Login

आयुष्याच्या या वळणावर - भाग 27

मधू तोपर्यंत जेवण करुन येते. मधुच्या मनात घालमेल चालूच होती. आशुतोष ला काय वाटेल तो काही म्हणेल

आयुष्याच्या या वळणावर - 27

दुसऱ्या दिवशीसुद्धा मधु घरीच राहिले होते. मोदीच्या असण्याने घरचे सगळे खुश होत. दोन दिवस मधुनी आनंदात घालवले. रात्रीच्या बसमधून  मधु  निघणार होते.

बबलू आणि मधु एकत्रच बसला बसले होते. बबलू मी मधुला पुण्यात तिच्या रूमवर सोडले.

आणि पुढे मुंबईला निघून गेला.

रात्रीच्या वेळी प्रवासा मुळे मधून दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली होती. मधु थोडा वेळ झोपून दहा वाजता उठली. उठल्यानंतर तिने आशुतोषला फोन केला.

मधु : हॅलो..... कसा आहेस

आशुतोष : मी ठीक आहे तू कशी आहेस.. तुझा प्रवास कसा झाला....  झोप झाली का नीट...

मधु : हो झाली माझी झोप.... मी बरी आहे.... तू बिझी आहेस का.....

आशुतोष : हो गं थोडाफार आहे बिझी..... अर्ध्या तासात होईल फ्री....

मधु: बर ठीक आहे...  नाही तोपर्यंत लंच करून घेते. मग कॉल करते

आशुतोष: बरं ठीक आहे... चल बाय बोलू नंतर आरामात...

मधू तोपर्यंत जेवण करुन येते. मधुच्या मनात घालमेल चालूच होती. आशुतोष ला काय वाटेल तो काही म्हणेल का..... आणि असं बरच काही....

तिला लग्न अगदी मोजक्याच आणि शांततेत एन्जॉय करयचा होत. पण दोन्ही घरातील पहिल्याच लग्न असल्यामुळे सगळे खूप आनंदात होते आम्ही सगळेजण तयारी हौसेने करत होते

त्यामुळे सगळ्यांच्या आनंद बघून लग्न करावे अशी तिची इच्छा होती.... हे सगळं तिला त्याला सांगायचं होतं.

या सगळ्या विचारात ती गढून गेली होती. तेव्हा  अचानक  ती चा फोन वाजला. आणि ती खडबडून जागी झाली. आशुतोष चा फोन आला होता.

मधु : हॅलो आशुतोष बोल ना.... जेवण झालं का तुझं

आशुतोष : हो आत्ताच जेवलो तू जेवलीस का

मधू : हो माझं पण जेवण आत्ताच झालं...

आशुतोष : बोल आता मी फ्री आहे तुला काहीतरी अर्जंट बोलायचं होता ना.... गावी होतीस तेव्हा फोनवर बोलली होतीस...

मधू : हो सांगते.... लग्नाविषयी बोलायचं होतं..

आशुतोष: मग काय झालं तारखे बद्दल तुला काही प्रॉब्लेम आहे का.... की आणखी काय.....

मधु: मी जे सांगते ते समजून घे.... आपल्या दोन्ही घरी आपल लग्न पहिलच लग्न आहे..

त्यामुळे दोन्हीकडचे लोकही आनंदात आहे. पण पाहिला बसून माझ्या काही अपेक्षा आहेत... मला लग्न खूप कमीमाणसात करायची इच्छा आहे

फक्त फॅमिली.. आणि त्याचे पैसे एखाद्या अनाथाश्रमात डोनेट करायचे आहे.. हे माझं पहिल्यापासून मत होता... पण परवा सगळेच आनंदात होते. आणि तूझ मत मला माहित नव्हतं 

म्हणून मी त्या दिवशी काही बोलले नाही.. पण माझा हा विचार तुझ्याजवळ मांडायचा होता

तुझं काय म्हणणं आहे यावर....

आशुतोष: अग मधू किती विचार करतेस तू...  मला तू एकदा नव्याने तुझ्या प्रेमात पाडलं.....

छान विचार आहे.... माझ्या तर मनातही आल नव्हता असं काही.... खरच खुप छान विचार आहे...  मलाही आवडला...  जशी आपली इंगेजमेट झाली. तसेच आपण अगदी थोड्या माणसात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये एंजॉय करूयात...

मधु: घरी कोण आणि कसं सांगायचं......

आशुतोष : ते तू माझ्यावर सोड...  मी हँडल करेल

बघुयात कसे ही सिच्यूएशन कशी हॅन्डल करतायत दोघेजन