आयुष्याच्या या वळणावर - भाग 30

पुढील दोन दिवस अगदी मजेत जातात. दुसऱ्या दिवशी दुपारी मधूला तिच्या आईचा फोन येतो

आयुष्यच्या या वळणावर - भाग 30

मागील भागात आपण बघितले कि आशुतोष ने मधुच्या वतीने तीच मत त्याच्या घरी सांगितले होते आणि ननंतरच आशुतोष च्या घरच्यानाकडून हा निर्णय मधुच्या घरी सांगितलं गेला...

पण आशुतोष ने त्याच्या घरी सांगताना तो निर्णय त्याचा स्वतःचा आहे असच सांगितले होते...

हा विचार मधूला राहवत नव्हता.....

मधू ने त्याच रात्री आशुतोष ला कॉल केला.

मधू : हॅलो आशुतोष.... जेवलास का.??

आशुतोष :  हाय.... हो झाला माझं जेवण... तू जेवलीस का.??

मधू : हो झाला.... आशुतोष मला तुझ्याशी थोड बोलायचं होत...

आशुतोष : हो मॅडम... मी आता कॉल करनारच होतो.. आणि तुम्हला काय बोलायचं आहे हे सुद्धा माहिती आहे मला. .

मधू: म्हणजे... असं कस सांग बर काय बोलायचं आहे???

आशुतोष : मी घरी तुझं नाव न सांगता माझं नाव का सांगितलं हेच विचारयच होत ना???

मधू: हो मला हेच बोलायचं होत.... आपल असं काही बोलण पण झाला नसताना तू डायरेक्ट घरी असं सांगितलं.. सो मी गोंधळून गेले होते.  

आशुतोष : रिअली सॉरी.. मी मान्य करतो मला हे सगळे अगोदर तुला सांगायला हवं होत पण... त्या वेळी बोलायच राहून गेल आणि ऑलरेडी तो विषय घरच्या समोर आला होता.. म्हणूनच मला जे योग्य वाटलं तेच केलं...

मधू : बर तू जे काही केलेस ते चांगल्या साठीच असेल.. पण मला कारण तर कळूदे...

आशुतोष : हे बघ मधू... आपल्या घरचे लोक आपल्या लग्नाच्या बाबतीत खूपच उत्साही होते...आणि माझ्या घरी सुद्धा हा नवीन विचार सगळे कश्या अर्थाने घेणार याची  अजिबात कल्पना नव्हती... उगीच चुकून कोणीतरी विरुद्ध बाजूने विचार केला असता तर डिरेक्टली बोल तुला लागला असता... म्हणूनच मी माज्याकडे असं सांगितले...

तुज्या घरी तू आणि मी सांगावं अशी माझी इच्छा होती पण बाबांनी ही जबादारी स्वतः वर घेतली त्या मुळे मी जास्त काही बोलू शकलो  नाही..

रिअली सॉरी...

मधू तू पण काहीतर बोल ना..

मधू : मला काही बोलू देशील तर...

आशुतोष : ठीक आहे बोल...

मधू :खरंतर मी शब्दहीन आहे आता.. मी काय बोलू मला सुचत नाहीये किती विचार करतोयस अगदी बारीक गोष्टीचा.... थँक यु सो मच...

आशुतोष : बस काय बायको.....

मधू : बर चल ठेवू फोन बराच वेळ झाला आहे उद्या ऑफिस पण आहे..

आशुतोष : ठीक आहे जशी तुमची इच्छा....

गूड नाईट....

मधू : गुड नाईट....

पुढील दोन दिवस अगदी मजेत जातात. दुसऱ्या दिवशी दुपारी मधूला तिच्या आईचा फोन येतो

मधु ची आई : हेलो मधु कशी आहेस??? वेळ आहे का तुला बोलायला???

मधु : होय आई  बोल ना.. मी फ्री आहे....

मधु ची आई : अगं.. तुझ्या सासरकडून फोन आला होता काल.... त्यांचं म्हणणं होतं की लग्न अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचे... पण मला ते अजिबात  मान्य नाही.... तूच सांग बरं... घरातील पहिले लग्न....  आणि तू माझी एकुलती एक मुलगी आहे.... तुझं लग्न असं कसं चालेल...  मला काही माहीत नाही..... तू बाबांशी बोलून घे....

मधु : अग आई... बघ ना त्या कल्पनेमागे खूप चांगला विचार आहे.... एकदा त्या दृष्टिकोनातून विचार कर.....

मधु ची आई : ठीक आहे मी बोलतो तुझा बाबांशी.... म्हणजे हा निर्णय तुलाही मान्य आहेच तर.... ठीक आहे...

मधु : चिडलीस का ग आई.....??

मधु ची आई : नाही ग बाळा चिडते कशाला.... पण असतं ना गं काहीतरी.... अगोदरच इच्छांचे मनोरे बांधून ठेवलेले असतात.... ते पूर्ण होणार नाही म्हटल्यावर त्रास तर होणारच.... बघते मी बोलते तुझ्या बाबांची.... तुला मान्य आहे ना ग..

मधु : हो आई मला मान्य आहे.....

मधु ची आई : ठीक आहे तर मग चल ठेव फोन

जेवणाची तयारी करायची आहे...

मधु : बाय...

मधु ची आई : चल बाय बोलू नंतर काळजी घे...

फोन ठेवला नंतर मधु थोडावेळ विचार करू लागते... खरंच आई इतकी दुखावली आहे का...

तिच मन तिला खात होतं.... आपण हा निर्णय घेऊन चूक तर केली नाही ना....

मधू विचार करून हैराण झाली होती...

बघू आता काय बोलताय...मधुची इच्छा पूर्ण होईल????

🎭 Series Post

View all