Login

आयुष्याच्या या वळणावर - भाग 32

आई : विचार करून अगदी रहावलं नाही म्हणून मी तिला फोन केला होता...

आयुष्याच्या या वळणावर - भाग 32

मागील भागात आपण बघितले कि लग्न अगदी सध्या पद्धतीने करण्याच्या निर्णयावरून मधुची आई नाराज होती...

आज रात्री मधुचे बाबा तिच्या आईशी बोलणार होते. मधुच्या घाटी सगळयांची पंगत होते  मधुची आई किच न आवरत होती...

बाबा : स्मिता... चल जरा बाहेरून फिरून येऊयात...

स्मिता: ठीक आहे मी आवरते 5 मिनिट मधेंच म जाऊयात आपण...

असं म्हणून आई पटकन आवराआवर करते आणि आई बाबा बाहेर पडतात...

बाबा : दोन दिवसांपासून  पाहतोय...  कसला विचार करतेस....

आई : मधु च्या लग्नाचा.... अगदी लहान असल्यापासून किती स्वप्न रंगवली होती... आणि आता हे म्हणत आहेत की अगदी छोट्या पद्धतीने लग्न करायचं... असं कसे चालेल...

बाबा : अगं तुझ्या स्वप्नांपेक्षा त्यामागचा विचार बघ ना....

आई : हो माहितीये मला ते सगळं ठीक आहे पण... मनातून कुठेतरी वाटत ना... एकदाच लग्न होणार आहे माझ्या मुलीच....

बाबा : हे बघ स्मिता.... जे करणार आहोत त्यात काही गैर नाही.... होणार असेल तर ते कोणाच  तरी भलं होईल.... आणि साखरपुडा ही अगदी छान आपल्या मनाप्रमाणे पार पडला.... तसाच आपण लग्नाचाही करू..... अगदी जवळच्या माणसांना तर बोलवणार आहोत असा पण.....

नवीन पिढी आहे... त्यांचे विचार वेगळे... आणि  मुख्य म्हणजे कोणाचं वाईट नाही होणार आहे...  होईल तर चांगलं होईल... हेतू डोळ्यासमोर ठेवून

विचार कर...

आई : हो ठीक आहे... मी अगदीच नाहीच असं नाही म्हणते....

बाबा : हो ग.... तुमची हौस तुम्ही पूर्ण करून घ्या फक्त कमी लोकांमध्ये... खुश आहेस ना..

आई : हो आता तुम्ही समजव णार म्हणजे असायलाच पाहिजे ..

बाबा : तु मधुशी एकदा बोलून घे... तू फोन केला होतास का तिला...

आई : विचार करून अगदी रहावलं नाही म्हणून मी तिला फोन केला होता...

बाबा : बर एकदा तिला फोन कर...

आई : हो ठीक आहे चालेल..

बाबा : चला झोपायला जाऊ यात का खूप लेट झाला....

आई : हो ठीक आहे चला जाऊया...

दुसऱ्या दिवशी आई घरात सगळ्यांना कळवते.. लग्नाला तयार झाली आहे... घरीतर अगोदरच हा निर्णय सगळ्यांनाच आवडला होता. त्यामुळे सगळे आनंदात होते... आईने सकाळी नाश्त्याला छान शिरा बनवला होता.

दुपारी सगळी  काम आवरून मधु ला फोन केला..

आई: हॅलो मधू कशी आहेस बाळा नाश्ता झाला का तुझा,??

मधु : हो आहे मी मस्त आहे आत्ताच नाश्ता झाला.... तू कशी आहेस??

आई : मी मस्त... तुझ्यासाठी एक खुशखबर आहे

मधु : अग बोल ना काय झालं

आई : काल रात्री बाबा बोलले माझ्याशी.. करूयात  आ पण तुम्हाला हवा तसा लग्न..

खुश आहेस ना..

मधु : हो ग आई...

आई : बरं चल मी ठेवते फोन कामावर आवरायची  आहेत. निवांत फोन करते... सांगायला फोन केला होता मी..

मधु: हो चल मी सुद्धा ऑफिस मध्ये आहे. बोलूयात नंतर बाय..