ए आई अहो आई

This article is about difference between the relation of mummy and mummy ji

ए आई इकडे ये ना ,एक सेल्फी काढायचा आहे ."रोहिणी ने अशा ताईंना बोलावले . सोसायटी मध्ये एक कार्यक्रम  ठेवण्यात आला होता . 'शांती -सदन 'नावाच्या एका नव्या सोसाटीमध्ये हा  कार्यक्रम चालू होता .सोसायटी मध्ये राहणाऱ्या लोकांची  एकमेकांशी  ओळख वाढावी ह्यासाठी  हा कार्यक्रम आयोजित केला होता .सगळ्यात आधी  ५०-५५ वयाचे एक  गृहस्थ बोलण्यासाठी उभे राहिले "नमस्कार ,मी वसंत नार्वे , मी आणि माझी बायको फ्लॅट नो १ मध्ये राहतो. आमची मुलं बाहेरगावी असतात इथे आम्ही दोघंच असतो . हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे जेणेकरून आपली एकमेकांशी ओळख होईल आणि आपले नाते घट्ट होईल . मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो कि, सगळ्यांनी आपली ओळख करून द्यावी ." असं बोलून काका खाली खुर्चीत बसले .सगळे आप -आपली ओळख करून देऊ लागले .त्यातच एक रोहिणीच कुटुंब .सगळ्यांच्या ओळखीपाळखी झाल्यावर मस्त चहा घेत घेत गप्पा टप्पा  सुरु  होत्या .

"आमच्याकडे  तर फिरायला आणि चवीने खायला  खूप आवडत."- नार्वे काकू म्हणू लागल्या .

"अरे वा,छानच आहे .आम्हाला पण नवीन -नवीन रेसिपी शिकायला मिळतील त्यानिमिताने .."- mrs  चौधरी 

"हो ना मज्जा आहे ,आमच्या कडे ह्यांनाही चवीचं खायला लागत पण नोकरीमुळे इतकं काही करू शकत नाही रोज "- वीणा म्हात्रे .

"आपण एक काम करू शकतो ,आपण कि नई महिन्यातून एकदा एखाद्याच्या  घरी एकत्र जेवणाची मज्जा घेऊ शकतो, सगळ्यांनी एक एक पदार्थ बनवून आणायचा  ..काय म्हणता ?"-रोहिणी म्हणाली .अश्या गप्पा टप्पा चालूच होत्या .कार्यक्रम छान झाला .आजकाल अश्या गोष्टी   नव्या सोसायटी मध्ये होत असतात .जे कि खूप चांगले आहे नव नातं निर्माण होण्यासाठी . आशाताईंनी सगळ्याना  चहा च आमंत्रण दिल होत त्यामुळे आज आशाताई कडे सगळ्या चहा -पाण्यासाठी जमल्या होत्या . रोहिणीने पण  छान तयारी  केली होती .सगळ्यांच्या गप्पा टप्पा सुरु होत्या .

"ए आई ,इकडे येतेस का एक मिनिट ."-रोहिणी ने काहीतरी कामासाठी अशा ताईंना बोलावले . 

"अहो अशा ताई तुमची मुलगी खूपच स्मार्ट आहे ,त्यादिवशी ची तिची एकत्र जेवणाची कल्पना मला आवडली  ,बर का .."- वीणा म्हात्रे 

"हो ना , रोहिणी छानच बोलते ,सासरी सगळ्यांची लाडकी असेल नाही .. कुठे असतात तिचे सासू सासरे ?"- शलाका चौबे नि विचारले .आशा ताई हसल्या म्हणाल्या ,"हो तर, आहेच ती माझी लाडकी सून !". सगळे दोन मिन. बघतच राहिले .रोहिणी आणि साकेत चे लग्न होऊन ७-८ महिने झाले होते .लग्नाधीच साकेत  ने हे नवे घर बुक केले होते, म्हणजे लग्ना नंतर वास्तू पूर्ण झाली कि नव्या घरात संसार थाटायचा असं त्यांचं विचार होता .साकेत ,रोहिणी आणि साकेत चे आई बाबा असे एक कुटुंब शांती सदन मध्ये महिनाभर आधीच राहायला आले होते .साकेत च्या बहिणीचे लग्न झाले होते आणि ती मुंबईला होती .

"हो का ? राग मानू नका ,पण रोहिणी तुम्हाला 'ए आई' म्हणते ना म्हणून असं वाटले कि, तुम्ही तिची आईच आहात."-चौधरी बाई बोलल्या .

"अहो त्यात काय ? मी  आईच आहे तिची .मी जर साकेत ची आई होऊ शकते ,तर रोहिणीची  का नाही  होऊ शकत ? साकेत मला 'ए आई' म्हणतो माझी मुलगी स्वरा पण मला 'ए आईच' म्हणते ,मग रोहिणीने 'ए आई' म्हंटले तर त्यात काय वावगं आहे ?नाही का? खार सांगू ,जेव्हा जेव्हा रोहिणी मला 'ए आई' म्हणते तेव्हा तेव्हा मला माझी स्वरा च आठवते . 'अहो आई' ह्या शब्दात नकळतच एक इगो आणि अहंकार येतो जो कि नात्यामध्ये एक अदृश्य अशी भिंत तयार करतो ,म्हणजे बघा ना 'ए आई' ह्या शब्दामध्ये एक प्रेमळ हक्क असतो ज्यामुळे हे घर ,हि नाती तिला आपलीशी  वाटतात .तिला असे  वाटते  कि, ती दुसऱ्यांच्या नाही तर तिच्याच घरात आहे .जेव्हा आपली मुलगी 'ए आई' म्हणते तेव्हा ती त्या हक्काने घरात  वावरते मग तोच हक्क आपल्या सुनेचा हि आहे नाही का ? आपल्या सुनेचा आपल्या घरावर  ,आपल्यावर ,घरातील लोकांवर तेवढाच हक्क आहे जेवढा माझ्या दोन्ही मुलांचा आहे , असं मी समजते . म्हणजे बघा हं ,जर ती मला 'अहो आई' म्हणाली आणि मी तिला तिच्या एखाद्या गोष्टीसाठी टोकलं तर कुठेतरी नकळत एक सल मनात राहू शकते पण जर ती मला 'ए आई' म्हणत असेल आणि मी जर तिला टोकलं तर ती त्याचा  राग नाही मानणार कारण तिला ते तिच्या आईशी बोलल्यासारखे वाटेल .एक मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा  पावलोपावली तिला जर कोणाची जास्त आठवण येत असेल  तर ती तिच्या आईची असते आणि मग जर तिने आपल्याला आई म्हणू हाक मारली तर  तीच आपल्याशी असणार नातं तेवढ्याच प्रेमाचं आणि हक्काचं होऊ शकत जेवढं तीच तिच्या आई शी असतं. ह्या एका शब्दा मुळे आमचं नातं घट्ट होण्यास मदत होते असं मला वाटत  आणि सूनच नाही तर माझा जावई सुद्धा मला 'ए आई 'असच म्हणतो .कारण तोसुद्धा मला मुला सारखाच आहे ."सगळ्यांना आशाताईंच्या ह्या विचाराचे कौतुक वाटले .

खरंय ,तस बघितलं तर 'ए आई ' आणि 'अहो आई ' हे दोन्ही शब्दच आहेत ,पण जेव्हा आपण ते उच्चरतो  तेव्हा त्यांचासंदर्भ बदलतो . 'ए आई' ह्या  शब्दात सुद्धा आदर असतोच पण त्यात प्रेमळ हक्क हि असतो ,पण जेव्हा 'अहो आई' म्हणतो तेव्हा त्यात आदर असतो पण प्रेमळ हक्क हा त्या व्यक्तीवर आणि तिच्या वागणुकीवर अवलंबून होऊन जातो . 'अहो आई' असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक  गोष्टीत विचार येतो कि, आपण त्यानं दुखावतो आहे का ? त्यांना हे पटेल का ? पण 'ए आई' म्हणून जेव्हा आपण बोलतो तेव्हा कुठेतरी विश्वास असतो कि आपण जे करतोय त्यात त्यांना  आनंद मिळेल . 'ए आई' ह्या हाकेत प्रेमळ हक्क असतो  पण 'अहो आई' ह्या हाकेत एक साशंकता असते .'ए आई' आणि  'अहो आई' ह्यामध्ये फरक मान- पानाचा असतो असं मला वाटते .

आज बऱ्याच घरांमध्ये सासू सासूनेच नातं बदललंय ,ते छान आणि मैत्रीपूर्ण आहेत पण अजून हि सासूला 'अहो आईच' म्हणतात आणि ओघ ओघाने त्यात वेगळे मानपान आणि इगो तयार होतो .जो नात्यानं घट्ट करण्याऐवजी कमकुवत बनवतो. अहंकार आणि इगो हा कोणत्याही नात्यासाठी वाईटच असतो . 'अहो आई' ऐवजी जेव्हा हे नातं 'ए आई' ने सुरु होईल तेव्हा सासू सुनेचं नातं अधिकच खुलेल असं मला वाटते .

तुम्हाला काय वाटतंय ते कंमेंट करून नक्की कळवा. हा लेख आवडल्यास माझ्या नावासहित  share  करायला विसरू नका. 

ReplyForward