गळफास..

हरून गेले मी, स्वतःला सिद्ध करताना..



हरून गेले मी, 

स्वतःला सिध्द करताना.. 

नाही उरले त्राण,

स्वतःचा पक्ष मांडताना.. 

भरकटलेय कदाचित यश, 

मार्ग माझ्या प्रयत्नांचा शोधताना.. 

चढून वारंवार पायरी अपयशाची, 

आता थकलेय मनंही.. 

नवीन सुरूवात करताना.. 

खचते प्रत्येकवेळी, 

नियतीचे हे वार सोसताना.. 

पण जोमाने राहते परत उभी, 

यशाला कवेत घेण्यासाठी.. 

खुपतं माझ्या मनालाही, 

खेळ स्वतःच्याच भावनांचा करवून घेताना.. 

नाईलाज होतो माझा, 

स्वतःच्याच आयुष्याचा अंत शोधताना.. 

वाटतं का केला नव्हता मी भविष्याचा विचार? 

ही वाट निवडताना.. 

म्हणून आता वाटतो 'आत्महत्या'  हा एकच उत्तमोत्तम उपाय, 

या जाळातून बाहेर पडण्याचा..

या खेळाचे नियम कोण जाणे?

 कारण पुरे झाले हे हरण्याचे बहाणे.. 

कठीण झाले सारे पाहणे, 

डाव उलटे पडताना.. 

पण जिंकण्याचे वेड, 

मनातले वादळ शांत करेना.. 

 घेते मन भरारी,

 नवीन संधी हुडकताना.. 

ही अपयशाची पायरीही, 

जागवते मनात नवचेतना.. 

अनुभवाचे सारे बोल, 

नवप्रयत्न करण्यास देते मनास प्रेरणा.. 

म्हणून आता तो गळफासही, 

देतो इशारा मला जगण्याचा.. 

हार न मानता, 

अविरत प्रयत्न करण्याचा.. 


✍️

✨❣️ श्रावणी ❣️✨