औकातंच बरी वाटते..

औकातंच बरी वाटते..

# मूळ रचनाकर्ता - मुन्शी प्रेमचंद ( भाषा - हिंदी) 

# अनुवाद - ✨❣️ श्रावणी ❣️✨


अनुवादाचे शीर्षक- औकातंच बरी वाटते.. 


इच्छा नाही बे मायी 

प्रसिद्ध व्हाची

बस तुम्ही मले ओळखता, 

मायासाठी हेच बहोत हाये.. 

चांगल्यानं चांगलं आणं

वांगल्याने वांगलंच समजलं मले.. 

कारण ज्याची जेवढी गरज होती, 

त्यांनं तेवढंच वळखलं मले.. 

जिंदगीचं भाऊ तत्वज्ञान भी, 

लेका लय येगळंच हाये.. 

सांज ढळाचा पत्ता नाही इथं 

पण वर्ष संपूनंच रायले.. 

येक येगळीच 

शर्यत हाये जिंदगी म्हणजे लेका.. 

जिंकलो तं आपलेच काही लोकं

 मागं सुटून जाते आणं 

हारलो तं आपलेच लोकं 

आपल्याले मागं सोडून पुढं जाते.. 

बसून जातो मी 

मातीच्या ढिगाऱ्यावर नेहमी

कारण मले आपली 

औकातंच बरी वाटते.. 


( भाषाशैली आमच्या नागपूरची आहे.) 

©®

✍️

✨❣️श्रावणी❣️✨