आयुष्याच्या या वळणावर - भाग 39
खरेदीच्या दुसऱ्या दिवशी मधू तिच्या घरी गेली.
लग्नाची तयारी धूम धाम मध्ये चालली होती. येत्या चार-पाच दिवसातच पाहुणेमंडळी येणार होते. तोपर्यंत मधूला केळवण यासाठी आमंत्रणे आली होती. सगळं अगदी छान आणि ठरवल्याप्रमाणे चाललं होतं.
लग्न सुद्धा अगदी थोडक्यात माणसात करायची इच्छा पूर्ण होणार होते. त्यामुळे जास्त तयारी अशी करावी लागणार नव्हती.
तशी मधु ची सुट्टी सुरू झाली होती. एव्हाना सकाळचे नऊ वाजले होते. सगळ्यांचा नाश्ता चालला होता. मधूची आई मधूच्या रूम मध्ये गेली.
मधु ची आई : मधु अगं उठ बघण्यात किती वाजलेले आहेत??... सूर्याची किरणे डोक्यावरती आहे आली आहेत आज तरी उठशील का??
मधू : हो आई पाच मिनिटात उठते... आणि असंही आम्ही सगळे लोक आज अकरा वाजता भेटणार आहोत..
मधु ची आई : मधू मॅडम तोंडावरच अंथरूण खाली घ्या. नऊ वाजले आहेत..
मधु : ( पटकन तोंडावरचा अंथरून खाली घेऊन घड्याळाकडे बघत )
काय गं आई आता तर साडेआठ वाजले....
मधु ची आई : साडे आठ म्हणजे तू बेडवरून खाली उतरेपर्यंत नऊ वाजतील...
मधु : आता कुठे माझी सुट्टी सुरू झाली आहे झोपू दे ना...
मधु ची आई : तुला बाहेर जायचं आहे म्हणून मी उठवलं.... नाष्टा कर.... भूक लागली असेल..
मधू : हो आता थोडे दिवस तुझ्या हातच्या खायला भेटणार...
मधु ची आई : ( रूम मधील कपड्यांची आवराआवर करत होती. अचानक तिच्या अशा बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी आले )
हो.... ( डोळ्यातील अश्रूचा आवंढा गिळत तिने उत्तर दिले )
मधू : ( आईचा बदललेला स्वर तिला जाणवला )
काय झालं आहे आत्ताच सेंटी झालीस.... अजून खूप दिवस आहेत लग्नाला....
मधु मागून जाऊन आईला मिठी मारते...
मधु ची आई : अगं खूप म्हणत म्हणत केव्हा दिवस जातील समजणार नाही..... ( डोळ्यातील अश्रुंची धार पुसत हळूच मधुची आई म्हणाली )
मधु : ह्म्म्म ( मधुचे डोळेसुध्दा ओले झाले होते )
मधुची आई : बाळा तू कशाला रडतेस माझं हे असंच चालायचं.... चला वर नाश्ता करायला चल...
मधू : मधु सुद्धा तिच्या डोळ्यातील पाणी आवरतं घेते.... आणि आंघोळीला निघून जाते...
मधु साठी सगळेजणच नाष्टा करायला थांबले होते. आजोबा, मधुचे बाबा... सगळेजण टेबलवर येऊन बसतात.
मधुची आई गरमागरम पोह्यांची प्लेट घेऊन येते...
मधु ची आई : मधू अगं झालं का पोहे थंड होत आहे...
मधु : हो आई आले... ( डोक्यावरचे ओले केस पुसत पुसत ती टेबल वर आली)
मधू : किती दिवसानंतर असं सगळ्यांसोबत बसण्याचा योग आला आहे....
मस्त वाटत आहे मी सुट्टी पुरेपूर एन्जॉय करत आहे...
मधु ची आई : साडे नऊ वाजून गेले आहे तुला जायचं आहे... पुढे बघून खाऊन घे...
आज मधु तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना भेटायला जाणार होती....
बघूया तिची सगळ्यांची भेट होते की नाही....