आयुष्याच्या या वळणावर - भाग 13

इकडे आशुतोष ला जाऊन 10 दिवस झाले. आज रविवार होता. आज रात्रीच्या फ्लायीटने तो मुंबई मदे आला. रात्री

( मागील भागात आपण बघितले कि मधू गेल्या 10 दिवसापासून आशुतोष च्या मेसेज ची वाट बगत होती आता पुढे )

आयुष्याच्या या वळणावर - भाग 13

मधू ने मेसेज केल्यानंतर 2-3 दिवस खुप आतुरतेने वाट बघितली पण त्याचा रिप्लाय काहीच आला नाही. आता मधूलाही असेच वाटत होते कि यालाही मी आवडले नसेल. 
सगळं विसरून जा मधू.... नको त्याचा विचार करू... असं म्हणून स्वतःलाच समजवत होती. 
इकडे आशुतोष ला जाऊन 10 दिवस झाले. आज रविवार होता. आज रात्रीच्या फ्लायीटने तो मुंबई मदे आला. रात्रीचे 11 वाजले होते. सगळी महत्वाची कामे आटपून आता कुठे शांत झाला. गेल्या 10-12 दिवसात त्याची खूप दगदग झाली होती. आता त्याच डोकं खुप शांत आणि रिलॅक्स झाल होत. बेडवर झोपून शांत विचार करू लागला.  त्याला मधुचा चेहरा समोर दिसू लागलं. त्याने त्याला या सगळ्या घटनांची आठवण झाली आणि त्याला मधुचा मेसेज ही आठवला. त्याने लगेच फोन बघितला. .. मधुचा तो मेसेज बगुन तो स्वतःवरच चिडतो. असा कसा विसरला तू रिप्लाय द्याय ला.  अगोदरच हिचा केवढा मोठा गैरसमज त्यात मीच रिप्लाय नाही दिला. तिला असं वाटणं साहजिकच आहे. टाईम बघितले तर 11.30 वाजले होते. आता कॉल करू का हिला.. मेसेज वरती बोलो तर कदाचित गुंता खूप वाढेल. 
पण एवढ्या रात्री,, योग्य नाही.  सरळ मेसेज करतो. 
असं म्हणून तो मधूला मेसेज टायप करतो, 
" हॅलो मधू, रिअली सॉरी.. गेल्या 10-12 दिवसात मी खूप जास्त बीजी होतो. त्यामुळे तुला रिप्लाय देऊ शकलो नाही. मला तुज्याशी बोलायचं आहे. अर्थात आपण भेटून बोलो असतो तर खूप छान झाल असत पण मला इतक्यात  तिकडे येण शक्य नाही. आपण फोन वर बोलू.. मला तू फ्री कधी असते ते सांग.. मी तुला फोन करेन ""
  
मधुने हा मेसेज काही बघितला नाही.... झोपली असेल कदाचित ( अर्थात ती झोपली होती )असे म्हणून आशुतोष ने आपल्या मनाची समजूत काढली आणि तो पण झोपला. 

मधुने त्याचा विचार खूप दिवस अगोदरच मनातून  काढून टाकला होता.  सकाळी ऑफिस च्या गडबडीत होती. सगळं आटोपून नाश्ता करत होती.  तिने फोन हातात घेतला आणि बघितले.   चक्क आशुतोष चा मेसेज आला होता. तिने लगेच मेसेज बघितला... खरं तर मनोमन खूप खुश झली होती.  पण आता काय बोलायच असेलच त्याला..   हा विचार मात्र मनात घोळत होता. आता काय वेळ सांगू त्याला.... तशी मी दिवसभर बीजी आहेच.. रात्रीची सांगते... 
मधुने त्याला आपण रात्री 8 नंन्तर बोलूयात असा मेसेज केला. 
सकाळी उठून त्याने तीच मेसेज बघितला आणि खुश झाला.  नक्की बोलायचं तरी काय.... हा विचार करू लागला. 
घरच्यांचा निर्णय तर त्यालाही मान्य नव्हता. अगोदरच मी तिला मेसेज न केल्याने झालेला गैरसमज आधी मिटवेन आणि मग बोलू असे ठरवले आणि आवरून ऑफिस ला गेला. 
आज सोमवार होता ऑफिस मधें दोघांनाही खूप काम होत. त्यात 8 वाजायला आले तरी तो ऑफिस मधेंच होता. त्याने मधूला मेसेज करुन कळवलं, " मधू मी अजूनही ऑफिस मधेंच आहे.. कॉल करायला थोडा उशीर होईल."
मधू एव्हाना रूमवर पोहचली होती. तिने मेसेज बघितला. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. 
8.30 ला आशु घरी आला. पटकन फ्रेश होऊन लवकरच जेवून घेतले. काम आहे असं आईला सांगून रूम मधें निघून गेला. 
आशुतोषने मधूला कॉल केला. 

आशुतोष : हॅलो,  मधू आशुतोष बोलतोय. फ्री आहेस ना बोलायला. 

मधू : हॅलो,  अरे ओळखलं मी,  नंबर सेव्ह आहे माज्याकडे.. मी तुज्याएवढी बीजी नसते रे ( टोमणे मारायच्या स्वरात मधू बोलून गेली )

आशुतोष : अग मधू,  आय एम रिअली व्हेरी सॉरी...  आपल्या भेटीनंतर ऑफिस मधें 2-3 प्रोजेक्ट सुरु झाले. प्रचंड काम होत.  तुझा मेसेज मला मिळाला होता.. मी रिप्लाय देणारं त्याच रात्री मित्राच्या आईला ऍडमिट केल होत त्याने कॉल करून बोलवलं.. मला जाण भाग होत......आणि सकाळी येऊन मी लगेच 10 दिवसांसाठी U.S. ला जावं लागलं. काल रात्री आलोय बघ... मला माहिती होता मी तुला मेसेज वरती कळवा य ला तरी हवं होत....उगीचच तुझा गैरसमज झाला ना.... 

मधू :  ( मनात स्वतःशीच बोलू लागली -मनातून तिला गिल्टी वाटत होत. आपण उगीचच चिडलो याच्यावर बिचारा किती काम होती. तरीही आलयावर मला मेसेज केला )

आशुतोष : हॅलो,  मधु ऐकतस का?  अजूनही रागावली आहेस. 

मधू : नाही.... म्हणजे ऐकतेय... खूप काम होत ना तुम्हला.. मलाच समजायला हवं होत.. 

आशुतोष : अग चूक माझीच होती.. ते जाऊदेत.. मला जे बोलायचं तेच राहून जाईल.  तू मला मेसेज केला होतास... पत्रिका वगैरे सोडून दुसरं काही कारण आणि बरंच काहीस... 

मधू : आपण दोन वेळा एकमेकांना भेटलो. पूर्ण माणूस समजून घेणं नाही होणार पण स्वभाव,  विचार तरी कळतात... तू या गोष्टीवर विश्वास ठेवत असंशील असं नाही वाटत..  आणि बाकीचं म्हणेज आपल्या आर्थिक परिस्थिती मधें जो गॅप किंवा म तुझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे.... मला फक्त कारण जाणून घायच होत....मी जरा जास्तच स्पष्ट बोलतीये.... 

आशुतोष :  हे सगळं ऐकून तर तो मला खूप हसायला येतेय पण सांगतो तुला सगळं.. एक गोष्ट, स्पष्ट बोलतीयेस तेच चांगल आहे. हे बघ आर्थिक परिस्थिती वगैरे याचा प्रश्न असता तर आपली भेटच झाली नसती.. अगोदरच महेश काकाने मला सगळं सांगितलं होत. दुसरं गर्लफ्रेंड वगैरे अजून तरी नाहीये... मी एवढा बीजी असतो कि भविष्यत होईल कि नाही माहिती नाही... ( थोडा हसतच बोलतो )
पत्रिका वगैरे हा विषय आता समोर आला आहे. मला खरंतर या गोष्टी नाही पटत... मला वाटत तुझंही तेच म्हण आहे.... 

मधू : हो तुला कस समजलं.. 

आशुतोष : मॅडम, तुमच्या मेसेज मधून सगळं कळलं मला.... मला सांग तुमच्याकडे या सगळ्या वर खूप विश्वास कोण ठेवत.. 

मधू: आई चा या सगळ्या वर खूप विश्वास आहे... आणि बाकीचे नॉर्मल आहेत.. 

आशुतोष : ( आधी सासू बाईना पटवाव लागेल.. मनोमन बोलून गेला )
अच्छा ठीक आहे... आपण एक प्लॅन करू.. या सगळयांना एकदा एकत्र करू आणि समजवून बगूयात.. पण तू तयार आहेस ना... 

मधू : हो नकीच ( दोघेही हसू लागले ) पण समजव नार कोण? 

आशुतोष : मी आहे ना.... आणि आपल्याला कोणाची तरी मदत लागेल. बबलू करेल का ग मदत?? 

मधू: तूच विचार त्याला?? 

आशुतोष : ओके बाबा मी विचारेन... पण मधू नक्की पुढे जयचं ना.... मधेच साथ तर सोडणार नाहीस ना.. 

मधू: हॅलो मिस्टर आशुतोष,  मेसेज मी केला होता आणि म्हणूनच आपण बोलतोय आता... 
नाहीतर एव्हाना मला विसरला ही असता कामाच्या व्यपात... 

आशुतोष : ओह्ह... सॉरी हं... चुकलं माझं... मी बबलू शी बोलून मग सांगतो तुला.. चल बाय.. 

मधू: हो हो नक्की... बाय 

अगदी 2-3 वेळा झालेल्या भेटी नंतर अगदी 5-10 वर्षापासून ने मित्र एकमेकांशी बोलत आहेत असेच वाटले.... शब्दात नाही पण बोलण्यातले भाव सांगून जात होते ( तेही त्याच्या नकळत )कि दोघेही एकमेकांना खूप आवडले आहेत. 

बबलू यांची साथ देईल आणि सगळे  तयार होतील का हे अरेंज केलेलं लग्न जुळवा य ला 
बघुयात पुढच्या भागात..

🎭 Series Post

View all