गर्भपात..

एक भावस्पर्शी लघुकथा ..
गर्भपात...


रोहित आज घाईघाईत घरी आला.... त्याची आई शांता त्याची वाटच पाहत होती... शांताने आपली सूनबाई मालिनीला लगेच तयारी करायला सांगीतली.....


तिघे गाडीत बसुन निघाले.... रोहित स्वतः ड्रायव्हिंग करत होता तर शांता आणि मालिनी मागच्या सीटवर बसल्या होत्या..... कुठे चाललोय याची मालिनीला काहीच कल्पना नव्हती. कारण तिच्या नवऱ्याने व सासुने तिला काहीच संगितले नव्हते..... तसं तीची विचारायची हिंमत नव्हतीच म्हणा... कारण घरात सासूबाईंचा शब्द म्हणजे अंतिम.... त्याला सासरे व तिचा नवरा रोहित कधिच विरोध करत नसत.....


गाडी ऐका झोपडपट्टी वजा गल्लीत ऐका केबिन जवळ थांबली .....केबिन बाहेर कोणताही बोर्ड वैगरे नव्हता...



तिघंही त्या केबिन मध्ये गेले.... केबिनचा आतला दरवाजा उघडला... बाहेरून छोटीशी वाटणारी केबिन आत ऐसपैस होती.


तिघंही आत मध्ये गेली. तेथे दोन तरुण मुली व एक मुलगा बसला होता.... ऐका बेड बाजुला बरीचशी वैद्यकीय उपकरणे ठेवली होती....


मालिनीला त्या बेडवर झोपवले पोटावर लेप लावून एक उपकरण फिरवले.... बाजुला मॉनिटर वर बाळाचे हलणार कृष्ण- धवल चित्र दिसत होते.....


साहेब!.... हा घ्या रिपोर्ट! ...त्यांवर डॉक्टरांचा एड्रेस आहे!.... रोहितच्या हातात तो कागद देत तो तरुण मुलगा म्हणाला.... कागद हातात घेता घेता.... त्यांच्या मध्ये थोडी कुजबुज झाली..... तसा रोहितने डोळ्यांनीच शंताला इशारा केला.... काही तरी अघटीत घडणार आहे याची कल्पना मालीनीला आली मात्र नक्की काय?... हे तिला समजले नव्हते.. तशी तीची विचारायची हिंमत नव्हतीच म्हणा.... तो रिपोर्ट घेऊन तिघंही गाडीत बसले..



अहो!... नक्की काय चाललंय? आणि आपण कुठे जात आहोत?.... बळ एकवटून मालिनीने रोहितला विचारले... आई!.... तुच सांग!..रोहित म्हणाला... सूनबाई! तुझी आताच सोनोग्राफी केली... त्यांत तूझ्या गर्भात मुलगी आहे अस समजले ...आम्हांला पाहिला मुलगाच पाहिजे त्या साठी तूझा गर्भपात करण्यसाठी आपण चाललो आहोत.... गर्भपाताचे नाव ऐकून मालिनीच्या पायाची वाळू सरकली.... मात्र ती काहीच करु शकत नव्हती... कारण त्यांच्या घरात सासूबाईंचा आदेश म्हणजे अंतिम त्याला कोणीच विरोध करु शकत नव्हते...


गाडी पुन्हा ऐका केबिन जवळ थांबली.... तेथेही तशीच परिस्थीती होती... बाहेर कुठलाही बोर्ड वैगरे नव्हता... तिघंही आत मध्ये शिरले... आत बऱ्यापैकी जागा होती.... चारपाच बेड लावले होते.... त्यांवर काही बायका झोपल्या होत्या.... आत मध्ये एक डॉक्टर आणि दोन नर्स गप्पा मारत होते.....


मालिनीला बेडवर झोपवले..... डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले... काही वेळानंतर मालिनी बेशुद्ध झाली.....


आई!... आई!!..... बाहेर ये लवकर!..... रोहित वर्तमान पत्र वाचीत शांताला हाक मारत होता.... काय रे!.... काय झाल?...कांताने घाईघाईत येऊन विचारले ......अग आई!.... ही बघ बातमी... आपण दहा दिवसांपूर्वी मालीनीला घेऊन ज्या डॉक्टर कडे गेलो होतो ना.... त्याला त्याच्या सर्वच साथीदारांसह अटक झाली आहे...... आणि हे बघ अजुन त्यांत काय लिहले आहे..... हे सोनोग्राफी करून गर्भात मुलगीच आहे अस प्रत्येकाला सांगुन बक्कळ पैसे घेऊन गर्भपात करत..... म्हणजे आई.. आपण मालीनीचा जो गर्भपात केला तो कदाचित मुलगाही असेल....रोहित काहीश्या जड आवाजात म्हणाला..... हो असेल कदचित.... शांताचेही डोळे काहीशे पाणावले.....आपण या गोष्टीसाठी उतावीळपणे फार घाई केली हे तिला समजले...पण आता पश्चाताप करून काय उपयोग होता कारण वेळ तर निघुन गेली होती........


मालिनीने ती बातमी वाचली... आणि तिला तो प्रसंग आठवला... जेंव्हा ती गर्भपातानंतर काहीशी शुद्धीवर आली होती..... तेंव्हा तिच्या बेडच्या पडद्यामागे त्या दोन नर्स बोलत होत्या..... मला तर येथे काम करायला देखिल वाटत नाही!...... आपले सर बेकायदेशीर सोनोग्राफी करून.... मुलगा असला तरी मुलगीच आहे अस सांगुन.... गर्भपात करून श्रीमंत लोकांना लुटतात ! ........हो! ग!! मलाही हे पटत नाही.... पण दुसरीकडे कुठे काम मिळत नाही म्हणून करतोय आपण..... काय करणार!........त्या दोन्ही नर्सचा संवाद जसाचा तसा तिला आठवला...... तो संवाद ऐकून मालिनीने तेव्हाच मनोमन ठरवले होते की, माझ बाळ गेले तर गेले... मी माझ्या सारख्या इतर स्त्रियांचा गर्भपात होऊ देणार नाही...... त्यामुळे मालिनीने दोनचार दिवसांत संबधित पोलिस अधिकारीच्या नंबर मिळवला....मालिनीच्या सुदैवाने पोलिस अधिकारी मीरा चव्हाण ह्या महिलाच होत्या..... त्यांना मालिनीने आपली हकीकत ऐका निनावी फोन द्वारे दिली... कारण तिला भीती होती की, चुकून या प्रकरणांत आपल्या सासु किंव्हा पतीचे नाव आले तर तिला त्रास होईल.... म्हणुन तिने मीरा मॅडम यांना आपले नाव कुठेही येणार नाही या अटीवर ती सगळी माहिती दिली होती.....


मालिनीने दिलेल्या माहितीनुसार मीरा मॅडम यांनी सापळा रचला आणि अलगद ही सगळी गॅंग पोलिसांच्या सापळ्यात अडकली..... आणि एक मोठे रॅकेट उघडकीस आले.......


मालिनी एक सामान्य स्त्री होती.... मात्र ती स्त्री शक्तीला ...जागली.....म्हणून ते रॅकेट पोलिसांच्या हाती लागले....पण आजपर्यंत तिच्या घरच्यांना माहिती नाही की, ही सगळी माहिती मालिनीने पोलिसांना दिली होती.....

(कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यांतील घटना व पात्र पुर्णपणे काल्पनिक आहेत.)

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने काही चुका असतील त्या बद्दल क्षमस्व )

लेखन: चंद्रकांत घाटाळ