आर्या... भाग 10

आर्या...


       आर्या सर्वांचा डोळा चुकवून सरू मावशीचा घरी जाण्यासाठी निघाली..तरी आई ने तिला जाताना पाहिले..घरी लग्नाची तयारी चालू असताना ही कुठे गेली असेल हा विचार तिंचा मनात आला ..पण ती जेव्हा घरी येईल तेव्हा विचारे म्हणून ती शांत बसली.


संग्राम ची गाडी संदीपच्या घराचा बाहेर येऊन थांबली..तो घाईघाईत खाली उतरला.जेव्हा पासून आर्या च कॉल आला होता..तेव्हा पासून त्याला तिची काळजी वाटत होती..त्याने दारावरची बेल वाजली तसा सुमन ने दरवाजा उघडला..


या भाऊजी..हे तुमची च वाट पाहत आहे.....सुमन.

आर्या आली आहे का....संग्राम.

अजून नाही..तुम्हाला खूप घाई झाली आहे तिला भेटायची.काही गडबड नाही ना..असेल तर सांगा .आम्ही ही काही मदत करू..सुमन हसत बोलली तसे संग्राम ही हसला.

तुम्ही पण ना वहिनी..असे काही नाही. संग्राम खुर्चीवर बसत म्हणाला.. संदीप बेडरुम मधून बाहेर आला.

काय रे...अचानक मला बोलवले.सर्व ठीक आहे ना... संदीप.

आर्या ला आधी येऊ देत..तीच सांगेन काय झाले आहे ते.आणि ते जाऊदे .घरात लग्न आहे.वहिनी आणि तू केव्हा येणार आहे.आबा विचारत होते.... संग्राम.


कालच आई गावी देवदर्शन साठी गेल्या आहे. दोन दिवसात येऊ आम्ही....यांना अजून सुट्टी मिळालं नाही. सुमन बोलली तितक्यात आर्या चा बाईक चा आवाज आला.


आली वाटते... सुमन ने दरवाजा उघडला तशी आर्या घाईत अत आली.

हळू... किती घाई, कोणी कुठे पळून चालले नाही.....संग्राम.


घरी कोणाला माहीत नाही मी इथे आली आहे.आई ला समजले तर जीव घेईल माझा...
आर्या खुर्चीवर बसत बोलली.

आधी पाणी घे...मग निवांत बोल. सुमन म्हणाली तसे आर्या ने पाणी घेतले.... संग्राम एकटक तिला पाहत होतं ...माहित नाही का पण त्याला तिची खुप काळजी वाटत होती.


विलास दादा घरी आले आहेत...मामा ने घरी खूप तमाशा केला.इतकेच नाही तर विलास दादा ना हाकलून देत होता... आर्या.

विलास तुझा मामे भाऊ ना....संग्राम.

हो,  मामा ना तो अजिबात आवडत नाही.म्हणून काय अस घराबाहेर काढायचे... .नेहमी सर्वांना धमकी देत असतात की घरातून हाकलून देईल... पण त्यांना कोणाला ही घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही.. .घर आजोबांचे आहे...सर्वाचा त्यावर समान हक्क आहे.....आर्या.


बरोबर बोलली ,त्या आधी आपल्याला पहावे लागेल घर नेमके कोणाचा नावावर आहे...नाहीतर आजोबांनी प्रॉपर्टी मामा चा नावावर असेल तर आपण काही करू शकणार नाही....आणि अजून ऐक बोलायचे होते..तुम्ही लवकरात लवकर तालुक्यात येऊन आर्या च वडिलांचा अपघात ची केस फाईल करा. म्हणजे मला तपास
करता येईल... संदीप म्हणाला .तसा त्याचा फोन वाजला व तो आत मध्ये गेला.

आता बाहेर फक्त आर्या आणि संग्राम होते...आर्या अजून हि टेंशन मध्ये होती हे संग्राम ने जाणले.


तू इतका विचार करु नको... मी आहे ना.... संग्राम म्हणाला तसा तिला धीर आला.


चला दोघे .आधी जेवन करून घ्या.... सुमन.

उगाच का त्रास केला तुम्ही वाहिनी.... आर्या.

त्यात त्रास कसला.जेवणाची वेळी झालं आहे.आणि त्या दिवशी ही तुम्ही दोघांनी काही घेतले नाही...चला आता नाहीतर थंड होईल... सुमन म्हणाली तसे दोघे उठले.


संग्राम मुद्दाम तिचा शेजारी बसला होता...त्याचा हाताचा ओझरता स्पर्श तिला होताच ती शहारली व खाली मान घालून जेवण करू लागली.

व्हा वहिनी.काय चव आहे तुमचा हाताला...मल आधी माहित असते मी रोज आले असते जेवायला... आर्या.

अग मग येत जा.हे घर तुझे ही आहे....असे ही मला नणंद नाही .तुझा मूळे ती ही हौस पूर्ण करता येईल.....सुमन.


मी काय बोलतोय वहिनी... फक्त खायला घालण्यापेक्षा. हिला की काही शिकवा...नाहीतर आम्हाला उपाशी राहावे लागेल... संग्राम चा बोलण्यावर आर्या ने चमकून त्याच्या कडे पाहिले... कसे आहेत हे कोणासमोर कहीही बोलतात....यांना उपाशी राहावे वाटते म्हणजे नक्की काय??
पण किती बिनधास्त आहेत, घाबरत नाही कोणाला.. एक नंबर आहेत... आज तर या टी शर्ट मध्ये एकदम डॅशिंग दिसताय.. अर्या विचार करत असताना समर ने तिचा हळूच हात पकडला... अशी नको बघू माझ्याकडे वहिनी तुला बघून हसताय किती वेळ पासून... आर्या ला त्याच्या स्पर्शाने अंगावर गोड शिरशिरी आली... गाल आरक्त झाले...
समर ला तिला बघून हसू येत होते...

संध्याकाळ झाली होती.आर्या ला या घरात खूप आपलेपणा वाटत होतं....दोघे ही जाण्यासाठी निघाले आर्या तिचा गाडीवर तर संग्राम फोर व्हीलर मध्ये बसून निघाला...आता आर्या बऱ्यापैकी सावरली होती... ती तिचाच विचारत गाडी चालवत होती...की समोरून ऐक फोर व्हीलर येऊन तिला आडवी झाली तशी ती चिडली तिने बाईक ला ब्रेक लावला...ही जागा थोडी सूनसन होती...इथे माणसांची वर्दळ नव्हती.


आर्या रागात गाडीवरून उतरली व हाताचा स्लीवज वर करत करत गाडीचा दिशेने आली.


काय रे दिसत नाही का तुला...मारायची हौस आली असेल तर दुसरीकडे जा.. तुझमुळे मला काही झाले असते तर.उतर खाली... आर्या ची बडबड ऐक सारखी चालूच होती की गाडीतुन संग्राम बाहेर उतरला.


तुम्ही ... मला माहित नव्हते... आर्या खाली मान घालून उभी होती.


ओ झाशीची राणी.. थोड तरी दमाने घ्या...घाबरलो की मी. संग्राम गालात हसत होता...तशी आर्या संकोचली.

तुम्ही इथे काय करत आहात. हा रस्ता तुमचा घराकडे जात नाही....आर्या.


तुलाच भेटायला आलो होतो.असे बोलून त्याने गाडीतून ऐक पिशवी बाहेर काढली व आर्या चा हातात दिली..
हे घे... संग्राम.



काय आहे यात...आर्या ने बॅग खोलून पाहिले... आतमध्ये तीच साडी होती जी दुकानामध्ये खरेदी करताना तिला आवडली होती.


ही साडी... आर्या अवाक झाली होती.


तुझ्यासाठी आहे, मला माहित आहे.. तू हळदी ला जसे कपडे घातले तसेच लग्नात ही घालशील त्या साठी घेऊन आलो... ही साडी तू लग्नात नेसली की मला बर वाटेल... संग्राम चा बोलण्यावर ती लाजली..पण इतकी महाग साडी त्याचा कडून घेणे तिला बर दिसत नव्हते.


ही खूप महाग आहे. खरच नको मला....आर्या.


मी ही साडी फक्त तुझा साठी घेतली आहे...आणि तू ही नेसली की मला बर वाटेल.आता तू ठरव काय करायचे ते...मला माहित आहे तू लग्नासाठी खरेदी केली नाही...संग्राम च बोलण्यावर तिला प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हते...आज तिचा बाबा नंतर पहिल्यांदा तिची कोणीतरी काळजी करत होते.


चल निघतो मी ...उशीर होतोय मला.घरी खूप काम आहेत... असे बोलून संग्राम गाडीत बसला.. .आर्या ने ही बाईक ला किक मारली व घरी जाण्यासाठी निघाली... आज खूप दिवसांनी तिला आनंद झाला होता.माहित नाही का पण आज तिला उडावेसे वाटत होते...हसवेसे वाटत होते...तिचे मन आज प्रफुल्लित झाले होते.



आर्या तिचा रूम मध्ये आली . व साडी कपाटं मध्ये व्यवस्थीत ठेवली.... त्यात आई आत आली.


आर्या कुठे गेली होतीस...आई ने आल्या आल्या तिला सवाल केला.


कुठे नाही मातोश्री...काम होत. तिने कापड पटकन लाऊन घेतले.

हे पहा आर्या...आपण इथे लोकांचं घरी आहोत हे विसरू नको... तू अस काहीही करणार नाही ज्याने माझी मान चार लोकात खाली जाईल... आई.


आज पर्यंत मी कधी वाईट वगले आहे का आई... तू नको टेंशन घेऊ....आर्या.


थोबाड वर करून बोलायला लाज कशी वाटत नाही तुला.... काल दादा चा जो अपमान केला तो काय होता. आजपर्यंत कोणी त्याला नजर वर करून बोलले नाही आणि तू सर्वांसमोर त्याला प्रतिउत्तर दिले....आई.



खर तेच बोलले मी. मामा श्री ना आतापर्यंत त्यांची चूक कोणी दाखवली नाही....म्हणून सर्वावर दादागिरी करत असतात... आर्या बोलली तस आई ल राग आला .


आर्या.आई रागाने तिच्यावर हात उचलणार ? आई आजी अत आली.


उर्मिला,...,आई आजी ओरडली.

खबरदार पुन्हा तिच्यावर हात उचलला तर. आई आजी तिला जवळ घेत बोलली.



तू पाहिलं ना आई...आधी चूक करायची आणि नंतर थोबाड वर करून बोलायचे... आई.

ती चुकीचे काहीच बोलली व वागली नाही...उलट तुला अभिमान पाहिजे की अशा निडर मुलीने तुझा पोटिने जन्म घेतला आहे... आई आजी म्हणाली...तसे आई रागात बाहेर निघून गेली.


Thanku आई आजी.या घरात तुलाच माझी कदर आहे ग....मेरी प्यारी ग्रंडमा. आर्या तिला म्हस्का मारत म्हणाली.

पुरे आता... खाली खूप काम आहे लवकर खाली ये...आई आजी बोलली व बाहेर निघून गेली.


आज आर्या च मुड मस्त होता... कारण संग्राम तिला आज भेटला होता... तिला त्याची आठवण झाली तसे तिने मोबाईल घेतला व मेसेज टाईप केला.


हॅलो. पोहोचले क तुम्ही.... . आर्या.

हो .आताच पोहोचलो.... मांडव टाकायचे काम चालू आहे.तू पोहोचली.... संग्राम.

हो केव्हाच, आणि आईचा प्रसाद ही मिळाला आल्या आल्या.... आर्या म्हणाली तसा तो हसला.

नक्कीच तू काहीतरी करामत केली असेल...असे ही तुला कुरापती करायची सवई आहे...संग्राम अजून हि हसत होता.

मी कुरापती करत नाही. लोक माझा वाटेला जातात मी फक्त त्यांना बाजूला सारते आणि निघून जाते
आर्या रागात बोलली.

सर्वांना बाजूला कर फक्त मला बाजूला सरू नको म्हणजे झाले.... संग्राम म्हणाला तसा तीन फोन ठेऊन दिला . व स्वतःशी हसली.

संग्राम ही तिथे उभा राहून ऐकताच हसत होता. त्यातच महेश ची नजर त्यचावर गेली.

मी आल्या पासून पाहतोय..?तुला एकट हसायची बिमारी आहे का...महेश त्याचा जवळ येत म्हणाला.

कुठे काय.मी ते काम करत होतो...अरे ते लाईट तिकडे क लावली आहे...संग्राम ने विषय बदलत तेथून पळ काढला....तसा महेश हसायला लागला.

नक्की पाणी कुठेतरी मुरत आहे.आणि हे मलच शोधावे लागेल आता... तो स्वतःशी म्हणाला.

रात्री घरात मेहंदी ची तयारी सुरू होती... लग्न चा निमित्ताने का होईना घरात आनंद होता...आर्या स्वतःचा हाताने विश्वास चा हातावर मेहंदी काढत होती.

विलास ही घरात आता बऱ्यपैकी रुळला होता
आर्या ने त्याला आधीच सांगितले होते की तो आता हे घर सोडून कुठेही जाणार नाही....कारण मामी ची अवस्था तिला पाहवत नव्हती...या सर्वामध्ये ती मात्र होरपळून निघत होती. पण.... आज तिचा ही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

मामा वरती टेरेसवर दारू पीत बसला होते... मामा ना सवई होती रात्र उशिरा दारू पीत बसायची ...त्यामुळे टेरेस वर घरातील कोणालाही यायला बंदी होती.
रंगा त्याचा समोर उभा होता.

तू खर बोलतोय... मामा रागात बोलला.

पक्की खबर आहे...तो सरू च मुलगा पोलिस आहे
आणि आपली आर्या चे तिथे जने येणे वाढले आहे...माझा माणसाने स्वतः डोळ्याने पाहिले आहे....रंगा.

ही मुलगी नक्की काय करणार आहे... माझा विरुद्ध नक्कीच काहीतरी षडयंत्र सुरू असणार आहे.रंगा तिच्यावर बारीक लक्ष ठेव... ऐकदा हे लग्न पार पडले की हीचा काटा कधुयात..तो पर्यंत हीचा बारीक हालचाली वर लक्ष ठेव... मामा रागात म्हणाला.

खुप झाले आता हीच काहीतरी करावं लागेल नाहीतर ही मुलगी मला रत्यावर बसवायला कमी नाही करणार.. मामा बोलला..


(बघू आता पुढे काय होते ते... आर्या आणि संग्राम ची केमिस्ट्री कशी आहे हे नक्की कळवा...
भाग टाकायला या काही कारणास्तव जरा जास्तच वेळ झाला समजून घ्या... कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते...)

🎭 Series Post

View all