आर्या... भाग 2

कहाणी आर्याच्या संघर्षाची


        
        


               " दिक्षीत यांचा वाडयासमोर गाडी  येऊन थांबली.. आई जशी आत आली.. आई आज्जी ने तिला मिठी मारली..किती दिवसांनी  पोर घरी आली होती..दोघींचे डोळे पाणावले होते.
तु एकटी कशी.माझी नात कुठे आहे . आई आज्जी जशी म्हणाली.. बाहेर बुलेट चा आवाज आला.तसे सर्वांनी बाहेर पाहीले."


        "आर्या स्टाईल  ने खाली उतरली. व हाताचा स्लीव मूडपल्या.सर्व  आ वासून तिचाकडे पाहत होते.गावात मुलीचे अस वागणे कोणाचा पचनी पडले  नाही."


  "हॅलो आई आज्जी"...  आर्या  आत येऊन आजीला मिठी मारली."


      "अग बाई काय है , तुझे कपडे कूणीकडे आहे...हे असले पोरावाणी कपडे का घातले...." आई आज्जी म्हणाली तसा आवाज घुमला.


      "आई  ला वळण असत, तेव्हा मुलीला लावले असते ना... एक काय कमी होती जी आमचा डोक्यावर मिर्या वाटायला दुसरी पोटी आणली.. "माधवराव आर्या चा मामा रागाने म्हणाला.


    "तुम्ही शांत रवा जी , ते आताच.... "मामी पूढे काही म्हणणार मामाने तिचाकडे रागाने पाहीले.


       "कितीवेळा सांगितले आम्ही बोलत असताना मध्ये बोलायच नाही....  काल चा मार विसरला वाटते, खूप झाला भरत मिलाप. आपापल्या कामाला लागा आता..." माधव रागाने बोलला व गेला. 


      "या वन्स ,प्रवासाने थकला असाल.आधी आराम करा..". मामी म्हणाली तसे सर्व आत गेले.


       "आर्या ने जितकेे ऐकल तितके हे सोपे नाही हे तिने जाणले...."


       "आर्या रूम मध्ये आली व बेड वर आडवी पडली."

          "काय भारी बुलेट चालवते ग तु..आम्हाला इथ सायकल चालवायची चोरी...." मामा ची धाकटी मुलगी शालू आत येत म्हणाली.



         "या शालु राणी....  तुझा बाप  वय झालं तरी सुधरला नाही. आता मलाच काही तरी करावं लागेल...". आर्या


      "ऐ हळु बोल.इथ भिंतीला पण कान आहे. आम्हीच इथे कसे राहतो आम्हाला माहीत....आई ची अवस्था तर खुप वाईट ग....अजुन आबा तिला मारतात...". शालु.


      "तु काळजी करू नको.आता मी आले ना.सर्व ठीक करते.ते सोड, विश्वास दादा कूठे.दिसत नाही..." आर्या.

     "तो तालुकयाला गेला आहे. एक आनंदाची बातमी आहे.विश्वास दादु च लग्न जमलं आहे....".  शालु.


        "अरे व्हा,  खूप मज्जा करू मग. चल मि आता आराम करते .खुप थकले मि....". आर्या म्हणाली व तिथेच आडवी पडली.


         "सकाळी आर्या गावातून फेरफटका मारत होती.  सर्वी कडे हिरवळ ,स्वच्छ वातावरण , शहरात हे सर्व कूठे पाहायला मिळते. आज  तिने ब्लॅक जीन्स  ,त्यावर  लाईनिग वाला  ब्लू  शर्ट घातला होता. सर्व लोक तिलाच पाहत होते. गावात जीन्स  घालणारी ति पहीली मूलगी असेल. अजून  तरी गावाचा विकास झाला नाही.  मुलींना  फक्त दहावी  शिकवले जात होते. "

         "ते बघ पाखरू , कूणीकडे  चालले आहे.  गावातील काही टवाळखोर मुले आर्या कडे पाहीत  म्हणाली."

        "हे गावच  नाही  ,शहरातील पाखरू  आहे . बघ कस पडपडतया  दुसरा मुलगा म्हणाला  तस आर्या ची सटकली. "

    "काय रे लय मस्ती आली का , लाईकीत रहायचे  समजल...." आर्या.


         "नाही राहीलो तर ,  बाई माणसाने बाई सारखे वागायचे असते. अस पुरूषावानी नाही....  हिचे कपडे पहा. तो म्हणाला  तसे सर्व  हसले."

         "पुरूष  होण्याचा माज आहे ना तुम्हाला .... आता पहा कसा उतरवते.... आर्या म्हणाली  व सर्वाना बेदम मारायला सुरूवात केली.... आधीच कराटे  चॅपीयन असल्या मुळे  तिला याचे नवल नव्हत...  पण  गावकरी डोळे  फाडून पाहत होते. एक मुलगी पाच मुलांना भारी पडत होती.  


         "लोकांसमोर  आपल्याला  एक मुलगी मारते .हे पाहून एका मुलाने दांडून तिचावर उगारले.... तसे एक हात आला व त्याने  ते दांडून पकडले. तसे आर्या ने पाहीले आणि पाहतच राहीले....
          सहा फुट हाईट , सावळा रंग, पाणेरी डोळे, जिम ने कमावलेले शरीर ,भारदस्त छाती व हलकी  दाढी .साधा शर्ट व पॅन्ट मध्ये तो स्मार्ट दिसत होता...
त्याने  त्या मुलाचा हात पकडला व जोरात पिरगाळुन त्याला लाथ मारली... तसे सर्व मुल पळाली.



         "आर्या अजुन ही त्याला  भ्रमिष्टा सारखी पाहत होती. ति पूढे जाणार तिचा तोल गेला ति पडणार त्याने तिचा कमरेत हात घालुन तिला स्वताजवळ  ओढले तसे ति त्याचा  डोळ्यात हरवली..."
कितीतरी वेळ  दोघे  नजरेला  नजर देऊन ऊभे होते.

आर्या,,,,,

शालु  चा आवाजाने ति भानावर आली व त्याचा  मिठीतून सुटली.

काय झाले  तु ठीक आहे ना...." शालु.

         बरोबर बोलला तो , बाई माणसाने  बाई सारखे रहावं. असे कपडे घातल्याने अंगात हत्तीच बळ येत नसत..."तो म्हणाला  व निघुन गेला.

       "आर्या फक्त त्याला जाताना पाहत होती...त्याला पाहुन तिची वाचा गेली होती...."


क्रमशः

🎭 Series Post

View all