चंद्र आहे साक्षीला

टक्कल पडलेला नवरा नको असे म्हणणाऱ्या सर्व उपवर तरुणींकरिता ..

सकाळी रेडिओ चालू केला आणि आवडत्या भावगीतांच्या कार्यक्रमात पहिलेच गाणे....पान जागे फुल जागे............चंद्र आहे साक्षीला.डोकच सटकल ना!!हे म्हणजे गोड खिरीत मिठाचा खडा लागला ना यार.तरी पण मनाला आवर घातला आणि आमच्या चंद्राला म्हणजे यांना आवाज दिला.लग्नाला जायचं होत.जरा लांब असल्याने लवकर निघायच होत.हो !!हो!!वाचक हो सांगते ओळख.मी सीमा पाटील एक चार्मिंग,कर्तवयदक्ष युवती.(हे माझा नवरा सोडून सगळ्यांचं मत)तसं पण लग्न झाल्यावर नवऱ्याच्या मताला काही .....जाऊ द्या.

तर एकदाचे मस्त तयार होऊन आम्ही निघालो.मैत्रिणीच्या भावाचे लग्न होते.जवळपास आठ वर्षांनी सगळे भेटणार होते.मनात उत्सुकता आणि भीती पण होती.भीती का??कळेलच की.हॉल वर पोहचलो आणि थोड्या वेळाने सगळे येऊ लागले.आमचा जिवलग पाच जणींचा ग्रुप जमला.नवऱ्याना बाजूला करून लगेच गप्पा आणि खिदळणे सुरु झाले.मस्त माहोल तयार झाला होता.अचानक हे आले आणि टोपी काढत म्हणाले,"सीमा किती उकडतय इथे".इकडे माझा संतापाचा ज्वालामुखी बाहेर यायला पहात होता.कितीदा बजावलं होत,टोपी काढू नका.

सगळ्या जणी यांच्याकडे आ वासून पहात होत्या आणि नंतर त्या शैतानी नजरा नव्वद अंशात माझ्याकडे वळाल्या. लगेच सुमी ने गाणं सुरु केलं.चंद्र आहे साक्षीला.......सगळ्या हसत सुटल्या.नवऱ्याला काहीही कळेना.मग तो सरळ सुमी ला म्हणाला,हिला हे एवढं एकच गाणं का आवडत नाही?????काय गौडबंगाल आहे हे.आशु आगाऊपणे पचकली, सीमे सांगू का????गप ग .चला हो बाहेर जाऊ जरा.पण माझ्या मैत्रिणी आता हा चान्स सोडणार नव्हत्या.

जीजू बसा हो!आता अस्मादिकांना तोंड कुठं लपवाव असं झाल.तर .....सुमी पोझ घेत सांगू लागली.शेखर जीजू प्रसंग साधारण आम्ही फायनल इअर ला असतानाचा आहे.आमच्या कॉलेज ला एक हुशार,बुद्धिमान आणि सुंदर गाणारा मुलगा होता .जय!!!सगळ्या कोरस ने ओरडल्या. तर ही तुमची बायको कॉलेज च्या ब्युटी क्वीन मध्ये टॉप पाच मध्ये आणि बिचाऱ्या जय चा क्रश. आता हे ऐकल्यावर नवरा सावरून बसला ,मग???

काय शेवटी त्याने धाडस केले आणि विचारलंच.तेव्हा ही तीच अपर नाक उडवून म्हणाली,"नाही"........टकला नवरा प्रश्नच येत नाही.या वाक्याबरोबर नवऱ्याला सगळे संदर्भ क्लीक व्हायला लागले.तरीच.... तेव्हा माझ्या केसांचं एवढं कौतुक होत.अहो,आम्हाला शंभर वेळा सांगून बोअर केलं.वर म्हणाली पण टकला नवरा घेऊन चाललो तर लोक चिडवंतील ना,चंद्र आहे साक्षीला????????????????अच्छा !!!म्हणून माझे फोटो ट्रॅडिशनल आणि टोपी सकट काढते काय????

मग मात्र अस्मादिकांनी कान पकडले.गपा ग नंतर टक्कल पडत नाही का कोणाला????अगं ये हेच म्हणायचो ना आम्ही सगळ्या आणि मग कोरस मध्ये माझ्या नवऱ्या सह सगळ्या गाऊ लागल्या

चंद्र आहे साक्षीला.................चंद्र आहे साक्षीला.