काळोखाचा उजेड

Hi , Iam a House wife. and I like to read.... Now I am trying to write... Thank irablog.

 
काळोखाचा उजेड

         संध्याकाळचे 6 वाजले होते. प्रिया  आणि श्रिया  बिल्डिंग मध्ये  पहिल्या पायरीवर आले आणि अचानक  वीज गेली. आठ वर्षाची श्रिया पटकन प्रिया ला बिलगली. तिने प्रियाचा हात घट्ट पकडला.
 आई ,आता काय करायचं. थोडं थांबुया ना खाली. कित्ती ब्लॅक झालंय बघ ना सगळीकडे. मला खूप भीती वाटते. 
श्रीयु ,बाळा घाबरु नकोस.आता आपण थांबलो, आणि लाईट लवकर नाही आली तर. तसही आपलं घर सेकंड फ्लोर वरच आहे. म्हणजे फक्त 20 स्टेप्स ओके. आणि घरी आपल्याकडे  जनरेटर लाईट आहे ना. सो रिलॅक्स.
पण ,आई  श्रियाचा स्वर रडवेला झाला होता.
श्रीयु, शांत हो. एव्हडा पन काही काळोख झाला नाहीये. प्रत्येक अंधाराचा एक उजेड असतो. आपण त्याच्याकडे नीट निरखून बघायची गरज असते. माझा हात पकड.  म्हणत प्रिया ने मोबाईल बॅटरी  ऑन केली. आता ठीक आहे.आता पायरी दिसते.
 हो आई. श्रीयु थोडीशी हसली .
छान. म्हणत प्रियाने मोबाइल पर्स मध्ये ठेवला. 
आई फोन पर्स मध्ये का ठेवलास. 
पर्स मधूनही उजेड येतोच आहे की आणि तो पुरेसा आहे.
तुला मी दिसतेय ना
हो थोडीशी दिसतेस. 
ठीक आहे आता खाली बघ ,मग वर बघ ,खुपच  अंधार आहे का? की थोडा थोडा  उजेड आहे
हो आई ,थोडासा उजेड आहे.
बस , झाल तर  मग त्याच थोड्याशा उजेडाकडे बघायचं  आणि पूढे पुढे चालत राहायचं ओके.
ओके आई. म्हणत श्रिया आईचा हात पकडून पायरी चढू लागली.
जमतंय ना, प्रियाने विचारले.
हो आणि मला पायरी पण दिसतेय.खूप काही काळोख नाही दिसतेय. मी उगाच घाबरत होते.
"थँक्यू आई."
कशाबद्दल ग, थँक्यू.
असच आज मला समजलं आंधराचाही एक उजेड असतो.  "गुड आणि आपण त्या उजेडाकडे डोळे उघडे ठेवून बघायला हवं."  प्रिया ने  तीच वाक्य पूर्ण केलं.


-----
मधुरा महेश.  

Thank u इरा.