एक गोड आठवण

Its story abt mother daughter relation

आई हा शब्दच प्रेमाची ऊब घेऊन येतो

......मग तिच्या त्या साडीत तर अनेक आठवणी आणि अतोनात प्रेम असतं...

सासरी जाताना कितीही साड्या असल्या तरी एखादी आईची साडी असतेच आपल्या bag मधे.... साड्यांची हौस असो वा नसो.... आईची ढापलेली साडी हवीच.... आईही गंमत म्हणून नको नको म्हणत लेकीच्या अंगावर ती साडी बघून डोळ्यात आलेले अश्रू लपवते.

मी आईची साडी अगदी पहिल्यांदा संक्रांतीच्या हळदी कुंकूला नेसले होते. मला साडी नेसायची हौस अगदी लहानपणापासूनच!! आई नको नको म्हणायची आणि मी साडी नेसायचे.... मी खूप मोठी दिसायचे साडीत म्हणून नको वाटायचं तिला.... पण मला स्वतःला मोठी दाखवायची हौस ????.

मला आठवतं तेव्हाही मला कुठली साडी चांगली दिसेल तीच मी आईला घ्यायला लावायचे.... आताही तसंच करते ????. आईची साडी खरेदी म्हणजे जणू आपल्यालाच फ्रॉक मिळाला असा आनंद व्हायचा.

सासरी आल्यावर तर आईची साडी म्हणजे आपल्या मनातला हळवा कोपरा.... नुसता त्या साडीवरून हलकासा हात फिरवला तरी आपल्याला दूर असलेल्या आईची

माया आणि प्रेम याचा अनुभव मिळतो तर डोळ्यात पाणीही येतं....

आईच्या या साडीवर मोर असो वा नसो पण अलगद प्रेमळ भावना मात्र भरभरून असतात. कितीही fashion बदलू दे पण ही आईची साडी मात्र नेहमीच in असते.♥️

मुलगी आणि आई यांचं नातं शब्दात वर्णन करता येण्यासारखं नसतंच पण ही साडी मात्र ते गोड नातं जपत असते.

प्रत्येक मुलीने नेसलेली पहिली साडी आईचीच असते...... अगदी लहानपणी ही साडी गुंडाळून आरशासमोर मिरवायचं आणि आईसारखं दिसतोय नं आपण हे बघायचं हा तर प्रत्येकीचा आवडीचा खेळ असतो.... आता हे सगळे क्षण आपण आपल्या कॅमेरात shoot करून ठेवतो पण जुने क्षण मात्र मनात कोरून ठेवायचो.♥️

ही आईची साडी वर्ष वर्ष उलटून गेले तरी तशीच ऊब तशीच माया देत असते.... कपाट आवरताना सापडली की डोळ्यात अलगद पाणी येतं आणि परत एकदा नकळत पदर खांदयावर टाकून आपण स्वतःलाच बघतो आणि किती सुरेख म्हणून न्याहाळतो.... हो स्वतःलाच आणि आपल्यात आपल्यालाच दिसणाऱ्या आपल्या आईला..... जणू ती आपल्याला सांगत असते, बाळा कशी गुणी गं तू!!नातेही सगळे असेच जपते जशी साडी माझी विरली जरी तरी जपली निगुतीने!!❣️