Login

आयुष्याच्या या वळणावर - भाग 26

मधु : उद्या पर्यंत मी इथे  आहे. आपल्याला   बोलता येणार नाही. मी पुण्याला गेले की एक दोन दिवसात तुल?

आयुष्याच्या या वळणावर - भाग 26 

आतापर्यन्तआपण पहिले कि मधू आणि आशुतोष ची एंगेजमेंट एकदम छान अशी पार पडली होती.

लग्नाची तारीख जवळचीच असल्याने दोन्ही घरी तयारी अगदी जोमात होणार होती. सगळे जण खुश होते. आणि दोन्ही घरी पाहिलंच लग्न असल्याने सगळ्यना खूप हौस होती.

सगळेजण एंगेजमेंट करुन आपल्या आपल्या घरी पोहचले. मधू सुद्धा 2दिवस घरी गेली. त्यानंन्तर तिला ऑफिस जॉईन करायच होत.

सगळे जण घरी पोहचल्या नंन्तर तिच्या बाबांनी आशुतोष च्या बाबाना फोन करुन कळवले. आणि ते सगळे नीट पोहचले याची चौकशी सुद्धा झाली. कार्यक्रम नीट पार पडल्याचा आनंद सगळ्यचा चेहऱ्यावर दिसत होता. सगळ्यना आनंदी बघून मधू सुद्धा खुश होती.

रात्री सगळ्यचे जेवण आटोपल्या नंन्तर ती आपल्या खोलीत गेली. तिने आशुतोष ला फोन केला.

मधू : हॅलो आशुतोष... काय करतोयस

आशुतोष : बस आपकोही याद कर रहे थे....

मधू : जास्त फिल्मी नकोस होवू.... जेवलत का.

आशुतोष : हो आताच जेवण झाला आणि रूम मदे आलो. तुलाच कॉल करणर तेवढयात तुझा कॉल आला. तू जेवलीस का??

मधू : हो झाला.... घरी सगळे एवढे खुश आहेत ना सगळ्यना बघूनच माझं पोट भरलं...

आशुतोष : ओ मॅडम.. सगळे खुश असणारच ना... एवढा छान कार्यक्रम झाला.. पण तुम्ही असं नका करू पोटभर जेवत जा....

मधू : हो... बाकी आणखी काय...

आशुतोष : मधू... खरंच थँक यू.... तुझ्या फक्त घरी येण्याचा कल्पने नेच सगळे खुश आहेत... म तू आल्यावर वर तर खूपच छान होणार आहे सगळ.... I am so excited.... आणि हे सगळे तुझ्यामुळे शक्य होत्या.. सो खरंच थँक्स...

मधू : बस कर हं.. आता असं काही बोलू नकोस..... मला दूर गेल्या सारखं वाटत.... आणि तुलाही खरंच थँक्स.... किती छान सुरप्राईज दिलेस....

आशुतोष : ते मी माझ्या साठीच केलं.... तुला आणखी खुश बघायला.... बर बस झाला आता आभार प्रदर्शन...

मधू : ओ असा आहे तर...

आशुतोष: बर हा....

मधु : मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आपल्या लग्नाबद्दल....

आशुतोष : अगं बोल ना....

मधु : उद्या पर्यंत मी इथे  आहे. आपल्याला   बोलता येणार नाही. मी पुण्याला गेले की एक दोन दिवसात तुला फोन करेन. तेव्हा आपण सविस्तर या विषयावर बोलू.

आशुतोष : हो चालेल पण काही अर्जंट असेल तर सांगून टाक मनात ठेवू नको...

मधु : हो रे  बाबा

आशुतोष: बर चल झोप आता खूप वेळ झाला आहे आणि ट्रॅव्हलिंग ने सुद्धा दमली असशील.

मधु: हो चालेल उद्या बोलूयात.

आशुतोष : चल बाय गुड नाईट टेक केअर.

मधु : बाय गुड नाईट सी यु....

बघुयात मधूला  काय सांगायचं असेल?