने टिपला.
" झाल्या दुर्घटने बददल ऐकुन मलाही खुप वाईट वाटले. परंतु एक सांगावेसे वाटते की प्रत्येकाशी आपलं स्वतंत्र नातं असतं. जसे की वेगवेगळे मित्र, भाऊ , बहिणी. एकमेकांशी तुलना न करता प्रत्येकाशी आपलं वेगळं नातं असतं. तसंच याबाबतीतही विचार करायला हरकत नसावी."
आपले विचार मांडताना तिच्या भाउक डोळ्यां मधला आत्मविश्वास एक क्षण त्याचे लक्ष वेधून गेला.
" यावर विचार करेन पण मला थोडा वेळ लागेल ." -निशिकांत
" आणखी एक महत्वाची गोष्ट! मुलांचा विचार करूनच मी ही जबाबदारी घ्यायला तयार झाले . आईची कमतरता काय असते, याचा अनुभव आहे मला." -कविता
"Ok then ! मुलांना भेटायला, घर पहायला उद्या येऊ शकता ? घाई करतोय असं वाटेल पण नाईलाज आहे . घरी सगळंच डिस्टर्ब झालंय "
- निशिकांत
" मी घरी विचारुन तसा फोन करते तुम्हाला " - कविता
दुसऱ्या दिवशी गद्रेसाहेब, काकू यांच्या सोबत दादा, वहिनी आणि कविता निशिकांतच्या घरी गेले.
निशिकांतचे आणि मंजुश्रीचे आई वडील होते. घरी आलेल्या अनोळखी पाहूण्यांना लांबूनच टूक टूक पहणारी दोन छोटी मुले . गद्रेकाकुंनी कविताने आणलेला खाऊ घ्यायला दोघांना जवळ बोलावले. प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवला तश्या कळ्या खुलल्या.
मोठा निमिष आणि छोटी मीतू . दीपू सोबत दोस्तीही झाली .


क्रमश:




\"चाफा बोलेना \" ईरा सोबत माझे पहिले पाऊल ! पहिल्या भागाला तुम्ही पसंत केलेत छान वाटले . इथून पुढे एकत्र प्रवास करूया . प्रतिक्रिया जरूर दया .