बालकथा

बालकथा



आरव त्याच्या मामाच्या गावाला गेला होता, गावं छोटे होते,पण खूप सुंदर आणि निसर्गरम्य होते.तिथे खूप छान झाडं,नद्या,उंचच उंच डोंगर,रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांच्या रांगा,शेतमळे असे खूप छान वातावरण होते.आरवच्या मामाकडे पण खूप शेत होते.त्याच्या शेतात जांभळाची,आंब्यांची,सीताफळाची खूप झाडे होती,दोन विहिरी होत्या,शेताजवल नदी होती, आणि शेतात राहायला सुंदर कौलारू घर पण होते.त्यामुळे आरावचे तिथे खूप मन रमत होते.


आरव शहरात राहत असल्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींचे जास्त आकर्षण होते.त्याला हे सगळं खूपच आवडले होते.मामाचा तर तो एकुलता एक लाडका भाचा होता,मग काय मामा त्याला शेतात घेऊन जात असे,सगळीकडे फिरवत असे,नदीवर पाणी खेळायला नेत असे,झाडावरची फळे खायला देत असे.आरवला खूप प्रश्न पडत असत आणि त्यांची उत्तरे तो मामाकडे मागत असे.या झाडांना फळे कधी येतात, कशी येतात,मग ती कशी पिकतात,पिकल्याशिवय खाली का पडत नाहीत ?? असे कित्येक प्रश्नांची उत्तरे मामाला द्यावी लागत.


एकदा आरव त्याच्या मामा सोबत शेतात फिरत होता त्याचा मामा कामात होता,आरव मात्र इकडे तिकडे फिरत होता,फिरता फिरता तो बराच पुढे गेला होता,त्याच्या डोळ्यांवर काहीतरी चमकले,त्याने जवळ जाऊन पाहिले तर तिथे एक जुन्या काळातील दिवा पडलेला त्याने पाहिले, दिवा तसा खरंच खूप जुना होता पण त्याचा आकार जुन्या चहाच्या केटली सारखा आकर्षक होता,असा दिवा आरव पहिल्यांदा पहात होता.त्याने तो दिवा घेतला आणि त्याच्या वरची धूळ साफ केली तसा त्या दिव्यातून निळ्या रंगाची एक व्यक्ती बाहेर आली.


"बोलिये मेरे आका",असे म्हणत ती व्यक्ती चक्क बोलायला लागली.आरावला खूप नवल वाटले,अरे कोण तू,तू दिव्यात तू गेलासच कसा ?? त्याने त्याच्या सवई प्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली.


तो म्हणाला आम्ही जादुई दुनियेत असतो त्यामुळे निळे दिसतो,आम्हाला जीन म्हणतात.


मी एका राक्षसाच्या आज्ञेचे पालन केले नाही म्हणून त्याने मला या दिव्यात डांबून ठेवले,जो कोणी मला यातून बाहेर काढेल तोच माझा मालक असेल,आजपासून तू माझा मालक,मी तुझी सगळी कामे करेन. आरवलं हे ऐकुन खूप गंमत वाटली,अरे वा म्हणजे तू आता मी सांगेन तेच करणार का ?? तेवढ्यात मामाने आरवल हाक मारली,आरव म्हणाला अरे बापरे माझा मामा येतोय,तू पटकन आत जाऊन बस,पण पुन्हा बाहेर कसा येशील ??जीन म्हणाला या दिव्याला घासले की मी पुन्हा बाहेर येईन.


आरावच्या मनात जीनचे विचार सुरू होते.सकाळ होताच आरवने दिवा लपवून शेतात आणला होता.त्याने दिवा घासला,जीन बाहेर येऊन म्हणाला "क्या हुकुम मेरे आका",आरव ने त्याच्याकडे खाण्यासाठी काही वस्तू मागितल्या,मग गिफ्ट मागितले,खूप खेळणी मागितली.असे बरेच काही मागेल ते मिळाल्यावर त्याला खूप आनंद झाला,नाचायला लागला तो.


सुट्टी संपवून आरव आता घरी आला होता,शाळा,अभ्यास, क्लास सगळे पुन्हा सुरू झाले होते.पण आरवचे आता अभ्यासात लक्ष लागत नव्हते किंबहुना त्याला त्याची गरज वाटत नव्हती.आपल्याकडे तर जीन आहे,जो मागेल ते देऊ शकतो मग अभ्यास कशाला करायचा ?? असे त्याला वाटत होते.मग काय रोज संध्याकाळी त्याच्या रूम मध्ये बसून हवे ते जीन कडून मागून घ्यायचे आणि मस्त आराम करायचा इतकेच आरव करत होता,अभ्यासाकडे दुर्लक्ष केले होते त्याने.बघता बघता परीक्षा जवळ आली पण आरव ल कशाचीच काळजी नव्हती.त्याने जीन ल बोलावून सांगितले मला माझ्या परीक्षेत तू मदत कर, आलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग म्हणजे मी पास होईन,जीन म्हणाला पण मी अस करू शकत नाही आक.आरव ल राग आला तो म्हणाला मी तुझा अाका आहे तू माझे ऐकायला हवे आहे.


माफ कर दिजिये मेरे आका पण खरच मी तुमची परीक्षेत मदत नाही करू शकत,कारण माझी जादुई शक्ती आता संपली आहे.माझी शक्ती वापरण्या आधी मी तसे तुम्हाला सांगितले होते.


आरव खूप निराश झाला,बारीक तोंड करून बसला.आता मी काय करू जीन, मी तर अभ्यास केलाच नाही.जीन ल त्याची अवस्था पाहून वाईट वाटले,तो म्हणाला आ का मझ्याकडे शक्ती असली असती तरीही मी तुमची मदत करू शकलो नसतो परीक्षेत.माझ्या शक्तीचा वापर मी हवी ती वस्तू,गोष्ट आणून देण्यासाठी करू शकतो.यश मिळवून देण्यासाठी नाही.


अभ्यास करणं हे तुमचं काम आहे ते तुम्हालाच करावं लागेल.आपले काम,आपले कर्म आणि संघर्ष हा ज्याचा त्याचा असतो,त्यात मी काय करणार.त्यामुळे आता वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा यश नक्की मिळेल.


आरवने परीक्षा दिली,खूप कमी वेळात त्याने तयारी केली होती आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले,छान गुणांनी तो पास झाला.सगळ्यात जास्त आनंद जीन ल झाला. आता जीन आरवचा बेस्ट मित्र बनला होता. जीन म्हणाला आता मला जायला हवे माझे इथले काम संपले.आरव म्हणाला तू नेहमी माझ्या सोबतच रहा जीन.पण जीन म्हणाला या दुनियेत आम्ही नाही राहू शकत पण हा मी तुला एक वचन देतो कोणत्याही संकटात,अडचणीत मला फक्त हाक मार मी येईन.

असे म्हणून जीन आरवच खूप छान मित्र तिथून निघून गेला.