एक छोटीसी लव स्टोरी १४

Story About Friendship Love And Love In Friendship

प्रीती सगळ्या रस्त्या भर सुन्न होती. . ती काहीच बोलत नाही बघून शेवटी मंदार ने तिला घराजवळ सोडले. आपण घरी कसे पोचलो... ट्रेन ने कि बाईक ने हे सुद्धा तिला सांगता येणार नव्हते. जण सगळ्या जाणिवा सुन्न झाली होत्या. घरी आई वाटच बघत होती... तिचा तो मक्ख चेहरा, केस विस्कटलेले आणि शून्यातली नजर बघून आई चरकलीच....???????

 
काय झाले प्रीती? बरी आहेस ना? पेपर चांगलं गेला ना मग अशी का दिसतेय???

प्रीती मात्र सुन्न सोफावर बसून राहिली .. काही ही न बोलता....

शेवटी आई अधिक चिंतीतहुन प्रीती जवळ आली तर प्रीती पांढरी पडली होती. . तिचा तो अवतार बघून आई अधिक घाबरली. ....

नको नको ते विचार मनात येऊन गेले त्या क्षणी.. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बसली. .

प्रीती सांग न काय झाले ? कोणी काही बोललं का तुला? सांग ना. . काय झाले ते? मला खुप भीती वाटते आहे असे काय करतेयस? ...

ती मात्र जणू काही शब्द तिच्या पर्यंत पोचतच नाहीत अशी बसून राहिलेली. .

शेवटी आई ने तिला गदगदा हलवले. . तशी आई ला मिठी मारून रडायला लागली आणि चक्कर येऊन पडली. ..

आई ने धावत जाऊन शेजाऱ्यांना बोलावले. दोघं जणांनी मिळून तिला आत बेड वर झोपवले. प्रीतीचे अंग थंड पडले होते. ??????

मग बिल्डिंग मधले कोणतरी जाऊन डॉक्टरला घेऊन आले. इथे आईला सुचेना काय झालं ते.... डॉक्टरांनी तपासून सांगितले कि बी पी लो झाले आहे.. परीक्षा चालू आहे ना म्हणून टेन्शन आले असेल किंवा पेपर चांगला गेला नसेल किंवा कसलं तर जबरदस्त शॉक बसला असेल म्हणून अशी सुन्न झाली आहे बाकी काही नाही. एक इंजेकशन देऊन तिला झोपण्यात आले.... हळू हळू मग सगळं पांगले.


असलं कसले टेन्शन, पेपर नंतर फोने केलं होता प्रितीने घरी बाहेर जाऊ की मैत्रिणीबरोबर म्हणून तेव्हा काही बोललं नाही.. म्हणजे नक्कीच बाहेर गेली तेव्हाच काहीतरी झाले असणार. प्रिया निनाद दोघे असणार तिच्याबरोबर. .म्हणून आईने न राहून प्रियाला फोन केला. बराच वेळ फोन वाजला पण कोणी उचलला नाही म्हणून मग नीनादला फोन केला.. त्याला थोड्क्यात फोन करून सांगितलं काय झालं ते. . तो लगेच येतो म्हणाला.... 

१५ मिनिटात निनाद, निनाद ची आई आणि प्रिया सगळं घर पोचले. प्रीतीच्या आई चा चेहराच सांगत होता काही तरी भयानक झालं आहे.

सगळे आधी प्रीतीला बघून आले. तिला असं बघून तर नीनाद आणि प्रिया ला ही कळेना असं अचानक काय झालं ते. ती तर मंदार बरोबर होती कॉलेज सुटल्यावर... मग असं का झालं अचानक?????
 
प्रीती तुमच्या बरोबर होती ना. . मग काय झालं तिला अचानक? तिला कधीच बी पी चा त्रास नव्हता. .. मला खरे खरे सांग काय झालं ते? 


काकी .. प्रीतीला पेपर खुप कठीण गेलं आजचा.... म्हणून टेन्शन आल होते. कॉलेज मध्य पण डोकं दुखत म्हणा होती. ... मग आम्ही सगळं बाहेर गेलो आणि टाईमपास केला, अरबट चरबट खाल्लेले आणि घर आलो. .

बस्स बाकी काहीच झालं नाही. . नीनाद ने पटकन खोट सांगत म्हटलं. मग प्रिया ने ही त्याच री ओढली. ..काय करणार घरी अजून मंदार बदल काहीच माहित नव्हते ....

जे काही झालं होते ते तिच्या आणि मंदार मध्ये झालं होते. ..ज्याच्यामुळे प्रीतीला खुप टेन्शन आलं होते. हे नक्की....नेमके काय झालं ते आता मंदार कडून समजले पाहिजे. .

थोडं वेळ निनाद आणि प्रिया, प्रीती च्या रूम मध्य बसले. पूर्वी कितीदातरी ह्याच रूम मध्ये सगळ्यांनी पार्टी केली होत्या,अभ्यास केले होते आणि भांडण हि केली होती ...सगळ्यांच्या घट्ट मैत्रीचं साक्ष होती भिंतीवरचा त्यांच्या ग्रुप चा मोठा पोस्टर शाळेतली शेवटच्या दिवसाचा. ....आज प्रीती कडे बघवत नव्हते...

कसला शॉक बसला असेल तिला? दोघांच्या डोक्यात अनेक प्रश्न गर्दी करत होते.... काय झालं नक्की दोघं मध्ये?

कित्ता छान होत ना ते दिवस. ... कुठू आला हा मध्ये आणि सगळ्यांना तोडले ह्याने... प्रिया बोलली. .. 

सह्ह्ह गप्प राहा. . इथं काही नको बोलू प्रिया. . घर काही माहित नाही अजून. .. उगीच आपल्या मुळे प्रॉब्लेम होईल उगाच.....निनाद ने तिला दटावले...


 थोडं वेळ बसून दोघे निघाले. .. निघताना निनादने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि म्हणाला .. तूला त्रास देणारा जर तो मंदार असेल ना तर सोडणार नाही त्याला प्रीटी......प्रॉमिस.


दोघं बिल्डींगच्या खाली आले. प्रिया ला जाणवले हा खूप चिडला आहे. त्याने रागाने बाईकला किक मारली. चल... 

तिला जरा शहरापासून लांब घेऊन आला. . रस्त्यात काहीच बोलले नाही दोघं... आपल्याच विचारात दंग होते...


एक टपरी जवळ थांबले, त्याची शीर थाड्ड थाड उडत होती.  प्रियाला कळले खूप चिडला आहे हा. दोघेनी एक एक चहा सांगितलं आणि उभे राहिले. . मनात असंख्य प्रश्न होते. . 

शेवटी प्रिया ने सुरुवात केली. . निनाद , प्रीती आणि मंदार मध्ये नक्कीच काहीतरी जबरदस्त झालाय , नक्की काय झाले असेल रे. .ब्रेकअप तर नाही ना? तसे पण आजकाल दोघे खूप भांडंत होते.....

हहम्म्.. वाटत नाही.. ....

त्यानं जबरदस्ती करायचा प्रयत्न तर केला नसेल ना रे तिच्यावर...  तिने चाचरत विचारले.... 

त्याने चमकून तिच्याकडे बघितले. . वेडी आहेस का तू जरा? काहीही काय बोलते...( खर तर हाच प्रश्न तो स्वतःला हि विचारात होता. . मंदार ने  काही केले तर नसेल ना, तसे पण आजकाल वाईट संगतीत असतो, सिगरेट दारु सगळं चालू आहे त्याचे सोबत मित्र
आहेतच ) 

आणि केले असेल तर कोण सांगणार आपल्याला... काकू चा चेहरा बघितला.. तुला वाटते त्या खरे बोलत होत्या प्रीती ला बघितलेस कशी दिसतेय ते..

आता मात्र निनाद अजूनच चिडला सरळ फोन काढला 
आणि मंदारला लावला.... 

हॅलो. . बोल नीनाद काय म्हणतोस .....
 
तू काय केलेस प्रीतीला? काय झाले तुमच्या मध्ये? खरे सांग....मंदार... त्यानं चिडून म्हटले. . ???????????????????????


काय झाले? मी काहीच नाही केले... पण झाले काय ? ती ठीक आहे ना? त्यानं काळजीच्या स्वरात विचारले. .. 

इकडे निनाद आपलं राग कसेबसे कंट्रोल करत होता... खोटे बोलू नकोस मंदार. ... तिच्या ह्या हालतला तूच जबाबदार आहेस.... नक्कीच तूच काहीतरी केलं आहे. . कॉलेज मधून निघताना ती खूप आनंदात होती...

मला जर कळलं ना...कि तूच काही तरी केले आहेस प्रीतीला तर मंदार तुला सोडणार नाही मी .. हे लक्षात ठेव. ..असं 
म्हणत तो फोन रागानं फेकायला गेला.... प्रियां त्याला 
कसेबसे थांबवलं... 

निनाद शांत हो... प्लीज... तिने त्याचा हात पकडत म्हटले.. आज निनाद काही वेगळेच वागत होता... इतके चिडलेले त्याला पहिल्यांदा बघत होती... त्यात मंदार बदल प्रचंड चीड होती. . समोर असता मंदार तर नक्कीच निनाद ने जीव घ्यायला मागे पुढे पाहिलं नसते... तिला वाटून गेले...क्षणभर तिची आणि निनादची नजरानजर झाली... 

ओह्ह्ह आपल्या लक्षात कसे आलं नाही ??

निनाद थांब, प्लीज प्लीज शांत हो.. हे काय चाललंय तुझं...

. तुला प्रीती आवडते राईट ?? ही नुसती बालपणीची मैत्री नाही हो ना. ....त्यापेक्षा काही तरी जास्ती आहे हो ना....सांग ना !!!!! 

त्याने काही न बोलता मान फिरवली. .. वेडी आहेस का तू ? काहीही काय बोलते? 

खोटे बोलू नकोस निनाद .. तुझ्या आजच्या वागण्यावरून कळून येते आहे... कित्ती खोटे बोलशील अजून ... 

बस्स ..काय ऐकायचे आहे तुला हेच ना  की प्रीती आवडते 
मला??  

हो आवडते मला,आता पासून नाही तर प्रेम काय असते ना ते कळायच्या ही आधीपासून..... जेव्हां ती घरी दोन पोनी बांधून यायची ना गाणे शिकायला तेव्हांपासून... माझी नुसती
 मैत्रीण नाही तर बेस्टी आहे ती. .. बस झालं समाधान .. कि अजून काही ऐकायचे  आहे तुला. ... 

मग सांगितले का नाहीस तिला कधी..कोणाची वाट बघत होतास...? त्या मंदार ने काही करायची? प्रिया ने चिडून विचारले... 

नाही सांगू शकलो... भीती वाटायची नाही म्हणाली तर, घरी सांगितलं तर ,उगीच मी गैरफायदा घेतोय असं तिला वाटलं तर. ..जेव्हां सांगावेसे वाटले तो पर्यन्त मंदार मध्ये गुंतली होती ती.... करायला गेलो एक अन झाले भलतेच.. अनुजाला सेट करायला गेलो आणि प्रीती मंदार एकमेकांत गुंतले... मग काय मित्र म्हणून राहिलो फक्त.... दुःख एकच तिला कधीच जाणवले नाही माझ्याबद्दल..त्याने प्रॉपज केले ना ते पण मला येऊन सांगितले.. 

काय बोलू  तिला...ती  खूप खुश होती मंदार बरोबर ....मग कधी सांग
प्लीज हा गोष्ट कोणाला कळता काम नये. . प्लीज खास करून प्रीतीला...त्यानं डोळ्यात पाणी आणत म्हटले.. तुला कसे कळले माहित नाही पण हि गोष्ट आपल्यात राहील पाहिजे तुला अक्षय ची प्रॉमिस आहे प्रिया. ......

काय होई पुढे...? मंदार आणि प्रीती परत एक होतील? निनाद ल आपले प्रेम मिळेल?  
वाच पुढच्या भागात .. लाईक करा,  शेअर करा,  फॉललो
करा... आपापल्या हा कथा कशी वाटली ते नक्की सांगा. .