आयुष्याच्या या वळणावर - भाग 4

बबलू अगदी क्लिअर बोलणार होता. त्याने डायरेक्टली विषय तिच्या समोर ठेवला आणि पॉसिटीव्ह पॉईंट्स ?

आयुष्याच्या या वळणावर - भाग 4
दोन - तीन दिवसातच मीना आणि महेश सुर्वणा आणि सुरेश भाऊ बरोबर बोलून घेतात.  मुलाचा फोटो आणि बायोडाटा पाठवून देतात.  
त्याच रात्री सगळ्यची जेवन उरकून झाल्यावर मधूचे बाबा आजोबाशी बोलून घेतात.  फोटो आणि माहिती बगुन तर या तिघांनाही मुलगा पसंत पडतो.  बाकी मंडळी तर घरचीच होती.
मीनाच्या सासरी सुद्धा रिलेशन  तसें खूप चांगले होते आणि माणसं सुद्धा चांगली..... 
बाबा आजोबांशी बोलून घेतात.. 

मधुचे बाबा : आबा,  आपण जायचं का पुढे.... 

आजोबा : हे बघ सुरेश,  आपण सगळे एकदा मधूशी बोलू या विषयांवर,  तिला सगळी माहिती देऊ.... तिची इच्छा असेल तरच आपण पुढे जाण्यात पॉईंट आहे.. 

मधुची आई :  हो,  मी पण एकदा बबलूच्या कानावर घालते.  सगळ्यचा विचार घेऊन मगच पुढे जाऊयात 

मधुची आई बबलूला फोन करुन सगळी माहिती देते. बबलू नोकरी निम्मित मुंबईला होता आणि प्रकाश काका तिकडेच स्थायिक होते. बबलू त्या मुलाला 1-2 वेळा भेटला होता. बबलूच्या मते मुलगा खूप छान,  विचारी आणि अगदी मधूला शोभेल असाच होता. बबलू कडून एवढा चांगला परिचय मिळाल्याने आई सगळयांना आनंदाने सांगते.

मधुच्या आईने मीनाशी सुद्धा एकदा बोलून घेतले. मीनाने तर मुलाबद्दल खूप कौतुक केले आणि तिच म्हण सुद्धा असंच होत कि मधू आणि आशु एकमेकांना साजेसे आहात.
सगळ्यांना विचारत घेऊन मधूकडे विषय काढायाचा ठरल.... पण नंतरही तोच प्रश्न मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? 

सगळ्यनी पहिले बोट आजोबांकडे केलं.. कारण त्या दोघांचा खूप जमायचं. 
पण आजोबानी ही जबाबदारी बबलू कडे दिली.
पुढच्या दोनच दिवसात बबलू मधुशी या विषयावर बोलला.

बबलू अगदी क्लिअर बोलणार होता. त्याने डायरेक्टली विषय तिच्या समोर ठेवला आणि पॉसिटीव्ह पॉईंट्स सुद्धा सांगाय ला विसरला नाही. कारण त्याच्या म्हन्यानुसार ते योग्य स्थळ होत तिच्यासाठी.... 
त्याने आपण आता ठरवून ठेवू,  1 वर्षानी लग्न,  अशीही परस्थिती तिच्या समोर ठेवली. त्याचा बिजनेसचा पसारा तसा खूप मोठा होता,  अर्थात तू तिथे काम करू शकतेस किंवा जर जॉबच करणार असशील तर ते लोक थोडीच नाही बोलणार आहेत तुला.... 
फक्त आता आपण  घेऊ,  असे अनेक विचार तिच्या डोकयात टाकले.

हे सगळे विचार तिच्या डोक्यात गोंधळ करत होते. तिने फक्त ठीक आहे.  मी तुला मेसेज वर कळवते असच रिप्लाय दिला. असाही आता तिच्याकडे पर्याय नव्हता.तिने ती भेटायला तयार आहे असा बबलूकडे  निरोप दिला. 

बबलूलाही  तिच्या या निर्णयाने आनंद झाला.
त्याने काही मिनिटाच्या आतच हा मेसेज घरी कळवला.
घरी सगळे खुश झाले. आईने मीनामावशीला फोन करून संगितले सगळे एकदम खुश झाली.
मधुची मात्र घालमेल सुरु झाली होती. 
कारण हा तिच्या आयुष्यतील पहिला कांदेपोहेचा कार्यक्रम होता. 
बघुयात आता आशुतोष कडे काय चाललंय ते.

🎭 Series Post

View all