आर्या.... भाग 3

कहाणी आर्याची..



???


" आर्या ने बाईक ला किक मारली व बुलेट स्स्टार्ट  केली .शालु तिचा मागे बसली होती."


"काय ग , कोण होता तो.ज्याचा डोळयात तु हरवली होती... "शालु.


"ए गप्प ये , मि नाही कोणाचा डोळयात हरवले ....आणि या गावात मि राहते की तु , तुलाच माहीत पाहीजे तो कोण आहे.... " आर्या.


"नाही ग ,याआधी त्याला कधी पाहीला नाही . आपल्या गावचा पाहुणा असेल. पण काय भारी दिसतो ना.... त्याची बाॅडी पाहीली....मला ना साऊथ चा हिरो वाटत होता तो...." शालु.


"हो का शालु राणी ,थांब घरी गेले की मामाश्री ना सांगते....  तुमची लाडली मुलांचा बाॅडी पाहत असते.... मग बघ तुझी कशी पादत्रानाने आरती करतात ते...."आर्या हसत म्हणाली .


"ये बाई , का माझा मागे पडली. आबा ना समजले तर मि इतिहास जमा होईल.... ते सोड लवकर घरी चल....  आबा तूझी वाट पाहत आहे..... "शालु.


"मामाश्री आणि माझी वाट पाहत आहे . कुछ तो गडबड है दया .कूछ तो घडबड है...." आर्या स्टाईल मारत म्हणाली तशी शालू खळखळून हसली.


"वाड्याचा बाहेर आर्या ने बुलेट पार्क केली व स्टाईल ने आत गेली.... हाॅल मध्ये समदे बसले होते. मामा समोरचा सोफ्यावर बसत आर्या कडे रागात पाहत होते."


"आली हुंदळुन , चल लवकर .दादा केव्हाची वाट पाहत आहे.... "आई.


"प्रणाम मामाश्री,  बोला .आज गरीबाची कशी काय आठवण केली....." आर्या.


" आर्या त्याचा समोर खुर्चीवर स्टाईल ने बसली.... जे कोणाला आवडले नाही.  कारण मामा समोर घरातील लहान कोणालाच त्याचा सोबत बसायची परवानगी नव्हती.


"तुझा सोबत महत्त्वाचे बोलायचे होते. तुला माहीत आहे की तुझा आई ने जे दिवे लावले त्यानंतर आम्ही तिचासोबत संबंध तोडले.....पण आता आम्ही ठरवले आहे, तूझी आणि तूझा आई ची सर्व जबाबदारी आम्ही घेणार आहोत..... इतकेच नाही तर तुझं शिक्षण लग्न है आमचावर लादले..." मामा.


"अरे वा , चालतय की.... उशिरा का होईना पण तुम्हाला समज आली.... .चांगली गोष्ट आह, पण मि असे ऐकले आहे . की फायदा विना तुम्ही काहीच करत नाही.
आर्या  जशी बोलली.... मामा ची सटकली. हीला हलक्यात  घेऊन चालणार नाही हे त्यांनी जाणले.


"हे घे.यावर सह्या कर.... मामा चा नोकर रंगा ने पेपर तिचासमोर ठेवले."


"अस कस मामाश्री, आधी पेपर वाचणार मगच सही करणार ना...." आर्या.


"अशी कोणती प्रोपर्टी तुझा बाप तुझासाठी ठेवुन गेला आहे.... जी  आम्ही घेणार आहोत, उर्मिला  सांग तूझा मुलीला, गप्प गुमान यावर सह्या करायचा नाहीतर या घरात तुम्हाला थारा नाही..."मामा.


"मामा रागाने बोलला व रंगा ला इशारा केला... तसा तो पेपर घेऊन निघुन गेला.


"अग ये कारटे, मोठया सोबत  कस बोलायचे हे शिकवायला लागेल तुला आता.....दादा जे बोलतील ते  करायचे समजल. जास्त अक्कल चालवायची नाही...." आई.


"काहीही झाले तरी मि पेपर वाचल्या शिवाय मी सह्या करणार नाही. आर्या ठामपणे बोलली...तसे आई ने तिचा एक कानाखाली दिली.


"उर्मिला, काय करते ,आता काय लहान आहे का ति तिचावर हात उचलायला...". आईआजी ने तिला जवळ घेतलं.


"मग काय हीची आरती करू, आधीच माझामुळे दादा ची मान खाली गेली....तरी मोठ्या मनाने तो आमची जबाबदारी घेत आहे....हिला काय कळणार एका बाईला किती अवघड असत स्वता चा आणि मुलीचा संभाळ करायचा.... हिचा बाप तर गेला पण हिला माझा डोक्यावर मिर्या वाटायला सोडली, सर्व त्याचा च लाड आहे..... लक्षात ठेव आर्या, दादा जस म्हणन तेच करायचे नाही तर तूझी सालट काढल्याशिवाय राहणार नाही मी..." आई रागात बोलुन निघुन गेली.


"मामी आणि शालु ला वाईट वाटत होत."


"शांत हो बाळ , समद ठीक होईल... तुझा बाप आता असता तर तिची अशी अवस्था झाली नसती ग.... तिचा पण तुझा वर जीव आहे, हे समद ति तुझापाई करत आहे...." आईआजी.


"मला काहीवेळा साठी ऐकट सोडा, मला आता कोणासोबत बोलायचे नाही. अस  बोलुन आर्या तिचा रूममध्ये गेली."


"तिला तिचा पप्पा ची खुप आठवण येत होती.... लहानपणी किती भित्री होती ती. पण तिचे पपा नेहमी तिला धीर द्यायचे... नेहमी सत्याचा बाजूने लढायचे हे तिला शिकवले....म्हणून कुठे अन्याय होय असेल ते आर्या ला सहन होत नसे.
खुप वेळ ति विचार करत होती... .आज पप्पा असते , तर कोणाची बिशाद  नव्हती, त्याचा लाडक्या लेकीला बोलायची.

"ऐ आरू,  हे काय आमची वाघीन रडते..."विश्वास, मामाचा मुलगा आत येत म्हणाला .


"दादा तु किती वाट पाहीली रे, मि आले तर तु गायब झाला.....\" आर्या त्याला मिठी मारत म्हणाली .


"तालुक्यात काम होत त्यासाठी गेलो होतो, मला शालु ने सर्व सांगितले.... आबा चा वतीने मि तुझी   माफी मागतो....".विश्वास.


"ये दादा .आता गप्प हा... मामाश्री चा स्वभाव कसा आहे हे सर्वांना माहीत आहे....आणि मला वाईट नाही वाटले, ही आर्या इतक्यात हार माणनारी नाही...."आर्या.


"हो का ,मग इथ अशी एकटी का बसली होती... मला वाटले कोपर्यात बसून रडत असेल....". तो हसत म्हणाला.


"आर्या रडत नाही ,दुसर्याना रडवते. मामाश्री ला अजुन माहित नाही. मि काय चीज आहे....  यावेळी मि त्याना दाखवून देईल हरवेळी त्यांचा मनासारखे काहीही होणार नाही...." आर्या.


" ओ माझी फुलनदेवी, जे कराल ते संभाळून करा... .आणि आम्हाला मध्ये घेऊ नका, नाहीतर तुमचा सोबत आमची ही वरात निघेल....."विश्वास हसत म्हणाला.


"अरे हो खरच की.... तुझी वरात अशी पण निघणार आहे.... ये वहीणी चा फोटो पाहु ना...कशी दिसते रे ती....तु भेटला तिला.....\" आर्या.


"तुमचा मामा चा राज्यात हे कस शक्य आहे....फक्त एकदा पाहीले तिला.... त्यानंतर नाही.आपल्या शेजारचा गावात राहते ति....." विश्वास.


"काळजी नसावी बंधु , आता आम्ही आलो आहोत ना.... लवकरच तुमची आणि वहिनी ची भेट घडवून देऊ....हे आर्या चे वचन आहे.

"ति स्टाईल ने म्हणाली तसे दोघे खळखळून हसले."

क्रमशः

🎭 Series Post

View all