आयुष्याच्या या वळणावर - भाग 21

मधुने ती  रिंग घालून बघितली. आणि हो म्हणली.  पण मधूला ती रिंग आवडली नाही हे आशुतोषला समजलं होत. प?

आयुष्याच्या या वळणावर - भाग 21

सगळे जण साड्यांच्या दुकानात होते. बाकी सगळी खरेदी झाली होती. आता मधुसाठी साडी बगत होते. तोच बबलू, मधू आणि आशुतोष तिकडे पोहचले. मधू सगळ्या लेडीज बसल्या होत्या तिकडे गेली. सगळ्या जणी तिला साड्या दाखवू लागल्या. 

मीना : मधू आपल्या कडे साखरपुड्यला हिरवी साडीच घायवी लागते. You dont have choice in colour... 

मधू : हो चालेल ना मावशी... तुम्हीच बगा ना.. मला तसही फारस कळतं नाही साडी मधलं... 

स्मिता : अग... बाकी सगळ आम्ही बगु.. तू डिजाईन वगैरे बघून घेऊ... 

सुवर्णा : दादा... सगळ्या पॅटर्न मधील ग्रीन कलरच्या साड्या काढून दाखवा. 

ते सगळे इतक्या पटापट साड्या काढून दाखवत होते. तिला सगळ्यच साड्या आवडत होत्या. 
सगळ्या साड्या बघून मधु इकडे तिकडे बघू लागली. 
आशुतोष आणि बबलू जवळच उभे होते. आशुतोष ला समजलं कि मधू त्यालाच शोधतीये.

आशुतोष : चल बबलू... या लेडीज ची खरेदी झाली कि नी.. 
आशुतोष आणि बबलू तिकडे जातात. 
बबलू आई आणि मावशी बरोबर बोलत असतो. 
तोच मधू तिला आवडलेली साडी अंगावर घेऊन आशुतोष कडे बगते. 
आशुतोष नकारार्थी मान डोलवते. नंन्तर मधू तिथलीच तिला पहिली आवडलेली. हिरव्या गार रंगाची.... लाल असे जरीचे काठ... सोनेरी बुट्टीची नक्षि..... असलेली साडी दाखवते... 
आशु काहीही न बोलता तिकडेच बगत बसतो. 

मीना मावशी त्याला हळूच चिमटा काढते. आणि म्हणते... 
अग.. ही तर फार छान आहे साडी... हीच घेऊ तुझ्यासाठी... 
खरेदी करून सगळे बाहेर पडतात. नंन्तर सगळे रिंग घायला जातात. 
तिकडे दोघांनाही एकत्रच बसवतात. 
मधू आणि आशुतोष त्याची रिंग सिलेक्ट करतात. 
त्या दुकानात लेडीज साठी जास्त अशी व्हरायटी नव्हती. आणि स्मिता काकूंना एक रिंग खूप आवडली होती.. 
ते दुकान प्रकाश काकांच्या मित्रच असल्याने आता बाहेर जाण अशक्य होत.

स्मिता : मधू..  ही बघ ना खूप छान आहे.. छान दिसेल तुला... 

मधुने ती  रिंग घालून बघितली. आणि हो म्हणली. 
पण मधूला ती रिंग आवडली नाही हे आशुतोषला समजलं होत. पण आता बोलणार कस.. आईने ती सजेस्ट केली होती. तो काहीच न बोलता बाहेर आला. 

मधू आणि बाकी सगळ्या ज्वेलरी शॉपिंग साठी बाहेर गेल्या आणि हे सगळे आशुतोष चा कुर्ता घायला. 
त्याने पटकन एक कुर्ता सिलेक्ट केला आणि मधूला फोटो पाठवला. 
मधुलाही तो ड्रेस आवडला... तिने yes म्ह्णहण रिप्लाय दिला 
आणि अश्या प्रकारे दोघाची खरेदी झाली. 

सगळ्यांना हॉटेल वर येई पर्यंत 2 वाजले होते. महेश काकाने निघताना च फोन करुन जेवन रेडी ठेवायला सांगितल  होते. आल्यावर सगळे लगेच फ्रेश झाले आणि आराम करण्यासाठी रूम मधेंच गेले. 

रात्री साठी एक छोटीशी मैफिल ठरली होती.  मधुचा मेहंदी काढायचा कार्यक्रम ही तिकडेच ठरला होता. रात्री सगळेजण एकदम आनंदात होते. 
सगळ्यना करेक्ट 6 वाजता लॉन वर बोलवलं होते. 

बगूयात कशी होतेय ही मैफिल... 

पण मधूला रिंग आवडली नाही ही गोष्ट आशुतोषच्या मनाला खूप लागली होती. आता आशुतोष काय करतोय.

🎭 Series Post

View all