आयुष्याच्या या वळणावर - भाग 11

ते सगळे विचार त्याच्या डोकयात फिरत होते.  "काही सांगू शकत नाही " असा साधा आणि सरळ मेसेज त्याने पा?

आयुष्याच्या या वळणावर - भाग 11

प्रकाश काका रात्री ऑफिस मधून घरी येतात. घरातील सगळ्या मंडळीची भेट सायंकाळच्या नाश्त्याला होते. प्रकाश काका टेबलंजवळ येतात. इकडे आशुतोष चा छोटा भाऊ शुभम त्याची लग्नावरून खेचत होता. स्मिता किचन मधें होती. 
सगळे जण बसले. सगळ्यना काही तरी म्हणत्वाचं सांगायचं आहे म्हूणन सगळ्यना एकत्र जमा केलं. 

प्रकाश काका : आशु,  तुझ्या लग्नाविषयी थोडं बोलायचं होत.  मी थोडं स्पस्ट आणि क्लिअरच बोलीन. 

आशुतोष : बोला ना बाबा... काही प्रॉब्लेम नाही. 

प्रकाश काका : काल आत्याचा फोन आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार तुझी आणि मधू ची पत्रिका जुळत नाहीये. ती मुलगी तुज्यासाठी योग्य नाही. 

आशुतोष : पण असं कस... बाबा या अगोदरही आपण मुली बघितल्या होत्या प्रत्येकवेळी तर तुम्ही या सगळ्या गोष्टीवर नाही बोलायचं पण आता असं काय झाल. 

प्रकाश काका : हे बघ आशु,  माझा पण या गोष्टीवर तितकासा विश्वास नाहीये.. पण आयुष्यचा प्रश्न आला कि वाटत सगळ्या गोष्टी क्लिअर असलेल्या बऱ्या... या विषयामधें आपण एकट्याने कोणताही निर्णय घेणे चुकीचे आहे.. मी त्यां मंडळींशी बोलून घेतो... बघुयात त्यांचं काय म्हण आहे. 

आशुतोष : हो ठीक आहे... तुमचं जेव्हा सगळ फायनल होईल तेव्हा सांगा मला..... 
( आशुतोष तसा आतून दुखावला होता. नाष्टा पटकन उरकून तो रूम मध्ये निघून गेला )

त्याला वाटलं एकदा मधूला फोन करुन सगळ बोलाव.. पण ते योग्य नव्हतं. त्याने फोन चेक केला. आज सकाळीच मधुचा हॅलो असा  मेसेज आला होता. 

ते सगळे विचार त्याच्या डोकयात फिरत होते. 
"काही सांगू शकत नाही " असा साधा आणि सरळ मेसेज त्याने पाठवला. 
त्याला या परिस्तिथीचाच खुप राग येत होता. कुठे न कुठे तरी त्याला मधू बद्दल प्रेम वाटत होता. कारण या पूर्वी तो कधीच असं रिऍक्ट झाला नव्हता. 

थोड्या वेळाने मधू तो मेसेज बघते... तिला फारस काही समजतं नाही... ती कामात बीजी असल्याने नंन्तर बघू असं म्हणून फोन बाजूला ठेवते. 

प्रकाश काका महेश ला फोन करुन सांगतात. या सगळ्या गोष्टी प्रकाशकाकांनी स्वतः मधुच्या बाबाशी बोलाव अशी त्याची ईच्छा होती. 
या तिघांनी कॉन्फरेन्स कॉल केला. प्रकाश काकांनी अगदी स्पष्ट सांगून टाकले. तुम्ही तुमच्या बाजूने एकदा बगुन घ्या.. मग पुढचं  बोलूयात... 

मधुच्या बाबांनी जवळच असणाऱ्या गुरुजींना पत्रिका दाखवली. त्याच्या सांगायचा संदर्भा तसंच होता. पत्रिका जुळत नव्हती.. मधू च्या आई चा या गोष्टीवर विश्वास होता तिला समजताच तीने लग्नाला साफ नकार दिला. मधुच्या बाबांनी तिच्या आजोबांचा विचार घेतला. त्यानी तुला योग्य वाटेल ते कर असे सांगितले. 


महेश काका, प्रकाशकाका आणि मधुचे बाबा यांनी मिळून कॉल केला आणि आपण विषय इथेच थांबून नंतर बघुयात असा निर्णय घेतला.

मधुच्या आईने रात्री मधूला आणि बबलू ला फोन करुन या सगळ्या गोष्टी तिच्या कानावर घातल्या. मधुला  सुद्धा खूप वाईट वाटले आणि आशुतोष च्या त्यां मेसेज चा अर्थ तिला आता उमगला. मधू पण थोडी नाराज झाली होती. 

मधुने आजोबांना फोन केला. तिला अचानक रडू आले. आजोबांनसमोर मनमोकळी रडून घेतले. आजोबानी तिला खुप समजवले. 

आजोबा: हे बघ मधू,  आपल्या आयुष्यात जे काही घडत ते चांगल्यासाठीच असत असं म्हणून पुढे जाण गरजेचं आहे. ज्या गोष्टी घडतात त्या तुझ्या भल्या साठीच आहेत त्यामुळे जास्त विचार आणि त्रास करून घेऊ नकोस. तू तुझ्या  शी प्रामाणिक राहा सगळ चांगलंच होईल.

मधूला तर तिच्या आजोबांनी समजवल पण आशुच काय??  तो कोणाशी बोलेल.. बगूयात पुढच्या भागात... 


मधू आणि आशु दोन जुळणारी मन आता खूप वेगळ्याच दिशेला चालत होती. बघुयात आता याच्या आयुश्याच्या या वळणात नक्की काय होतंय..... 

🎭 Series Post

View all