कधी वडिलांनी आई व्हावे बघून.

प्रत्येक पुरुषाने स्त्रीला समजून घेतले पाहिजे,पुरुषांनी फक्त पैसे कमावून घर चालवले म्हणजे खुप मोठी जबाबदारी पार पडली अशी समज फार चुकीची आहे. परिस्थिती कधीचं सांगून येत नाही , आलेली परिस्थिती खुप काही शिकवून जाते.


मित्र हो मी बघितलं आहे तो वर, तर आपल्याकडे एक चित्र हमखास आपल्या नजरे समोर आपल्याला दिसते. तें म्हणजे स्त्रीने घर सांभाळावं  तसेच मुले बाळे असतील तर ती पण सांभाळावीत अजून जॉब असला तर तोही सांभाडावा. मग पुरुषांचे संसारात नेमके काम काय...? स्त्रीला समजून घ्यायला पुरुषांनी हातभार लावला तर अधिक सुखाचा संसारात होईल असं मला वाटते.
म्हणतात ना संसार म्हणजे सायकलची दोघी चाके. समान भार पेलणारी.
अशीच एका घरातली कथा आपल्यासमोर मांडली आहे. त्यातून तुम्हाला नेमके काय समजले हे मला कंमेंट्स द्वारे नक्कीच सांगा.
*******
आई गंsss आई गंsss असं ओरडत त्रिशा पोटाला हात लावून बेडवर आपल्या रूममध्ये वेदनेने किंचाडत  होती.
तिच्या किंचाडण्याचा आवाज मात्र खालच्या रूमपर्यत येत नव्हता. घरात फक्त त्रिशा आणि तिचे वडील म्हणजे (अविनाश )दोघीच होते. 13 वर्षाची त्रिशा आईविना पोरकी झाली होती. नलिनीला (त्रिशाची आई )जाऊन आता आठ वर्ष झाली होती. कॅन्सरच्या आजाराने त्रस्त झालेली नलिनी आपल्या वरची आईपणाची जबाबदारी  अविनाशवर सोडून गेली होती आणि तिने आपल्या आयुष्यातून शेवटचा निरोप घेतला होता.  तेव्हा त्रिशा फक्त पाच वर्ष्याची होती. तिने जातांना त्रिशाला माझी कधीचं आठवण येऊ देऊ नका म्हणून असे अविनाश कडून आश्वासन घेतलेले होते.
त्या आश्वासन अविनाश आज पर्यत पाडत होता. तिला सावत्र आई नको म्हणून लग्नही नाही केले. मात्र अविनाशने तिला तिच्या आईची आठवण कधीचं येऊ दिली नाही.
बघता बघता आज आठ वर्ष उलटून गेली होती. नलिनी गेल्या नंतर अविनाश त्रिशाला अंगोळ करण्यापासून,  तर तिला जेवण भरवन्यापर्यत सर्व करत असायचा. त्यामुळे तिला कधी आईची आठवण झाली नाही.
आज मात्र ती वेदनेने कडवडत होती. तिला सारखी आईची आठवण येत होती.
आज मात्र परिस्थिती काही वेगळीच  होती, पहिल्यांदा असा प्रसंग  तिच्यावर आला होता, शाळेत मैत्रिणींला कॉल करून विचारलं तर त्या म्हणतील की तुला तूझ्या आईने एवढं पण नाही सांगितल का असं म्हणून चिडवतील. मग नेमके विचारावे तरी कुणाला..? आज आई असती तर तिने मला जवळ घेतले असते मला ह्या दुखण्यावर काही तरी सांगितले असते. वडील तर आहेत पण त्यांना कसे विचारू ते काय विचार करतील..? असं विचार करत त्रिशा एकटीच आपले दोघी पाय पोटात अडकवून रडत बेडवर पडून राहिली. तेवढ्यात अविनाशने जेवण बनवले. तो तिची वाट बघत किचनच्या डायनिंग टेबलवर बसला. अजून का नाही आली ही..? झोपली की काय एवढ्यात..!!
असं स्वतःशीच पुटपुटत तो तिच्या बेडरूमकडे आला. अलगत दार उघडल. पहातो तर त्रिशा वेदनेने कडवडत होती. तो एकदम घाबरलाच.
तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत, त्याने तिला तपासून पाहिलं की तिला ताप तर नाही, पण तसेही काही नव्हते.
"काय होते आहे त्रिशा बाळा तुला...? काही दुखते आहे का...?"
पण त्रिशा काही बोलतच नव्हती. सारखी पोटाला हात लावून रडत होती.
"पोटात दुखते आहे का तूझ्या...?"
तेवढ्यात अविनाशचे लक्ष बेडवर अंथरलेल्या बेडशीटवर गेले तर त्यावर रक्ताचे डाग होते. आता मात्र त्याला सारा प्रकार नीट लक्षात आला होता.
त्याने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला हळू हळू एक एक करून विचारले.
"खुप दुखते आहे का गं बाळा पोटात...असं होते गं ह्या वयात आले की त्यात काय रडण्यासारखे वेडा बाई..!!" आधी शांत हो बरे पाहू...हम्म शान  तें माझं बाळ असे हळुवार पणे त्याने तिला समजवण्याचा पर्यत केला.
"काहीही झालेले नाही तुला बाळा, याला की नाही आपल्या भाषेत मासिक पाळी येणे असे म्हणतात बेटा...!! हा काही आजार नाही गं, याचा अर्थ, पाळी येणे म्हणजे स्त्रीला स्त्रीतत्व प्राप्त होणे.
हं...पोटात थोड्या वेदना होतात, अश्यावेळेस पाय दुखतात, कधी मडमडते, कधी गरगरते, जेवण नको वाटते, सारखी चिडचिड होते. हे सहाजिक आहे गं. मग अश्यावेळेस आपण काय करायचे तुला माहीती आहे. जरा अराम घ्यायचा कधी जास्तच दुखले तर गरम पाण्याची पिशवी  घेऊन पायांवर  फिरवली की बरे वाटते..!"
अविनाशने गरम पाण्याची पिशवी करून तिच्या कमरेवर फिरवली तिला बरे वाटले.
"ये बाळा त्रिशा...!! मी आलोच हं तोपर्यत तु जरा अराम कर असं म्हणतं तो घरातून बाहेर पडला.
तिच्याकरीता मेडिकलवरून सॅनेटर पॅड घेऊन आला.
हे...!!घे बाळा हे वापर म्हणजे तुला जरा अवगडल्यासारखे वाटणार नाही.
असं म्हणतं त्याने तिचा हात धरून बाथरूमपर्यत  तिला नेऊन सोडल.
मग मात्र त्रिशाला आईची आठवण येन थांबलं तिला आता ह्या बद्दल बाकी कुणाला विचारावेसे  वाटले नाही.
बाथरूम मधून परतल्यावर तिचा हात धरत त्याने तिला  तिच्या बेडवर झोपवलं. जातांना तिला बजावला "आता सवय करून घे... ह्या दुखण्याची हे मासिक पाळी चक्र आज पासून चालू झाले आहे अजून पुढील चार दिवस तुला ह्याचा त्रास होईल पण त्या नंतर तुला नक्कीच बरे वाटेल बघ, आज पासून दर महिन्याला तुला ह्याच्या सोबत सामना करावा लागणार आहे मग तर तुला स्ट्रॉग असले पाहिजे ना... म्हणून जेवण जात नसले तरी खाऊन घेत जा मग तर. तूझ्या पोटात जास्त नाही दुखणार आणि तुला अशक्त ही नाही जाणवणार असे समजावत तिला अविनाश ने आपल्या हाताने जेवण भरवले. जेवणनंतर तीआपल्या बेडवर शांत झोपी गेली होती, ह्या दुखण्याला ती पूर्णपणे विसरली होती. कारण अविनाश तिच्या तळ पायांची तेल लावून मालिश करत बसला होता.
त्याच्या डोळ्यात न कडत अश्रू आले तें म्हणजे ह्या साठी  की आपली मुलगी आज आपल्या नजरे समोर कधी मोठी झाली हे समजलेच नाही. मनोमन त्याने नलिनीला आपले आश्वासन मी आजपर्यत पडतो आहे चा दावा दिला. आज स्त्री घरात नसली तरी त्याने स्त्रीपणाची भूमिका काटेकोरपणे  बजावली होती.
*********
प्रत्येक पुरुषाने स्त्रीला समजून घेतले तर बरे होईल.
आणि काहींना ह्या मासिक धर्म (पाळी )येण्याच्या गोष्टी
किळसवाण्या वाटतात, तर काहींच्या घरात त्या नावाखाली स्रियांना लाजिरवाणी वागणूक दिली जाते.
खरं तर असे काहीही नसते. उलट त्या परिस्थितीमध्ये स्रियांना समजून घेतले पाहिजे. मासिक धर्म नाही तर पुढे काहीच नाही. हे ही लक्षात असू द्या.
परिस्थिती कधी सांगून येत नाही आणि आलेली परिस्थिती खुप काही शिकवून जाते.  हे ही तेवढेच खरे आहे.

**********
प्रस्तुत लेख  कसा वाटला, हे मला नक्कीच सांगा.
मला माहित आहे, निगेटिव्ह 
कंमेंट्स ही येतील पण हा लेख  फक्त समजदार व्यक्ती साठी असेल असं मला वाटते.