आयुष्याच्या या वळणावर - भाग 37
मागील भागात आपण बघितले कि मधू आणि आशुतोष ची दागिने खरेदी झाली होती.
आज आता सगळेजण कपड्यान्ची खरेदी करायला गेले होते. आज रविवार होता सगळेजण खरेदीसाठी जाणार होते. मधुने सोनेरी जरीचा काठ असलेला लाल रंगचा भरजरी शालू पसंत केला होता.
आशुतोष ने त्याला मॅचिंग अशी शेरवानी घेतली.
सगळ्यची खरेदी वगैरे व्हयला बराच वेळ गेला.
सायंकाळचे 5 वाजले होते. रात्रीचे जेवण करुन मधू आणि तिचे आई बाबा निघणार होते. सगळेच दमले होते. त्यामुळे सगळ्यनी मिळून बाहेर च जेवण करायचे ठरवले.
मधुचे आईबाबा डायरेक्ट घरी जाणार असल्याने त्याची बस वेगळी आणि उशिराची होती. मधू तिथून पुण्याला जाणार होती. तिची बस लवकरची होती.
सगळ्यनी मिळून जेवण केले. आशुतोष मधूला सोडायला जाणार असे ठरले.
आशुतोष आणि मधू बाईक वरून बाहेर पडले. मधुने जाऊन तिची बॅग घेऊन आली. बस स्टॉप तिच्या रूम पासून 15 मिनिटच्या अंतरावर होती.
ते दोघेही निघाले. बस यायला अजून 5 मिनिट वेळ होता. तोच तिला फोन आला. बस अर्धा तास उशिरा येणार होती.
मधुच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिला अजून अर्धा तास आशुतोष सोबत मिळणार होता.
मधू आणि आशुतोष बोलत असतात.
मधू : माझी बस अजून अर्धा तास उशिरा येणार आहे. तू थांबशील ना???
आशुतोष : अग वेडी आहेस का? तुला एकटीला सोडून मी का जाईन. मेरा बस चले तो मी तेरे साथ पुना में भी आ जाता....
मधू : नको पुणे मधें नको... आता इथेच ठीक आहे. तू नेक्स्ट वीक मधें ये.. मला भेटायला.
आशुतोष : बर ठीक आहे.... चल..इथे जवळच एक कॉफी शॉप आहे. आपण तिथे जाऊयात. तुलाही थोड बर वाटेल.
मधू : हो ठीक आहे जाऊयात....चल
मधू आणि आशुतोष कॉफी शॉप मधें जातात.
आशुतोष : म काय घेणार मॅडम...
मधू : मला कॉफी चालेल....
आशुतोष दोन कॉफी ची ऑर्डर देतो.
आशुतोष : मधू नाराज दिसतेस... खरेदी झाली ना तुझ्या मनासारखी.. कि आणखी काही...
मधू : खरेदी तर मना सारखी अगदी छान झाली... तुला आवडला ना सगळ??
आशुतोष : हो गं.... पण तुझं काय... तू का नाराज आहेस...
मधू : दोनच दिवस भेटले आपल्यला..खरेदी करायच्या गडबडीत नीट वेळ पण भेटला नाही बोलायला... आणि आता पण लगेच जावं लागणार...
आशुतोष : बर मग थांबतेस का.... उद्या सकाळी मी सोडायला येतो तुला....
मधू : काही पण नको.... माझी पण खूप इच्छा आहे पण तर शक्य नाही... मी जातेय म्हणूनच सांगितलंय सगळयांना...
आशुतोष : अग तोच प्रश्न असेल तर मग मी सांगतो घरी सगळयांना.... बोल थांबतेस का.... तुझं मत सांग मला ... मी तयार करेन सगळयांना....
मधू : अरे असं काही नाही .. उद्या ऑफिस ला सुद्धा लवकर जायचं आहे... आणि उद्या इम्पॉर्टन्ट मिटिंग सुद्धा आहेत.. त्यामुळे लवकर जाणे गरजेचं आहे....
आशुतोष : बर ठीक... तुझं पण बरोबर आहे....
तोच मधूला बस मधून कॉल येतो. मधुची बस 5 मिनिट मधें स्टॉप वर येणार होती.
मधू आणि आशुतोष बस स्टॉप कडे जातात. मधू आशुतोष नाईलाजाणे बाय बोलते...
बघुयात आता यांची भेट कधी आणि कशी होतेय....