काळ आला होता पण एक सेकंदाने वेळ चुकली

I like to read.

विषय-  काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
    शीर्षक- काळ आला होता पण एका सेकंदाने वेळ चुकली
        काही घटना अचानकपणे अशा घडून जातात की त्या कधी विसरल्या जात नाहीत,तर अनुभव बनून साथ देतात.
आयुष्यात वेळ खूप महत्वाची असते.  मग तो एक मिनिट असू दे किंवा एक सेकंद.
साल 2005 मधली गोष्ट आहे.
टेलरिंग क्लास च्या मी  आणि बाकीच्या सात जणी आणि आमच्या मॅडम  टिटवाळा गणपती ला गेलो होतो.
परत येताना रेल्वे स्टेशन वर खूपच गर्दी होती.मी तर  पहिल्यांदाच अस घरातल्या शिवाय मैत्रिणींबरोबर गेली होती. सर्वजणी ट्रेनची वाट बघत होतो. ट्रेन आली तशी सगळीकडे आत जाण्याची गडबड सुरू झाली. आम्ही सुध्दा एकमेकीबरोबर ट्रेन मध्ये चढतच होतो.
अचानक चढताना माझा एक पाय खाली गेला, आणि वर हँडल पकडलं नव्हतं तर दुसरा पाय ही सटकला,पण एक सेकंदाचा फरक
क्लास मधल्या बरोबरीच्या एका ताई ने माझे दोन्ही हात सरकत असतानाच माझ्या हातखालून तिचे  दोन्ही हात ठेवून पटकन वर ओढलं.     आणि बाहेर उभं केलं.    थोडावेळ तर मला कळलच नाही काय झालं. माझी एक सँडल ट्रेनखालीच गेली.  नंतर ट्रेन मध्ये आत जाऊन पाणी पिल्यावर थोडं बपर वाटलं. बापरे.
अजूनही तो क्षण डोळ्यासमोर येतो. जर त्यांनी तेव्हा मला ओढलं नसत तर.
तेव्हाच पटलं काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

******
मधुरा महेश कीजबिले.