घडवून आणलेला बदल... प्रेमासाठी

आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची गरज जास्त असते, प्रेम काळजी वाटते

      शामराव सावकाश उठून आले पुढच्या खोलीत, त्यांनी राधा काकूंना उठवायच नाही अस ठरवल, अताशा रात्री नीट झोप येत नव्हती काकूंना, पहाटे झोप लागली होती त्यांना, चहा ठेवायला किचन मधे गेले, घर झाडून घेतल, चहा ठेवला, जमेल तेवढ सावकाश आवरल, नश्ताची तयारी केली, दूध पेपर घरात घेतला तेवढ्यात काकू उठल्या, काय हो मला का नाही उठवल, मी केला असता चहा, झोप लागली होती तुला, करत जा ग आराम , खूप केलस तू, काका बोलले, आताशा ते काकूंची खूप काळजी घ्यायला लागले होते, त्यांच्यातील हा बदल काकूंना खूप आवडत होता,
संध्याकाळी न चुकता फिरायला जात असत काका काकू, एकमेकांना छान वेळ देत, एक मुलगा होता त्यांना, चांगला शिकून तो परदेशात स्थाईक झाला होता, तो आला की घर छान गजबजून जायचा, इतर वेळी ते दोघंच.... मुलगा जवळ नाहिये या गोष्टीचा नेहमी त्रास व्हायचा त्यांना,
      पण नेहमी अस खेळकर वातावरण नव्हत त्यांच्या कडे, काकांचा स्वभाव कडक होता, काका बँकेत मोठ्या पोस्ट वर होते, शिस्तीच वातावरण होत घरात , रोज सकाळी 9 वाजता काका जायचे बँकेत, तो पर्यंत नाश्ता चहा जेवण सगळ बनवून व्हायच काकूनंच, नंतर मुलाच आवरण, पूर्ण दिवस जायचा त्यांचा, स्वतःसाठी वेळ नव्हता, संध्याकाळी परत स्वैपाक, वेळेत बदल चालायचा नाही काकांना, खूप बोलायचे ते जर काही चुकला तर, त्या मुळे घरातील सगळे घाबरून असायचे, मोकळा वातावरण नव्हत, टेंशन होत,
   एक दिवस काकू चक्कर येऊन पडल्या, सगळे घाबरून गेले, डॉक्टरांकडून तपासण्या करून घेतल्या, त्यात कॅन्सर झाल्याचे निदान झाले, पहिली स्टेज होती, लगेच उपचार सुरू केले, काका पहिल्यांदा घाबरुन गेले, आपण एकटी पडू की काय अशी भिती त्यांना वाटली, मनोमन बायकोची काळजी घ्यायची ठरवल त्यांनी,
घरात किती काम असत, पूर्ण दिवस जातो कामात हे काकांना दिसल, दोघीच घरी पण सगळ कराव लागत हे समजल, अताशा काकूंन कडुन काम होत नव्हत, थोड्याच दिवसात त्यांना बर वाटू लागल, पण काका ऐकत नव्हते ते अजिबात काम करू द्यायचे नाहीत त्यांना, आलेल्या परिस्तिथीत आपोआप हा बदल झाला होता काकानी स्वतः मध्ये केला होता हा बदल