गोडवा..

गोडवा मनाचा..

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा.. 

गोडवा शब्दांचा, संवाद साधणारा.. 


गोडवा प्रेमाचा, नजरेतले भाव ओळखणारा.. 

गोडवा नात्यातला गैरसमज टाळणारा.. 


गोडवा सत्याचा, असत्याला मात देणारा..

गोडवा मिठीचा, चुकांना सहज माफी देणारा.. 


गोडवा कवितेचा, अबोल प्रीत व्यक्त करणारा.. 

गोडवा पहिल्या भेटीचा, मनात ओढ बाळगणारा.. 


गोडवा चॉकलेटचा, औपचारिकता भुलवणारा.. 

गोडवा आपुलकीचा, बंध मनाचे मनाशी जोडणारा..