घरगुती पार्ट 2

घरगुती पार्ट 2


रात्री बाळ झोपल्यानंतर जेव्हा अजित किचनमध्ये गेला तर सुमन फ्रिज च्या कोपऱ्यात एकटीच बसून मुसमुसत तिला दिसली. "अग सुमन काय झालं? " एवढं म्हणायचं अवकाश आणि सुमन झटकन उठली. "काही नाही काय कुठे" करत ती किचन बाहेर जाऊ लागली. अजित ने तिला थांबवले. खुर्ची वर बसवून तिचे डोळे पुसले, तिला पाणी पाजले. "काय झाले सुमन , आज तू इतकी शांत. कुणी काही बोलला का? तुला काही दुखतंय का? कि मी काही चुकीचे केले?"
"नाही नाही तसे काही नाही"
"मग तू का रडतेयस? हे बघ तू असं दुखी मला अजिबात बघवत जात नाही. तू सांग मला तुला काय होतंय मी आता त्यावर उपाय करतो. "
सुमन ने रडत रडत सगळं किस्सा सांगितलं. आदल्या दिवशी गणेश चतुर्थी होती म्हणून सुमन आणि अजित आपल्या मित्राकडे गणपती बसवण्यासाठी गेले होते. सुमनने खूप दिवसांनी साडी नेसली होती. छान अंबाडा केला होता . अजित ने सुद्धा पारंपरिक शेरवानी घातली होती.
खूप फोटोस काढले गेले आणि एकमेकांचे व्हाटसअप स्टेटस सुद्धा ठेवले गेले. त्याच फोटोच वरच्या एक कंमेंट मुळे इतके रामायण घडले होते.
"सुमन, सर्वप्रथम मला सांग , घरगुती बाई म्हणजे तुला कोण वाटते ग?"
"तीच जी दिवसभर मुलांच्या मागे फिरनारी, सर्वाना हांजी हांजी करणारी, अडाणी सारखं सर्वांचं हवं नको ते बघणारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिचं स्वतःच कोणताच अस्तित्व नाही, आयुष्य नाही. काहीही न कमावती दिवसभर घरी झोप काढणारी. अगदी काकूबाई. दिवसभर मशेरी लावत एकमेकांच्या घरी चुगल्या करणारी. इकडचे तिकडे करून भांडण लावणारी. "
"हे तुला कुणी सांगितलं? हा सर्वात चुकीचा समज आहे? तू एवढी शिकलेली मुलगी आणि तू हा असा विचार कास काय करू शकते? हे टिव्हीवाल्यानी ना तुमच्या लोकांची डोकी दूषित करून ठेवली आहेत. स्वतः तुझी आई, माझी आई सगळ्या घरगुती बायका आहेत असं तूच मला एकदा सांगितलं होत. तेव्हा तुला हे असं वाटलं होत का? "
"नाही रे, मला म्हणायचं होत कि त्या घर खूप छान ठेवतात, घरातली प्रत्येक गोष्ट खूप आवडीने सजवतात. दिवसभर काम करतात पण तरीही हसतमुख असतात, घरात त्या नसतील तर घर खायला उठत. घरकाम करण्यात त्यांना आनंद असतो."

सलोनी पठाण

🎭 Series Post

View all